Halloween Costume ideas 2015

ऑनलाइन शिक्षण : श्रीमंतांचं जमलं, गरीब विद्यार्थी मात्र वंचितच!

Online Education
जगात पसरलेली कोरोना महामारी आणि तिला आळा घालण्यासाठी देश व जगात सुरू असलेल्या लॉकडॉनमुळे संपूर्ण जगाचे सिस्टम बिघडून गेले. या कोरोनाने जगातील प्रत्येक व्यक्तीला हैराण करून सोडले आहे. या कोरोनाचा अर्थव्यवस्था व व्यापाराबरोबरच शिक्षणावरही प्रभाव दिसून येतो. मार्चपासून जे शिक्षणाचे गणित बिघड़ले ते अद्यापपर्यंत सुरळीत झालेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोनाचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना व वयस्कर माणसांना असतो, कारण त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते आणि याच भीतीने प्रत्येक जण घरातच सुरक्षित झाला आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाच्या भीतीने शाळा बंद आहेत. अशा वेळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ‘ऑनलाइन शिक्षण' सुरू केले जे वाखाणन्याजोगे कार्य असले तरी पद्धतीमध्ये अनेक त्रुटी सुद्धा आहे ज्यामुळे हा उपक्रम सपशेल फ्लॉप करीत आहे. ऑनलाइन शिक्षण कार्यक्रमाचा उद्देश जरी राज्याच्या सर्व विद्यार्थ्यांना लॉकडॉनच्या काळात घरबसल्या शिक्षण देणे हा असला तरी खऱ्या अर्थाने या ऑनलाइन शिक्षणाचा फायदा फक्त आणि फक्त शहरांचे व त्यातल्या त्यात अशा लोकांच्या पाल्यांना होत आहे जे श्रीमंत आहेत, जे आपल्या पाल्याला स्मार्टफोन सोबत इंटरनेटची सुविधा पुरवू शकतात. पण अशा विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. यातच जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर या ऑनलाइन शिक्षणाचा त्यांना काहीच फायदा नाही. असे गरीब लोक ज्यांच्यासाठी या लॉकडॉनच्या काळात दोनवेळच्या भाकरीचा बंदोबस्तदेखील फार कठीणईने होतो, ते आपल्या पाल्याला स्मार्टफोन व इंटरनेटसाठी पैसे कुठून आणणार? अशाने या ऑनलाइनचा उपयोग शहरी भागातील व श्रीमंतांच्या मुलांना तर हमखास होईल, मात्र गरीब कुटुंबांची मुले या शिक्षणापासून वंचित राहणार हे सत्य आहे. मग शासन श्रीमंत विद्यार्थी व गरीब विद्यार्थी असा भेदभाव का करू पाहत आहे?
या ऑनलाइन शिक्षणामुळे एकीकळे श्रीमंत विद्यार्थी पुढे निघून जातील, परंतु ऑनलाइन शिक्षणापासून वंचित गरीब विद्यार्थी शिक्षणात मागे राहतील. मग शासनाच्या ‘सब पढ़े, सब बढ़े' या संकल्पनेचे उद्दिष्ट कसे साध्य होणार? ऑनलाइन शिक्षणात फक्त श्रीमंत व गरीबाचा विषय नसून याव्यतिरिक्तही त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. जसे, शाळेत विद्यार्थी शिक्षकाच्या समोर असतात, पुस्तक समोर असते, प्रत्येक विषय व मुद्द्याला शिक्षक विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार त्यांना समजून सांगतात, जर एखाद्या विद्यार्थ्याला समजले नाही तर त्याला दोनदा, तीनदा समजून सांगतात. पण ऑनलाइन शिक्षणात हे शक्य नाही. या शिक्षणात काही हुशार विद्यार्थी शिकू शकतात मात्र ज्यांची आकलन शक्ती कमी आहे ते समजू शकणार नाहीत. या व्यतिरिक्त विद्यार्थी शाळेत शिक्षकाच्या उपस्थितीत वर्गात जसे शिस्तीतज्ञानार्जन करतात, ते ऑनलाइनमध्ये नाही करू शकत. शाळेच्या वर्गात त्याचे भरपूर वर्गमित्र असतात आणि त्यांच्यात आपसात शिकण्याची व पुढे जाण्याची एक प्रकारची स्पर्धा असते, या उलट ऑनलाइन शिक्षणमध्ये विद्यार्थी एकटाच असतो, ज्यामुळे त्याला शिकण्याचा कंटाळा येऊ शकतो.
ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट आवश्यक आहे, पण ग्रामीण भागात नेटवर्क नसते किंवा फार कमी असते ज्यामुळे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही व तो शिक्षणापासून वंचित राहू शकतो. आम्ही हे जरी मान्य केले की गुरुजनवर्ग ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतात पण विद्यार्थ्यांमधील नैतिक दोष ऑनलाइन शिक्षणाद्वारे दूर करता येत नाही. ऑनलाइन शिक्षण पद्धतीचे सर्वांत मोठे नुकसान विद्यार्थ्यांच्या हातात स्मार्टफोन (जे अनेक वाईट मार्ग व अश्लीलतेचे कारण आहे) देऊन त्यांच्याकडून आमचा पाल्य या मोबाईल व इंटरनेटचा फक्त चांगला उपयोग करेल ही अपेक्षा ठेवणे आमची मूर्खता ठरू शकते.
असा न होवो की आम्ही आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल बनविण्याच्या आनंदात त्यांच्या सुपूर्द स्मार्टफोन करून त्यांना वाईट व अश्लील दुनियेत ढकलून त्यांच्या जीवनात अंधकार आणण्याचे कारण आपण बनावे, कारण स्मार्टफोन जितका उपयोगी आहे, त्याच्या कित्येक पटीने तो घातकसुद्धा आहे. या लेखचा उद्देश शासनाच्या या शिक्षण पद्धतीवर टीका करणे नव्हे, पण शासनाने या ऑनलाइन शिक्षण पद्धतीवर पुन्हा एकदा विचार करावा आणि लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात कोणती अशी पद्धत असेल ज्याच्या मदतीने श्रीमंत, ग़रीब, हुशार व कमी हुशार अशा सर्वच विद्यार्थ्यांना समान शिक्षण दिले जाऊ शकते, जेणेकरून मूलभूत शिक्षणापासून वंचित एकाही विद्यार्थ्याच्या तोंडून शासनाबद्दल हे उद्गार निघता कामा नयेत.

- शेख साबेर, टेंभुर्णी, जालना
मोबाइल: ९४२१३२७०३४

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget