धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन पर्यावरणीय विनाशाला धार्मिक निष्ठा जबाबदार असल्याचा ठपका ठेवतो. मात्र याउलट, भौतिक जगावरील विश्वासाचा दृष्टिकोन पारलौकिक निष्ठेच्या तुलनेत पर्यावरणीय विश्वासापेक्षा अधिक हानिकारक आहे. वैज्ञानिक भौतिकवाद आणि लौकिक निराशावाद पर्यावरणीय नैतिकतेशी सुसंगत नाहीत.
जॉन हॉट (John F. Haught - an American theologian) यांच्या मते :
‘‘जर प्रत्येक गोष्ट ‘निरपेक्ष शून्यते’साठी निश्चित असेल आणि भौतिकवाद विश्वाकडे अत्यंत क्षुल्लक आणि अंतिम शोकांतिकेच्या रूपात पाहात असेल तर खरोखरच आपण तिची कदर केली असती? अशा तत्त्वज्ञाद्वारे आपल्याला पृथ्वीच्या सुंदर खजिन्याची काळजी घेण्यासाठी कशा प्रकारे प्रेरित केले जाऊ शकते?हे शक्य आहे, असे आम्हाला वाटते.’’
परलोकावरील श्रद्धा आपल्याला निसर्गावर प्रेम करण्याचे आमंत्रण देते, कारण निसर्गाकडे स्वतःची अंतर्गत भावी इच्छा असते ज्यासाठी आपण इच्छित आहोत, म्हणूनच निसर्गाचा नाश म्हणजे खरोखरच स्वतःला व ब्रह्मांडाला आपल्या भविष्यापासून नष्ट करणे होय. जगातील अनेक वस्तूंच्या अस्तित्वाचे नाविन्य सध्याचे युग आणि जगाच्या समाप्ती दरम्यान सातत्य ठेवण्याची आशा निर्माण करते. सुंदर वातावरण, नैसर्गिक आकांक्षांचे समाधान व आनंद, सुख व शांतीची इच्छा ही स्वाभाविक बाब असली तरी याच्या पूर्ततेसाठी सध्याचे जग पुरेसे नाही. यासाठी धर्म नंदनवनाची (स्वर्गाची) संकल्पना देतो जेथे या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण केल्या जातात.
आपण पृथ्वी आणि नैसर्गिक जगाकडे नंदनवन म्हणून पाहू नये, अशी परलोकावरील श्रद्धेची अपेक्षा आहे. त्याकडून आपण परिपूर्णतेची अपेक्षा करू नये तर ते पूर्ण होण्याची (पारलौकिक जीवनात) आशा बाळगू शकतो. अशा प्रकारे आपण त्याचे दोषही उघड करू शकतो. खरं तर, अनेक पर्यावरणीय समस्या स्वत:साठी सुखकारक स्वर्ग निर्माण करण्याच्या मनुष्याच्या तीव्र इच्छेचा परिणाम आहेत आणि यासाठीच तो नैसर्गिक देणग्या आणि त्याच्या मौल्यवान स्रोतांचा अंधाधुंध वापर करू लागतो. या जगात नंदनवनाची प्राप्ती (स्वर्गप्राप्ती) शक्य नाही. तथापि, कुरआनात उल्लेखित धर्मशास्त्र आणि स्वर्गातील बोधकथा एक उच्च ध्येय ठेवतात जेणेकरून हे ऐहिक जीवन नेहमीच ईश्वराच्या मार्गदर्शनानुसार सर्वोच्च पूर्णतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते.
फक्त पारलौकिक संकल्पनेचा मानवी नैतिकतेशी जवळून संबंध आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. निवाड्याच्या दिवसाविषयी धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी प्रत्येकाला त्याच्या कर्माचा हिशेब द्यावा लागेल कारण तो न्यायाचा दिवस आहे. हा विश्वास लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करतो.
पर्यावरणीय इतिहासकार सायमन (शिमोन) पारलौकिक जीवनाचे महत्त्व असे सांगतात -
‘‘पृथ्वी केवळ एक तात्पुरते निवासस्थान आहे या कल्पनेवर आधारित सर्व मानवी क्रियाकलाप असले पाहिजेत (मनुष्य एक श्रेष्ठ निर्मिती असला तरी) आणि आपली कृती विश्वासाचे प्रकटीकरण म्हणून योग्यरित्या प्रशासित केली जाणे आवश्यक आहे. यामध्ये न्याय आणि धार्मिकता तसेच पर्यावरणाच्या समस्यांचे योग्यज्ञान आणि आकलनाचा समावेश आहे.’’
या चर्चेमुळे आम्हाला असा निष्कर्ष काढण्यास मदत होते की पृथ्वीची पर्यावरण व्यवस्था नष्ट करण्याची परवानगी धर्माचा परिणाम नसून धार्मिक जागृतीच्या अभावाचा परिणाम आहे. जॉन हॉट (John Haught) यांनी याच मताचे समर्थन करताना धर्मनिरपेक्षतेला याच्या खऱ्या अपराधाबद्दल दोषी ठरवले. धर्मनिरपेक्षतेने ईश्वराला ब्रह्मांडापासून वेगळे करून बुद्धिप्रामाण्यवाद, मानवतावाद आणि विज्ञानवाद यांना ही पोकळी भरून काढण्याची संधी दिली. या मतांच्या प्रभावामुळे निसर्गावर मानवी वर्चस्वाची कल्पना नाहीशी झाली.
सर्व प्राणीमात्राची निर्मिती केल्यानंतर अल्लाहने त्यांना एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून ठेवले आणि याच आधारावर जगात संतुलन व समतोल राखला जातो. सर्व प्राणी, सजीव आणि निर्जीव, एक मौल्यवान संपत्ती आहे जी आपल्या अस्तित्वाचा हेतू पूर्ण करण्यात गुंतलेली आहे. जर मनुष्य हे संतुलन बिघडवितो, या नैसर्गिक स्रोतांचा गैरफायदा घेतो, त्यांचा गैरवापर करतो किंवा त्यांचा अपव्यय करतो, त्यांना प्रदूषित करतो तेव्हा त्याचा लौकिक संतुलन आणि न्यायावर परिणाम होईल, जो स्वतः मनुष्यासाठी धोकादायक आहे. म्हणूनच, आपण सर्वांनी या नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षण आणि अस्तित्वासाठी कार्य करणे गरजेचे आहे अन्यथा आपल्याला भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. निसर्गाविरूद्धच्या लढाईत मनुष्याचा पराभव निश्चित आहे. परिणामस्वरूप असे म्हणता येईल की आधुनिक काळातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आधुनिक शोधांचा दुरुपयोगामुळे पर्यावरणीय संकट ओढवले गेले आहे. त्याचा सामना करण्यासाठी धार्मिक शिकवण, नैतिक, मानसिक शुद्धतेला प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.
(भाग ४) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
मो.: ८९७६५३३४०४

Post a Comment