मागच्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय पटलावर एक महत्त्वाची घटना घडली, जिचे पडसाद युरोपसह रशियामध्ये सुद्धा उमटले. ती घटना म्हणजे तुर्कीच्या इस्तांबुल शहरातील अया सोफिया या ऐतिहासिक संग्रहालयाचे रूपांतरण मस्जिदमध्ये करण्यात आले. 10 जुलै रोजी स्थानिक कोर्टाने या संग्रहालयाला मस्जिद म्हणून घोषित केले व 11 जुलै रोजी राष्ट्रपती रज्जब तय्यब उर्दगान यांनी कोर्टाच्या आदेशाच्या आधीन राहून सदरचे संग्रहालय मस्जिदीमध्ये रूपांतरित होत असल्याचा आदेश जारी केला आणि 86 वर्षानंतर रविवार 12 जुलै 2020 रोजी येथे पहिल्यांदा अजान देण्यात आली. त्या अजानची्निलप जगात सर्वत्र व्हायरल झाली.
अया सोफियाचा इतिहास
1700 वर्षापूर्वी युरोपमध्ये रोमन साम्राज्य अस्तित्वात होते. त्याचे दोन भाग होते. पूर्व भागाची राजधानी बैंजनटाईन तर पश्चिमी भागाची राजधानी मेडिओलानो (इटालीतील सध्याचे मिलान शहर) म्हणून त्या काळी ओळखली जात होती .
त्या काळामध्ये या दोन्ही रोमन साम्राज्यात अनेक देवतांची पूजा केली जात असे. स्वतः राजालाही देवाचा अवतार समजून ’सज्दा’ केला जात असे. पूर्व रोमान साम्राज्याचा पहिला राजा कॉन्स्टन्टाईन (प्रथम) याने सर्वप्रथम ख्रिश्चन धर्म स्विकारला म्हणून ख्रिश्चन हा या साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. कॉन्स्टन्टाईन प्रथम याने सन 330 मध्ये एक नवीन राजधानीचे शहर वसवले आणि त्या शहराचे नाव ठेवले कॉन्स्टेन्टीनोपल ज्याला आज इस्तांबुल म्हणून ओळखले जाते. रोमन बायझेन्टाईन सम्राट जस्टेनियन याने सन 532 साली जगातील सर्वात मोठा चर्च बांधण्याचा निर्णय केला आणि तसे आदेश त्या काळातील दोन प्रसिद्ध वास्तू विशारदांना दिले. 10 हजार मजूर कामाला लावले. आफ्रिकेमधून प्नया चुन्याच्या विटा मागविल्या, जगातील काना कोपऱ्यातून मौल्यवान दगड मागविले, भिंतीमध्ये सोने आणि चांदी भरली व 537 मध्ये ही इमारत बांधून तयार झाली. ही इमारत ग्रीक स्थापत्य कलेचा शानदार नमूना म्हणून आज 1500 वर्षानंतर सुद्धा जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येणेप्रमाणे हे चर्च ऑर्थोडो्नस ख्रिश्चनांचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनले.
सदरची इमारत एशिया आणि युरोपला विभागणाऱ्या बास्फोरस नदीच्या पश्चिमी किनाऱ्यावर आहे. या नदीच्या अलिकडे म्हणजे पुर्वेला एशिया तर पलिकडे म्हणजे पश्चिमेला युरोप आहे. अया सोफिया हा मूळ ग्रीक शब्द असून, त्याचा अर्थ ’ईश्वराची अनुभूती देणारा पवित्र विवेक’ असा आहे. मुस्लिम साम्राज्याच्या ताब्यात आल्यानंतर मात्र या मस्जिदीचे नाव आया सोफिया असे पडले. ज्याचा अर्थही पवित्र विवेक असा होतो.
13 व्या शतकात युरोपीयन ख्रिश्चनांनी हल्ला करून या चर्चचे मोठे नुकसान केले आणि त्याचे रूपांतर कॅथोलिक चर्चमध्ये केले. आणि कॉन्स्टीन्टीनोपलवर त्यांचा एकछत्री अमल सुरू झाला. कॉन्स्टीन्टीपोलचा किल्ला त्याकाळी अजय मानला जात होता. त्यावर अनेक देशांनी अनेक वेळा चढाया करून आपले अतोनात नुकसान करून घेतले होते. या संदर्भात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची एक भविष्यवाणी असल्याची अख्यायिका आहे की, ’’कॉन्स्टेन्टीनोपल एक लाल सफरचंद असून, एक दिवस असा येईल की ते सफरचंद एक मुस्लिम राजा हस्तगत करेल’’ प्रेषित सल्ल. यांची ही भविष्यवाणी खरी करून दाखविण्यासाठी अनेक मुस्लिम राजांनी कॉन्स्टेन्टिनोपलवर चढाया केल्या. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली. शेवटी तुर्क ऑटोमन सम्राट मेहमत द्वितीय याने वयाच्या 24 व्या वर्षी म्हणजे 6 एप्रिल 1453 रोजी कॉन्स्टेन्टीपोलच्या किल्ल्याला वेढा घातला. आणि 29 मे 1453 रोजी त्याने हा किल्ला आणि कॉन्स्टेन्टीपोल शहर जिंकले. तुर्कीमध्ये मुहम्मद हा शब्द मेहमत असा उच्चारला जातो. मेहमत ने कॉन्स्टेन्टीनोपल या नावाचे तुर्की रूपांतरण ’इस्तांबुल’ असे केले आणि जेव्हा त्याने अया सोफिया चर्चमध्ये प्रवेश केला तेव्हा तो त्या चर्चच्या अद्भूत सौंदर्याने अभिभूत झाला. त्याने तात्काळ त्या चर्चचे रूपांतर मस्जिदीमध्ये करण्याचे आदेश दिले. मात्र मूळ चर्चच्या बांधकामात कुठलाही धक्का लागणार नाही याची दक्षता घेण्यास फर्माविले. त्यानंतर तूर्क स्थापत्य शास्त्रज्ञांनी चर्चमध्ये ज्या-ज्या ठिकाणी ख्रिश्चन चिन्हे होती त्यांच्यावर प्लास्टर करून त्यावर रंगरंगोटी केली आणि चारही बाजूला 80 फूट उंचीचे चार भव्य असे मिनार उभे केले. एका शुक्रवारी यामध्ये पहिल्यांदा शुक्रवारची नमाज अदा करण्यात आली, ज्यात मेहमत फातेह स्वतः नमाजमध्ये सामील झाला. मेहमत फातेहने जरी कॉन्स्टेन्टीनोपल जिंकले तरी या इमारतीची किंमत त्याने पराजित ख्रिश्चन राजाला अदा केल्याचे ऐतिहासिक पुरावे होते. जे की कोर्टात दाखल करण्यात आले, अशी माहिती सुद्धा पुढे आली आहे. येणेप्रमाणे 29 मे 1453 पासून ते 1934 सालापर्यंत 441 वर्ष ही मस्जिद म्हणून राहिली.
मस्जिदीचे संग्रहालयामध्ये रूपांतर
इ.स.537 मध्ये बांधलेले अया सोफिया हे चर्च 13 व्या शतकापर्यंत आर्थोडो्नस चर्च म्हणून ओळखले गेले. 29 मे 1453 पर्यंत कॅथोलिक चर्च म्हणून ओळखले गेले. 29 ऑ्नटोबर 1934 पर्यंत मस्जिद म्हणून ओळखले गेले आणि 1934 ते 11 जुलै 2020 पर्यंत ते तुर्कीचे राष्ट्रीय संग्रहालय म्हणून ओळखले गेले ते परत 11 जुलै 2020 पासून पुनःश्च मस्जिद म्हणून ओळखले जात आहे.
चर्चचे संग्रहालयात रूपांतरण
441 वर्ष मस्जिद म्हणून राहिलेल्या या इमारतीचे रूपांतर तुर्कीच्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये कसे झाले? हे सुद्धा पाहणे कमी रोचक नाही. पहिले विश्वयुद्ध 1914 साली सुरू झाले ते 1918 साली संपले. या दरम्यान, ऑटोमन साम्राज्याने जर्मनीची साथ दिली होती. जर्मनीचा पराभव झाला. आणि दोस्त राष्ट्रे म्हणजे ब्रिटन, अमेरिका, ग्रीस, रशिया यांचा विजय झाला. या विजयामध्ये अरब आणि ऑटोमन साम्राज्याचा एक तुर्क सरदार मुस्तफा कमालपाशा अतातुर्क याने इंग्रजांची साथ दिली होती. म्हणून बक्षीस म्हणून अरबांना सऊदी अरब तर मुस्तफा कमालपाशा अतातुर्क याला तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष करून दोस्त राष्ट्रांनी त्यांच्या उपकारांची परतफेड केली. 29 ऑ्नटोबर 1923 रोजी 625 वर्षाच्या वैभवशाली इतिहास असलेले ऑटोमन साम्राज्य नष्ट झाले व रिपब्लिक ऑफ तुर्की अस्तित्वात आले आणि या रिपब्लिक ऑफ तुर्कीला पूर्णपणे इस्लामी प्रभावापासून मु्नत करून तथाकथित से्नयुलर तुर्की बनविण्याच्या नादात मुस्तफा कमालपाशा याने तुर्कीचे अंधाधुंद पाश्चीमात्यीकरण करून टाकले. सर्व इस्लामी ओळखचिन्हे पुसून टाकली आणि 1934 साली कॅबिनेटच्या एका बैठकीत ठराव घेऊन या मस्जिदीचे रूपांतर राष्ट्रीय संग्रहालयात करून टाकले. ज्यामुळे युरोप, अमेरिका आणि रशियामध्ये त्याच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले व अतातुर्क (राष्ट्रपिता) ही पदवी बहाल करण्यात आली. तेव्हापासून ही मस्जिद 10 जुलै 2020 पर्यंत राष्ट्रीय संग्रहालय म्हणून ओळखली गेली आणि कोर्टाने 9 जुलै 2020 रोजी मुस्तफा कमाल पाशा याच्या 1934 च्या कॅबिनेटचा निर्णय रद्द करून सदरची इमारत मस्जिद असल्याचे पुनःश्च जाहीर केले. येणेप्रमाणे ही मस्जिद पुनःश्च सुरू झाली.
प्रतिक्रिया
रज्जब तय्यब उर्दगान यांचा निर्णय अनेकांच्या पसंतीला पडला नाही. युरोप, अमेरिका, रशियापर्यंत त्यांच्या या निर्णयाचे पडसाद उमटले. ग्रीसमध्ये तर लोकांनी रस्त्यावर येऊन निषेध नोंदविला. अनेक मुस्लिम राष्ट्र विशेषतः अरब राष्ट्रांना तुर्कीचा हा निर्णय पसंत पडला नाही. भारतातही कॉम्रेड इरफान हबीब पासून जावेद अख्तर व इतर अनेक से्नयुलर मुस्लिमांनी या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेषतः अरब राष्ट्रांचे म्हणणे आहे की जी इमारत 1934 पासून संग्रहालय होती व ज्याचे मूळ बांधकाम चर्चम्हणून झाले त्याला मस्जिद म्हणून रूपांतरित करणे हे इस्लामच्या दृष्टीनेही योग्य नाही.
इस्लामी दृष्टीकोन
हे खरे आहे की, कुठलीही मस्जिद बळकावलेल्या जमिनीवर किंवा इमारतीवर बांधता येत नाही. म्हणूनच मेहमत द्वितीय याने या इमारतीचे मूल्य चुकविल्याचे ऐतिहासिक दाखले आढळून येतात. म्हणून हे म्हणणे चुकीचे आहे की, या इमारतीचे मस्जिदीमधील रूपांतर हे गैरइस्लामी आहे. युरोप आणि अमेरिकेमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक चर्च मुस्लिमांनी रितसर खरेदी करून त्याचे रूपांतरण मस्जिदीमध्ये केल्याचे दाखले आहेत. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ही प्रक्रिया जर कायदेशीर आणि शरई आहे तर सुलतान मेहमत ने चर्चचे जे मुल्य अदा केले त्याकडे कसे दुर्लक्ष करता येईल?
मध्ययुगात साम्राज्याचा विस्तार ही एक कायदेशीर प्रक्रिया होती. त्यामुळे विजेते लोक हे पराजित लोकांच्या भूभागावर आपल्या मनाप्रमाणे बांधकाम करत होते. ते त्या काळातही कायदेशीर मानले गेले. याचे सर्वात ज्वलंत उदाहरण स्पेन आहे. 800 वर्षे ज्या ठिकाणी मुस्लिमांचे साम्राज्य होते ते जेव्हा खालसा करून ख्रिश्चनांनी पुनःश्च स्पेनवर ताबा मिळविला तेव्हा स्पेनमधील हजारो मस्जिदी उध्वस्त करून त्या ठिकाणी चर्चेस उभारण्यात आले. सर्वात मोठे उदाहरण तर ’मस्जिद-ए-कर्तबा’चे आहे. अया सोफियाप्रमाणे मस्जिदे कर्तबा ही सुद्धा युनेस्कोची मान्यताप्राप्त मस्जिद असून, ती मुळात अब्दुरहेमान दुखूल यांनी बांधली होती. जिचे रूपांतरण विजयी ख्रिश्चन सम्राटांनी चर्च म्हणून केले. मस्जिदीच्या मीनारला धक्का न लावता त्याच्या चोहीबाजूंनी नवीन भिंत बांधून वर मोठी घंटी बांधून त्याचे घंटाघर बनवून मस्जिदे कर्तबाचे रूपांतरण चर्चमध्ये केले. ते आजसुद्धा चर्च म्हणूनच ओळखले जाते. त्या ठिकाणी नमाज अदा करणे तर दूर साधा सज्दा करता येत नाही. ही वर्तमान स्थिती आहे. 1932 साली जेव्हा कवी इ्नबाल या ऐतिहासिक मस्जिदीला भेट देण्यासाठी गेले तेव्हा त्यांना 2 रकआत नमाज अदा करण्याची सरकारची विशेष परवानगी घ्यावी लागली. त्या मस्जिदीच्या वैभवाला पाहून त्यांनी त्याच ठिकाणी 67 कडव्यांची एक नज्म लिहिली जी कुल्लियात-ए-इ्नबालमध्ये आजही अस्तित्वात असून, इ्नबालचे एक मास्टरपीस म्हणून ओळखली जाते. जेव्हा स्पेनची कर्तबा मस्जिद विजेत्या ख्रिश्चनांनी चर्चमध्ये रूपांतरित केलेली आहे. त्यावर हे तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक काही बोलत नाहीत आणि तुर्कीने संग्रहालयाचे रूपांतर मस्जिदीमध्ये करताच यांना पोटशुळ उठतो.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या सीरत (चरित्र)वरूनही ही गोष्ट सिद्ध आहे की, सन 8 हिजरीमध्ये म्हणजे इ.स. 632 मध्ये जेव्हा मक्का शहरावर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी विजय प्राप्त केला तेव्हा स्वतः काबागृहातील 360 मुर्त्या फोडून टाकल्या व त्या मूर्तीगृहाचे रूपांतरण अल्लाहच्या घरामध्ये अर्थात मस्जिदीमध्ये केले. या पेक्षा मोठे उदाहरण दूसरे कोणते असेल? यावरून अरब राष्ट्रे तुर्कीशी असलेल्या वैरभावनेतून टिका करत आहेत, हे सिद्ध होते. थोड्नयात अया सोफिया या इमारतीचा प्रवास ऑर्थोडॉ्नस चर्च ते कॅथॉलिक चर्च ते मस्जिद ते राष्ट्रीय संग्रहालय ते पुनःश्च मस्जिद जो झाला त्याचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या सोयीने लावत आहे.

Post a Comment