मुंबई
जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी मंगळवारी रात्री मुंबईच्या दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अशा घटना रोखण्यासाठी भविष्यात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी जेणेकरुन भारताच्या सामाजिक न्यायाच्या प्रतिक्याचे संरक्षण निश्चित केले जाऊ शकेल.
जमात-इस्लामी महाराष्ट्रचे अध्यक्ष रिझवानर रहमान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "राजगृह हे फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे घर नव्हते, तर ते स्थान भारतातील सामाजिक न्यायासाठी संघर्ष आणि लोकशाहीवर विश्वास असणार्या नागरिकांच्या वारसा यांचेही प्रतीक आहे." तोडफोड करण्याच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करतो.

Post a Comment