Halloween Costume ideas 2015

अपरिहार्य वास्तवाचा सामना न करता त्यागाचा उच्च आदर्श

वर्षभर ‘ईद उल अजहा’ (बकरी ईद) या सणाची वाट पाहणाऱ्या शेळीपालकांवर कोरोनामुळे संकट आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई, पुणे यांसारख्या प्रमुख शहरांत बोकडांची खरेदी-विक्री होत नसल्यामुळे सणाच्या दृष्टीने तयार केलेले बोकड ठेवायचे की कवडीमोल दराने विक्री करायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे. एकूणच शेळीपालक शेतकऱ्यांनी कोणताही मार्ग स्वीकारला तरी आर्थिक हानी निश्चित होणार आहे. शेतीला पूरक म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामध्ये खास करून उच्चशिक्षित तरुणांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मटण व्यवसायात बोकडांची मागणी असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मटण व्यवसायास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातल्याने व त्यानंतर स्थानिक बाजार बंद ठेवल्याने बोकाडांची खरेदी-विक्री ठप्प झाली होती. मागील राज्य आणि केंद्राच्या लॉकडाउनमध्ये मटण विक्रीस परवानगी दिल्याने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. मात्र, शेळीपालन व्यवसाय हा ‘ईद उल अजहा’च्या दृष्टिकोनातून केला जातो. मात्र, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाउन व शेळी-मेंढ्यांचे विस्कळित बाजार तसेच जिल्हाबंदीमुळे शहरी मुस्लिम बांधव येऊ शकत नसल्यामुळे बोकडांचे व्यवहार जवळपास ठप्प झालेले आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने ईद उल अजहा साध्या पध्दतीने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. या सर्व गोष्टींचा शेळीपालकांच्या अर्थकारणावर अनिष्ट परिणाम झाला आहे. वर्षभर ‘ईदुल अजहा’च्या आशेवर वजनदार तयार केलेल्या बोकाडांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वजनदार केलेली बोकडे भविष्यात कमी किमतीने अथवा पुढील सणापर्यंत या बोकडांचा सांभाळ करण्याचा पर्याय शोधावा लागणार आहे. मात्र, या दोन्हीतील कोणताही पर्याय स्वीकारला तरी नुकसान नक्कीच होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे. यामुळे या प्रकल्पासाठी काढलेले कर्ज थकणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील जवळपास ५०० गोटफार्ममध्ये दहा महिन्यांपासून ‘ईद उल अजहा’च्या कुर्बानीसाठी तयार होत असलेले राजस्थानमधील सोजन जातीचे अडीच लाख बोकड पडून आहेत. कुरबानीसाठी ४० ते ५० हजारांचा बोकड घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे गोटफार्ममध्ये शेळीपालन करणाऱ्या शेकडो तरुण शेतकऱ्यांना किमान दहा कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. एका गोटफार्ममध्ये ४० ते १०० बोकडांचे संगोपन केले जाते. ‘ईद उल अजहा’च्या महिन्यापूर्वीच या बोकडांची खरेदी-विक्री सुरू होते. यंदा कोरोनामुळे मुंबईत बोकडांची खरेदी-विक्री दिसत नाही. अशा परिस्थितीत एवढे बोकड विकावेत कुठे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. देवनार पशुवधगृहात दरवर्षी भारताच्या विविध राज्यांमधून दोन ते अडीच लाख बकरे विक्रीसाठी आणले जातात आणि कुर्बानीसाठी मुस्लिम बांधव मोठमोठ्या रकमेच्या बोली लावून या बकऱ्यांची खरेदी करतात. परंतु कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा ‘ईद उल अजहा’ही साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. कुरबानी देण्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाच्या व्यावहारिक अडचणींमुळे लोकांना प्रचंड अस्वस्थता जाणवली. फोन किंवा इंटरनेटद्वारे शेळ्या मिळविणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य होते. म्हणूनच मुस्लिम भागातील छोट्या बाजारपेठा सरकारने आयोजित केल्या असत्या तर लोकांनी सामाजिक अंतर राखून कुरबानीच्या जनावरांची खरेदी-विक्री केली असती आणि शेळीपालक शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला नसता आणि मुस्लिम त्यागातून आपली धार्मिक कर्तव्ये पार पाडतील आणि ही क्रिया बिघडलेल्या अर्थव्यवस्थेसाठीही फायदेशीर आहे. याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होईल. दरवर्षी हजची सुरुवात आणि ‘ईदुल अजहा’ हा सण साजरा होत असताना जनावरांच्या कुरबानीचा मुद्दा आणि त्यानंतर मुस्लिमांच्या मांसाहाराचा मुद्दा जगभरात उपस्थित होतो त्याला आपला देश अपवाद नाही. या वेळी मात्र नेहमीच्या मुद्द्याबरोबरच मुस्लिम समाजावर आपले धार्मिक विधी पार पाडताना आणि सण साजरे करताना कोरोना या महामारीच्या मुद्द्याची भर पडली आहे. इस्लामच्या दृष्टिकोनातून जनावराची अनिवार्य कुरबानी हीच एक प्रतीकात्मक परंपरा असल्याकारणाने पुन्हा तोच विधी प्रतीकात्मक पद्धतीने करणे धार्मिकदृष्ट्या अयोग्य ठरतो. इस्लाममध्ये क्रोधित देवाला प्रसन्न करण्यासाठी कुरबानीच्या विधीची परंपरा नसून वैयक्तिक त्याग आणि अल्लाहच्या पैगंबरांनी सादर केलेल्या बलिदानाची ही परंपरा आहे. अल्लाहचे आभार मानण्याचे एक प्रतीक आहे. बलिदानाच्या स्वरूपात एखाद्याची वैयक्तिक इच्छारूपी त्याग अल्लाहलाकरिता सादर करणे आहे. म्हणूनच आतापर्यंत या घटनेचे पालन करण्याच्या वार्षिक परंपरेचे कुरआनातील शिकवणींनुसार अनुसरण करणे क्रमप्राप्त ठरते. तद्वतच मुस्लिम बांधव प्रतीकात्मक कुरबानीच्या मांसाचे समाजातील गरीब व गरजवंतांना वाटप करून ईदच्या हर्षोल्हासात त्यांना सहभागी करून घेतात. अल्लाह आपल्या अंत:करणाचे समर्पण स्वीकारतो. एकात्मकतेचा भाग म्हणून आध्यात्मिक आयाम आणि सर्व सजीवांबद्दलचा आदर समाविष्ट करण्यासाठी लोकांचे जीवन समजून घेणेदेखील विस्तृत करतो. ज्याद्वारे अपरिहार्य वास्तवाचा सामना न करता त्यागाचा उच्च आदर्श जपता येतो.   

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget