Halloween Costume ideas 2015

पर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग २)

nature
पर्यावरण :
पर्यावरणाचा अर्थ शब्दकोषात स्थिती आणि स्वरूपाच्या अर्थासह वापरला जातो, ज्यास अरबीमध्ये ‘बाईट’ म्हणतात. पर्यावरणाचा एक अर्थ खालीलप्रमाणे आहे : जे व्यक्ती आणि समूहाभोवती असते आणि त्यास प्रभावित करते, त्याला म्हणतात नैसर्गिक पर्यावरण, सामूहिक पर्यावरण आणि राजकीय पर्यावरण.
पर्यावरण हा शब्द आसपासच्या सर्व गोष्टींचा संदर्भ देतो.डॉ. सईदुल्लाह काझी लिहितात : ‘‘पर्यावरण प्रदूषण फक्त हवा, पाणी, जमीन आणि मातीशी संबंधित नाही तर त्यात नैतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांचादेखील समावेश आहे.’’ आपले जीवन आणि जगण्यासाठी ज्या गोष्टी आमच्याशी संबंधित आहेत त्या सर्व गोष्टी जसे की गृहनिर्माण, अन्न, पेय, श्वासोच्छवास, वैद्यकीय उपचार आणि काम, तसेच संवाद आणि संबंध अवलंबून असलेल्या सर्व बाबी. या संपूर्ण स्थितीला पर्यावरण म्हणतात.
जर पर्यावरणात समतोल असेल तर मानवी जीवन निरोगी आणि शांत राहील आणि जर पर्यावरण बिघडले तर जीव धोक्यात येईल. जीवनाच्या इतर सर्व बाबींबद्दल, इस्लाम आपल्याला पर्यावरणाशी संबंधित सुवर्ण नियमदेखील प्रदान करतो ज्याद्वारे आपण इस्लाम धर्म आणि जगात दोन्ही ठिकाणी यश मिळवू शकतो.
याच कारणास्तव सर्वशक्तिमान अल्लाहने पर्यावरण संतुलित केले आहे. यामध्ये निर्माणकत्र्याची उच्च कारागिरी स्पष्ट नैसर्गिक पर्यावरण एका विशिष्ट मार्गाने तयार केले आहे, जोपर्यंत त्यामध्ये मानवी हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत ते संतुलित राहील, कारण अल्लाहने पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असलेला जीवनाचा प्रत्येक घटक विशिष्ट गुणधर्म आणि उपयुक्ततेसह तयार केला आहे. अल्लाहने सूचना दिली आहे की,
‘‘आम्ही भूतलाचा विस्तार केला, त्यात पर्वत रोवले, त्यात प्रत्येक जातीची वनस्पती यथायोग्य प्रमाणात उगविली आणि त्यात उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध केली.’’ (कुरआन- १५:१९)
‘‘आणि तोच आहे ज्याने ही पृथ्वी विस्तृत केली आहे, हिच्यात पर्वतांच्या मेखा रोवल्या आहेत आणि नद्या प्रवाहित केल्या. त्यानेच प्रत्येक प्रकारच्या फळांच्या जोड्या निर्माण केल्या आणि तोच दिवसावर रात्र आच्छादित करीत असतो. या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरपणे विचार करतात.’’ (कुरआन- १३:३)
कुरआनमधील या श्लोकांवरून हे स्पष्ट होते की अल्लाहने पृथ्वीवर सर्व काही संतुलित पद्धतीने तयार केले आहे. त्याने अशी वनस्पती तयार केली आहेत की एकीकडे जैविक प्रजातींचे अन्न व गरजा पूर्ण होतात आणि दुसरीकडे वनस्पतींचे प्रकार अशा तऱ्हेने तयार करण्यात आले आहेत जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
आपल्या सभोवती जी काही औषधी घटक आहेत त्यांना त्याच औषधी अवस्थेत ठेवण्यात यावे आणि त्यांना सर्व प्रकारच्या आण्विक आणि अवैद्यकीय विनाशांपासून सुरक्षित ठेवले जावे, याद्वारेच पर्यावरणाचे संतुलन प्रस्थापित होते, असे म्हणणे योग्य ठरेल. परंतु जर मनुष्य या नैसर्गिक घटकांचा अविरतपणे वापर करीत राहिला तर त्यांचे संतुलन राखले जाणार नाही आणि याचा परिणाम असा होईल की ते नेहमीप्रमाणे जैवविविधतेच्या गरजा पूर्ण करू शकणार नाहीत.

(भाग २) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
(मो.: ८९७६५३३४०४)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget