Halloween Costume ideas 2015

सूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(११२) ....जर तुमच्या पालनकर्त्याची ही इच्छा असती की ते असे करू नये तर त्यांनी कधीही केले नसते,८० म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या स्थितीत सोडून द्या की ते कुभांड रचीत राहतील
(११३) (हे सर्वकाही आम्ही त्यांना याचकरिता करू देत आहोत की) जे लोक परलोकावर श्रद्धा ठेवीत नाहीत त्यांची हृदये (या आकर्षक फसवणुकीकडे) आकर्षिली जावीत आणि त्याने ते  प्रसन्न व्हावेत आणि त्या वाईट गोष्टींची कमाई करावी ज्यांची कमाई ते करू इच्छितात.


८०) येथे आमच्या मागील तपशीलाव्यतिरिक्त हे तथ्य मनात चांगल्या प्रकारे बिंबविले पाहिजे की कुरआन अनुसार अल्लाहची इच्छा (मशीयत) आणि त्याची प्रसन्नता (रिजा)मध्ये मोठे अंतर आहे ज्याकडे डोळेझाक केल्याने सर्वसाधारणत: मोठे गैरसमज निर्माण होतात. एखाद्या गोष्टीचा अल्लाहची इच्छा आणि अनुमतीने प्रकट होण्याचा अर्थ अनिवार्यत: असा होत नाही की अल्लाह त्या गोष्टीशी प्रसन्न आहे आणि तिला पसंतसुद्धा करतो.  जगात कोणतीच घटना कधीच घडत नाही जोपर्यंत तसा आदेश अल्लाह देत नाही. आपल्या विशाल योजनेत ती घटित होण्यास वाव ठेवलेला असतो आणि परिस्थितींना ती घटना घटित होण्यासाठी अनुवूâल बनवितो. एखाद्या चोराने चोरी करणे, खुनी व्यक्तीने खून करणे, एखाद्या अत्याचारींचा अत्याचार करणे किंवा उपद्रवीचा उपद्रव माजविणे आणि एखाद्या नाकारणाऱ्याचा नकार आणि बहुदेववाद्यांचे अनेकेश्वरत्व अल्लाहच्या इच्छेशिवाय संभव नाही. अशाप्रकारे  एखाद्या ईमानधारक व ईशभीरू मनुष्याचे ईमान व ईशपरायणतासुद्धा अल्लाहच्या इच्छेविना असंभव आहे. या दोन्ही प्रकारच्या घटना समान रूपात अल्लाहच्या इच्छेनुसार आणि  अनुमतीनेच घटित होतात. परंतु पहिल्या प्रकारच्या घटनांनी अल्लाह प्रसन्न होत नाही. याविरुद्ध दुसऱ्या प्रकारच्या घटनांना अल्लाहची प्रसन्नता, पसंती आणि अल्लाहला प्रिय होण्याचे  प्रमाण प्राप्त् आहे. जरी शेवटी सृष्टीनिर्मात्याची इच्छा महान भलाईच्याच कामात कार्यरत आहे तरी ती श्रेष्ठतम भलाई प्रकट होण्याचा मार्ग प्रकाश व अंधार, चांगले व वाईट तसेच  निर्माण आणि बिघाडकार्याच्या वेगवेगळया शक्ती एकमेकाविरुद्ध संघर्षरत असल्याचेच स्पष्ट दिसून येते. म्हणून आपल्या उच्च्तम ध्येयासाठी तो आज्ञाधारकता व अवज्ञा, इब्राहीमवाद  आणि नमरूदवाद, मूसावाद आणि फिरऔनवाद, मानवतावाद आणि शैतानवाद दोघांना आपापले काम करण्याची संधी देतो. अल्लाहने अधिकारप्राप्त् सजीव (मनुष्य व जिन्न) यांना  चांगले आणि वाईट या दोघांपैकी एक निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या ऐहिक जीवनात ज्यांना वाटेल त्यांनी चागंले कार्य निवडावे  किंवा ज्यांना वाटेल त्यांनी वाईट कार्य निवडावे.  दोन्ही प्रकारच्या कार्यकर्त्याना ज्या सीमेपर्यंत अल्लाहची योजना परवानगी देते तिथंपर्यंत साधनांचे समर्थन प्राप्त् होते. परंतु अल्लाहची प्रसन्नता व त्याची पसंती फक्त भलाईचे काम  करणाऱ्यांनाच प्राप्त् होते. अल्लाहला प्रिय हेच आहे की त्याच्या दासांनी आपल्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन भलाई (सदाचार) चा स्वीकार करावा  ना  की  वाईटाचा. येथे  हेसुद्धा   समजून  घेतले  पाहिजे  की  अल्लाह  सत्याच्या  शत्रूच्या विरोधी कारवायांचा उल्लेख करून आपल्या इच्छेचा  पुन्हा  पुन्हा  हवाला  देतो.  याचा  उद्देश  खरे तर  पैगंबर  मुहम्मद  (स.)  आणि  त्यांच्याद्वारा ईमानधारकांना (श्रद्धावंतांना) हे समजून सांगणे आहे की तुमची कार्यप्रणाली देवदूतांच्या कार्यप्रणालीसारखी नाही. देवदूत (फरिश्ते) तर विनाविरोध अल्लाहच्या  आदेशांचे पालन करीत आहेत. तुमचे वास्तविक कार्य दुष्ट आणि विद्रोहींच्या मुकाबल्यात अल्लाहच्या प्रिय प्रणालीला (इस्लामी जीवनप्रणाली) जगात प्रस्थापित करण्यासाठी अथक  परिश्रम करणे आहे. अल्लाह आपल्या इच्छे अंतर्गत त्या लोकांनाही प्रयत्न व संघर्ष करण्याची संधी देत आहे ज्यांनी आपल्या प्रयत्न व संघर्षासाठी स्वत: अल्लाहकडून विद्रोहाचा मार्ग प्राप्त् केला आहे. त्याचप्रमाणे अल्लाह ज्यांनी आज्ञापालनाचा व ईशपरायणतेचा मार्ग स्वीकारला आहे, त्यांनाही कार्य करण्याची पूर्ण सवलत देतो. अल्लाहची प्रसन्नता, मार्गदर्शन, समर्थन व सहाय्यता तुमच्याचबरोबर आहे कारण तुम्ही ते काम करत आहात जे त्याला पसंत आहे. तरी तुम्ही ही आशा बाळगू नये की अल्लाह आपल्या अनैसर्गिक हस्तक्षेपाने त्या लोकांना ईमानधारण करण्यास विवश करील जे ईमान धारण करू इच्छित नाहीत, तसेच तुमच्या मार्गातून जिन्न व मनुष्यरूपी शैतानाला बळजबरीने दूर करील ज्यांनी आपल्या बुद्धी आणि सामथ्र्याचा आणि साधनांचा सत्यमार्गाला रोखण्यासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही जर खरोखर सत्यासाठी व सदाचारासाठी काम करण्याचा दृढ संकल्प केला आहे तर तुम्हाला असत्यावादींच्या मुकाबल्यात कठीण संघर्ष करून आपल्या सत्यनिष्ठेचे प्रमाण द्यावेच लागेल. अन्यथा केवळ चमत्काराच्या जोरावर चमत्काराने असत्याला नष्ट करणे आणि सत्याला विजयी करणे अपेक्षित असते तर तुमची गरजच काय होती? अल्लाहने स्वत:हा प्रबंध केला असता, की जगात शैतान नसता आणि नास्तिकता व अनेकेश्वरत्व प्रकट होण्याची शक्यताच नसती.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget