Halloween Costume ideas 2015

शासकीय रूग्णालयास वॉटर प्युरिफायर देऊन साजरा केला डॉक्टर्स डे

लातूर (प्रतिनिधी)
शहरातील मुस्लिम बांधवांकडून डॉक्टर्स डे चे औचित्य साधून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले. त्यामुळे येथील डॉक्टर्स व रूग्णांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
     कोरोनाच्या या जागतिक महामारीच्या काळात अनेक संस्था, संघटना सामाजिक जाणिवेतून आपापल्या परिने काम करत आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सार्वजनिक आणि व्यक्तिगत स्वच्छतेसोबत सकस आहार आणि शुध्द पाणी गरजेचे आहे. तसेच कोरोनाच्या या लढाईत शासकीय रुग्णालये, रुग्णालयातील सर्व कर्मचारी महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. रुग्णांची आणि कर्मचार्‍यांची सोय व्हावी या हेतूने लातूर शहरातील मुस्लिम समाजाकडून डॉक्टर डे च्या औचित्यावर शासकीय रुग्णालयात वॉटर प्यूरिफायर लावण्यात आला आहे. तसेच निस्वार्थपणे सेवेत असणार्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानही करण्यात आला.
    यावेळी अधीष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मंगेश सेलूकर, मुफ़्ती ओवेज़ कासमी, डॉ.असद पठाण, डॉ चेतनकुमार आद्रट, रजाउल्लाह खान, अ‍ॅड रब्बानी बागवान, बरकत काज़ी, सय्यद शाहबाज़ यांची उपस्थिती होती.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget