Halloween Costume ideas 2015

हवाईदलात ‘हिलाल’ची उत्तूंग झेप

Hilal Ahmed
एअर कमोडोर हिलाल अहमद राठेर हे नाव अलिकडे राष्ट्रीय मीडियामध्ये झळकत आहे. विशेष करून कश्मीरमध्ये त्यांच्यामुळे एक वेगळेच उत्साहाचे वातावरण तयार झालेले आहे. त्याचे कारण असे आहे की, हे नाव राफेल विमानाशी जोडले गेलेले आहे.
    हिलाल अहेमद राठेर हे गेल्या एक वर्षापासून फ्रान्समध्ये असून, फ्रान्सकडून भारताला मिळणार्‍या  राफेल विमानामध्ये कोणकोणते फिचर्स आणि हत्यारे लावायची आहेत, याचा तपशील दसा अ‍ॅव्हीएशन या कंपनीला सांगत आहेत. आणि भारताच्या संरक्षण गरजेप्रमाणे कोणते मिजाईल या फायटर जेटमध्ये बसवायचे याबद्दल एक तज्ज्ञ म्हणून भारतातर्फे तेच निर्णय घेत आहेत. पाच विमानांची पहिली खेप जेव्हा फ्रान्समधून निघण्यासाठी तयार झाली तेव्हा हिलाल राठेर आणि भारताचे फ्रान्समधील राजदूत जावेद अश्रफ हे दोघेही दसा एव्हीएशनचे चेअरमन एरिक ट्रॅपियर यांच्यासोबत तेथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये हजर होते. येणेप्रमाणे त्यांचे नाव राफेल विमानाशी कायमचे जोडले गेलेले आहे. हिलाल यांनी भारतीय वर्जनच्या राफेलमध्ये 13 नवीन कॅपिसटींनाही सामील करवून घेतलेले आहे. शिवाय, भारतीय वातावरणात या विमानाला अधिक घातक बनविण्यासाठी अनेक प्रकारचे हत्यार त्यांनी यात जोडून घेतलेले आहेत. एअर कमोडोर हिलाल अहेमद यांचा जन्म एका मध्यमवर्गीय परिवारामध्ये झाला  होता. त्यांचे वडील मयत दिवंगत मोहम्मद अब्दुल्लाह जम्मू कश्मीर पोलीस विभागामध्ये डिवायएसपी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या परिवारात तीन बहिणी आहेत. हिलाल राठेर यांनी जम्मू जिल्ह्याच्या नगरोता टाऊन येथील सैनिक शाळेतून प्रारंभिक शिक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज मधून वैमानिकाची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एअर वॉर कॉलेज अमेरिकेमधून अधिक नैपुन्याची पदवी प्राप्त केली. आपल्या प्रशिक्षण काळात त्यांनी आपल्या तुकडीमधून प्रथम येऊन सोअर्ड ऑफ ऑनरचा मान मिळविला होता.
    17 डिसेंबर 1988 मध्ये ते फायटर पायलटच्या रूपाने भारतीय वायुसेनेत दाखल झाले. 1993 मध्ये फ्लाईट लेफ्टनंट, 2004 मध्ये विंग कमांडर, 2016 मध्ये ग्रुप कॅप्टन आणि 2019 मध्ये एअर कमोडोर या पदावर पदोन्नत झाले. त्यांच्याकडे तीन हजार तासाचा मिग 21 तर 2000 तासाचा मिराज उडविण्याचा अनुभव असून, किरण एअरक्राफ्ट उडविण्यामध्येही ते तज्ज्ञ मानले जातात.
    भारतीय वायुसेनेच्या संकेत स्थळावर त्यांच्या गुणवत्तेबद्दल, ” जगातील सर्वोत्तम फ्लाईंग ऑफिसर” असे म्हटलेले आहे. त्यांना 2010 मध्ये वायुसेना मेडलने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2016 मध्ये विशिष्ट सेना मेडलनेही गौरविण्यात आले आहे. त्यांच्या सोबत एअर कमोडोर मनिष सिंह, विंग कमांडर अभिषेक त्रिपाठी व अन्य दोन पायलट असून, दिनांक 29 जुलै रोजी अंबाला एअरपोर्ट येथे राफेल घेऊन उतरण्याचा किर्तीमान या सर्वांच्या नावावर जमा झालेला आहे. यासाठी त्यांनी फ्रान्स ते भारत 7000 किलोमीटरचे हवाई अंतर पार केले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget