(मागील अंकावरून पुढे...)
४) सामाजिक दबाव :
स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे आपण आधीच पाहिले आहे. अमुक एवढे वर्ष अभ्यास केला की हमखास यश मिळेल याची इथे शाश्वती नाही. व्यक्तीनुसार त्याच्या संघर्षाचा कालावधी बदलतो. उदा. अंसार शेख यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी मध्ये यश प्राप्त केले तर नूह सिद्दीकी यांना पाचव्या प्रयत्नात यश प्राप्त झाले. म्हणजे अंसार शेख यांना अभ्यासाची दोन वर्षं आणि परीक्षेच्या चक्राचा एका वर्षाचा कालखंड असा ‘तीन वर्षांचा' कालावधी लागला तर तोच कालावधी नूह सिद्दीकी यांच्यासाठी ‘सात वर्षांचा' होता. सरासरीचा जरी विचार केला तरी किमान ‘तीन ते चार वर्षांचा' कालावधी तयारीसाठी ते अंतिम निकलापर्यंत लागतो. पण पदवीनंतर चार वर्षं म्हणजे विद्याथ्र्याचं वय होतं २६ वर्षं. इथपर्यंत यश भेटलं तर ठीक नाही तर मग समाजातून प्रश्न उठायला सुरुवात होतात, पदवी झाली तरी काय करतोय, लग्नाचं वय झालंय (इतर समाजातील मुलांच्या लग्नाचं सरासरी वय वाढून २८-२९ वर्षं झालेलं असताना मुस्लिम समुदायात अजून ते २४-२५ वर्षं इतवंâ आहे), नोकरी करत करत कर म्हणावं की काय ते स्पर्धा परीक्षा, आपल्या समाजातील मुलांचं काम नाही ते... इ.इ.
त्यातल्या त्यात जर मुलगी असेल तर मग विषयच संपला. विद्याथ्र्यांच्या आई वडिलांपेक्षा त्यांच्या नातेवाईकांनाच या गोष्टीची जास्त काळजी असते आणि कुटुंब समारंभामध्ये अशा गोष्टींवर चर्चा करणे हा त्यांचा आवडीचा विषय....
५) मानसिक दबाव :
समाजातून, नातेवाईकांमधून दबाव निर्माण होत असताना त्याचा परिणाम हा विद्याथ्र्यांच्या मानसिक स्थितीवरही होत असतो. त्यात वाढते वय, बेरोजगारीमुळे दररोज वाढणारी स्पर्धा, सोबतचे कमावते झालेले मित्र पाहून ते प्रचंड मानसिक दडपणाखालून जात असतात. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो.
आर्थिक परिस्थिती नसल्याने आणि घरातील इतर भावंडांचे शिक्षण आणि लग्न असल्यामुळे घरातूनही आता आर्थिक साहाय्य मिळणं कठीण होतं. त्याचे वेगळे दडपण वाढते. या सर्व ताणतनावाणे यशाच्या जवळ असूनसुद्धा अनेकांना आपले स्वप्न अर्धवट सोडावे लागते.
६) प्रचंड स्पर्धा :
स्पर्धा परीक्षेच्या नावातच स्पर्धा आहे. पण बेरोजगारी आणि बेकारीमुळे या क्षेत्राकडे येणाऱ्या विद्याथ्र्यांचा लोंढा वाढत आहे ज्यामुळे जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. २०१९ साली जेमतेम ४३१ जागांसाठी पाच लाखांपेक्षा जास्त उमेदवार स्पर्धेत होते. म्हणजे यशाचा टक्का फक्त ०.१ टक्के तर बाकी ९९.९९ टक्के घोडे पुन्हा पुढच्या शर्यतीत प्रयत्न करतात. त्यात आमचा घोडा आधीच अशक्त आणि कमकुवत...
वरील तीन कारणे ही कमी अधिक प्रमाणात सर्वच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्याथ्र्यांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लागू होतात. मुस्लिम विद्यार्थी हे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणामुळे त्याला फक्त थोडे जास्त विकारक्षम आहेत.
७) आरक्षण :
आता मी विषयाच्या सर्वांत महत्त्वाच्या आणि तेवढ्याच गंभीर मुद्द्याला हात लावत आहे. घोड्यांची शर्यत आयोजित करताना आयोजकांना याची जाणीव होती की सर्व घोड्यांचा धावण्याचा मार्ग आणि त्यांची क्षमता समान नाही. त्यामुळे शर्यत समान व्हावी यासाठी समान क्षमता असलेल्या घोड्यांच्या जातीची वेगवेगळी शर्यत आयोजित करून त्यांच्या संख्येनुसार अंतिम विजयी होणाऱ्या घोड्यांच्या यादीत त्यांना प्रतिनिधित्व देण्याचे ठरले.
पण आता इथे गंमत अशी आहे की शर्यतीतील सर्वांर्ताने कमकुवत असणाऱ्या मुस्लिम विद्यार्र्थी नावाच्या घोड्याला वर्षानुवर्षे शर्यतीतील सर्वांत सशक्त अश्या खुल्या प्रवर्गातील घोड्यांसोबत शर्यतीत सामील केले गेले (सच्चर समितीच्या अहवालानुसार मुस्लिम समाजाचे मागासलेपण हे दलित समाजापेक्षा ही अधिक आहे). आता सर्वांत सशक्त घोड्यांमध्ये आमचा सर्वार्र्थाने कमकुवत असलेला घोडा कसा काय जिंकणार..? तरीसुद्धा आमचे घोडे मर्यादित संसाधनांसोबत शर्यतीत भाग घेत आहेत आणि यातील एखाद दुसरा घोडा अंतिम यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी होत आहे. म्हणून २०१९ च्या तीनही यशस्वी विद्याथ्र्यांचे विशेष कौतुक. खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या ११५ जागांपैकी ३ जागांवर यशस्वी २.६टक्के). -
अ) मुस्लिम ओबीसी :
आरक्षणांचा दुसरा मुद्दा असा की मुस्लिम समाजातील ओबीसीमध्ये समाविष्ट असलेल्या जातींमधील विद्याथ्र्यांना फार यश लाभत आहे अशातलाही प्रकार नाही. मागील वर्षांची आकडेवारी निराशाजनकच आहे. मुस्लिम समाजातील खुल्या प्रवर्गातील जाती जर एवढ्या मागासलेल्या असतील तर मुस्लिम ओबीसीबद्दल कल्पना न केलेलीच बरी. त्याची आकडेवारी हा परत वेगळा संशोधनाचा विषय.
ओबीसी घोड्यांच्या शर्यतीत मुस्लिम ओबीसी घोड्यांची खुल्या प्रवर्गातील मुस्लिमांप्रमाणेच वाताहत झालेली आहे, किंबहुना थोडी जास्त. म्हणजे अशक्तातील अशक्त घोड्याला दुसऱ्या सर्वाधिक सशक्त घोड्यांच्या शर्यतीत सामील केलेले आहे. त्यामुळे वेगळा निकाल काय लागणार..? या वर्षी ओबीसीला १९ टक्के आरक्षणाप्रमाणे ८६ जागा होत्या, त्यात केवळ एक मुस्लिम ओबीसी उमेदवार यशस्वी होऊ शकला (१.१६ टक्के). ओबीसी मुस्लिमांना नोकरीमध्ये या आरक्षणाचा किती फायदा होतो किंवा ते किती फायदा करून घेतात याचं त्यांनी चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. आरक्षण असून आणि नसून मुस्लिम समाज प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये पार देशोधडीला लागला आहे हे नक्की.. ‘लेकिन मैं नाउम्मीद नहीं के मायूसी कुप्रâ है',
क्यूं के अल्लामा इक्बाल कहते हैं....
‘ये खामोशी कहां तक, लज्जत-ए-फरियाद पैदा कर जमीं पर तू हो और तेरी सदा हो आसमानों में।'
इथपर्यंत आपण महाराष्ट्रातील मुस्लिम समाजामध्ये ‘प्रशासकीय सेवेत कमी प्रतिनिधित्वाचा' जो रोग जडला आहे त्याच्या लक्षणांची आणि कारणांची सविस्तर चर्चा केली. आता आपण या रोगावरच्या उपायांबद्दल उहापोह करणार आहोत.
१) स्पर्धा परीक्षांबद्दल जागरूकता :
समाजात स्पर्धा परीक्षांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जे मुस्लिम उमेदवार स्वकष्टाने यशस्वी झाले आहेत त्यांचे संपूर्ण राज्यामध्ये मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करणे फार आवश्यक आहे. जे की दुर्दैवाने आपण करत नाहीत किंवा फार कमी प्रमाणात करतो.
२०१६ साली अंसार शेख (आयएएस) जेंव्हा यूपीएससीमध्ये यशस्वी झाले तेंव्हा त्यांचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं. पण तेव्हा एका क्लासने केलेल्या मार्केटिंगमुळे ते शक्य झालं. पण त्यानंतर
त्यांचे किती मार्गदर्शनाचे कार्यक्रम आपण आयोजित केले....? २०१७ साली यशस्वी झालेले सातारचे नासिर मनेर (आयआरएस) बहुतांश महाराष्ट्राला माहीतदेखील नसावेत. २०१८ साली यशस्वी झालेल्या सलमान पटेल (आयआरएस) आणि नूह सिद्दीकी (आयआरएस) यांची मराठवाड्याबाहेर किती व्याख्याने आयोजित केली गेली...? २०१९ साली यशस्वी झालेल्या अहमदनगर येथील झैब शेख (आयपीएस) आणि नाशिक येथील सय्यद रियाझ अहमद (आयएएस) यांची नावे तरी आम्हाला माहीत आहेत का...? आम्ही यांना नायक म्हणून समाजाच्या नव्या पिढीपर्यंत पोहचवू शकलो नाही, म्हणून नवी पिढी सहज उपलब्ध असलेल्या टिकटॉक स्टार्सना आपले नायक समझू लागली.
मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्याचे फायदे :
- स्पर्धा परीक्षेसंबंधी समाजात असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होते.
स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेची ढोबळमानाने माहिती होते. समाजातील नवीन पिढीसमोर नायक (रोल मॉडेल) निर्माण होतात. - समुदायासाठी आरक्षित असलेल्या जागांपैकी १/३ जागांवर यशस्वी होतात.
जास्त अभ्यासासाठी सोबत लिंक देत आहे.
https://m.patrika.com/…/rajasthan-s-st-young-forward-in-be…/
तसेच यशस्वी झालेल्या उमेदवारांनीसुद्धा मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. फक्त मोठमोठ्या शहरांमध्ये व्याख्याने न देता किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये जावे. रमेश घोलप आणि भरत आंधळे यांनी तर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. दोघांनी आजपर्यंत प्रत्येकी किमान एक हजारावर व्याख्याने दिली आहेत. आजही ते समाजमाध्यमांवर विद्याथ्र्यांसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे ग्रामीण भागात जनजागृती होण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लागला. २) शर्यतीतील सहभाग वाढवणे :
मुस्लिम समाजातील विद्यार्र्थी हे स्पर्धा आणि त्यांचे अनुभव यांपासून बालवयापासूनच दूर असतात. त्यामुळे मोठे झाल्यावर स्पर्धा परीक्षांबद्दल उगाच त्यांच्या मनात एक बाऊ निर्माण झालेला असतो.
उपाय :
https://m.patrika.com/…/rajasthan-s-st-young-forward-in-be…/
तसेच यशस्वी झालेल्या उमेदवारांनीसुद्धा मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. फक्त मोठमोठ्या शहरांमध्ये व्याख्याने न देता किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये जावे. रमेश घोलप आणि भरत आंधळे यांनी तर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. दोघांनी आजपर्यंत प्रत्येकी किमान एक हजारावर व्याख्याने दिली आहेत. आजही ते समाजमाध्यमांवर विद्याथ्र्यांसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे ग्रामीण भागात जनजागृती होण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लागला. २) शर्यतीतील सहभाग वाढवणे :
मुस्लिम समाजातील विद्यार्र्थी हे स्पर्धा आणि त्यांचे अनुभव यांपासून बालवयापासूनच दूर असतात. त्यामुळे मोठे झाल्यावर स्पर्धा परीक्षांबद्दल उगाच त्यांच्या मनात एक बाऊ निर्माण झालेला असतो.
उपाय :
- मुलांना लहापणापासूनच स्पर्धेची सवय लावावी. स्कॉलरशिप, नवोदय, विविध विषयांच्या ऑलिम्पियाड, एम.टी.एस., एन.टी.एस. यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच आंतरशालेय स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग वाढवावा.
- यामुळे स्पर्धेला सामोरे कसे जावे, यश-अपयश कसे पचवावे, अपयश आल्यावर पुन्हा जिद्दीने कसे उभे राहावे यांचा अनुभव त्यांना येतो.
- स्पर्धेत यश मिळाल्यावर मुलांचा आत्मविश्वास वाढतो व विविध कारणांमुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली कमीपणाची भावना नष्ट होण्यास मदत होते.
- लहानपणापासूनच स्पर्धेची भीती नाहीशी झाल्याने स्पर्धा परीक्षांकडे मुस्लिम विद्यार्थी जास्त प्रमाणात वळतील.
- मुस्लिम विद्याथ्र्यांमध्ये स्पर्धेची अवड रुजवण्यासाठी अंबाजोगाई येथील तरुणांचा 'अल्फलाह मॉडेल' खरंच सर्वांनी अभ्यासायला हवा आणि अस काही आपआपल्या तालुक्यात सुरू करता येईल का याची चाचपणी प्रत्येकाने करावी. सोबत लिंक देत आहे. https://m.facebook.com/alfalah.group.ambajogai/
(क्रमश:)
- शहेबाज मनियार
(अंबाजोगाई, बीड)
मो.: ८१४९४३४९५२
Post a Comment