Halloween Costume ideas 2015

कोरोनातही वजीर रेस्क्यू फोर्सची अखंड सेवा

108 स्वयंसेवक : महापुरात अडकलेल्या 3500 नागरिकांना व 1600 पशुधनाला वाचविले

कोल्हापूर (आशपाक पठाण)
मानसेवा हीच ईश्‍वर सेवा, या भावनेने प्रेरित होऊन शिरोळ तालुक्यातील औखाड गावात अब्दुल रऊफ निसार पटेल यांनी वजीर रेस्क्यू फोर्सची स्थापना केली. परिसरात वारंवार येणार्‍या आसमानी व सुलतानी संकटांनी गावबांधवाची स्थिती पहावत नव्हती. त्यामुळे प्रारंभी त्यांनी रक्तदान शिबीरे, स्वच्छ भारत अभियान, वृक्ष लागवड आदी कार्यक्रमे हाती घेऊन स्वयंसेवकांना समाजकार्याची आवड निर्माण केली. त्यांना आपतकालीन स्थितीत कसे काम करायचे, याचे मार्गदर्शनही त्यांनी विविध तज्ज्ञामार्फत दिले. त्यामुळे     शिरोळ तालुक्यात 2005 साली आलेल्या भयंकर महापुरातून फोर्सने 11 गावातील 3500 हून अधिक लोकांना जीवदान देऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम केले. आजही ते कोरोनाच्या काळात नागरिकांत जनजागृती करून त्यांना सर्वोतोपरी सेवा पुरविण्याचे काम करीत आहेत.
    ऑगस्ट 2019 साली परत आलेल्या महाप्रलयंकारी महापुराच्यावेळी शिरोळ तालुक्यातील 6 बोटींच्या साह्याने 8732 व्यक्ती व 1600 जनावरांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम केले. महापुरातील आठवणी विसरता-विसरत नाहीत तोपर्यंत कोविड-19 या विषाणूच्या प्रसारामुळे आणखीन एक संकट व आपत्ती लोकांच्यावर आल्यामुळे पुन्हा प्रशासनाच्या खांद्याला-खांदा लावून मागील 3 महिन्याहून अधिक काळापासून कोरोनाच्या लढ्यात काम करत आहेत.
    शिरोळ तालुक्यातील 30 हून अधिक गावात फोर्सचे स्वयंसेवक काम करत आहेत. कोरोनामुळे लोकांना घरी बसून राहण्यापासून, रस्त्यांवर गर्दी होवू नये म्हणून खडा पहारा ही मंडळी देत आहेत. मानव सेवा हीच ईश्‍वरसेवा आहे. या भावनेतून हे तरूण समाजकार्यात मग्न आहेत. या तरूणांच्या समाज कार्यासाठी असणारी ओढ पाहून सगळ्यांनाच सकारात्मक ऊर्जा मिळते. नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती असो वजीर रेक्स्कू फोर्स ही मदतीसाठी कायम तत्पर असते. सध्या त्यांच्या टीममध्ये मुले-मुली मिळून 108 स्वयंसेवक काम करीत आहेत, अशी माहिती संस्थेचे प्रमुख अब्दुल रऊफ पटेल यांनी दिली.
समाजकार्यातून समाधान मिळते...
    कठीण परिस्थितीतून एखाद्याला वाचवून त्याच्या चेहर्‍यावर ज्यावेळी हास्य उमटते तेव्हा समाधान वाटते. ईश्‍वराने आपल्यात जे स्कील दिलेले आहे, त्याचा मानवकल्याणासाठी वापर करणे, हेच आमचा उद्देश आहे. कठीण परिस्थितीत सदैव सकारात्मक विचार करून त्यावर मात करता येते. जेव्हा एखादी व्यक्ती मानवकल्याणाचे हित समोर ठेऊन काम करीत असते तेव्हा ती एकटी नसते. त्याच्यासोबत ईश्‍वराची मदत येत असते. त्यामुळेच आम्ही हजारो नागरिक आणि पशुधनांना वाचवू शकलो. 108 स्वयंसेवक आपत्कालीन स्थितीत काम करण्यासाठी तत्पर असतात. त्यांना सोपविलेले एखादे टास्क तात्काळ पूर्ण करतात. त्यांच्यातील ऊर्जा पाहून सकारात्मक विचार सदैव मनात येत राहतात.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget