Halloween Costume ideas 2015

आजसुद्धा इब्राहीम अलै. सारखा विश्‍वास उत्पन्न झाला तर...

ancient Makkah
ह. इब्राहीम अलै. यांचा जन्म 2000 वर्षे इ.स.पूर्वी इराकच्या उर शहरात झाला. त्यांचे वडील इराकचे सर्वात मोठे मूर्तीकार व पुरोहित होते. इराकमध्ये त्यावेळेस मूर्तीपूजा सामान्यबाब होती. मात्र अगदी लहानपणापासूनच इब्राहीम अलै. यांना मूर्तीपूजेचे आकर्षण नव्हते. त्यांची गणना अतिशय मोठ्या पैगंबरांमध्ये केली जाते. कुरआनमध्ये ह. इब्राहीम अलै. यांच्या अनेक गुणांची चर्चा केलेली आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा अल्लाहवर दृढ विश्‍वास असणे हा होय. त्या विश्‍वासामुळेच अल्लाहच्या कृपेने आयुष्यात येणार्‍या सर्व संकटांना पुरून उरण्याची त्यांच्यात धमक निर्माण झाली होती. म्हणून अल्लाहने त्यांना हनीफ (अल्लाहचा आज्ञाधारक) ही पदवी दिली होती. आणि अल्लाहने इब्राहीम अलै. यांना स्वतःचा मित्र म्हणूनही संबोधित केलेले आहे. त्यांना पृथ्वीवरील सर्व लोकांचा इमाम (नेता) बनविले आहे. आपण जर त्यांच्या दैदिप्यमान जीवनाचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर त्यांचे जीवन एकापेक्षा एक मोठ्या आव्हानांनी भरलेले होते, हे लक्षात येईल.
    इब्राहीम अलै. जेव्हा आपल्या वडिलांना देवी-देवितांच्या मूर्त्या घडवतांना पाहत तेव्हा त्यांच्याकडे पाहून विचार करत की आम्हाला जन्माला घालणारा, पोसणारा आणि मृत्यू देणारा कोण असेल? या मूर्त्या तर असूच शकत नाही. ते विचार करत की, जमीन, आकाश आणि त्या दरम्यान जेवढ्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्या सर्वांना काही ना काही गरजा आहेत. माझा पालनकर्ता असा गरजवंत असू शकत नाही. त्याने तर सर्वांना निर्माण केलेले आहे. तेव्हा त्यांनी सर्वांसमक्ष लोक आराधना करत असलेल्या सर्व देवी देवतांचा इन्कार केला. आणि अल्लाह एक असल्याचा निर्धार व्यक्त केला. एकेश्‍वरवादाची ही घोषणा केल्याबरोबर घरातील आणि बाहेरील लोकांनी त्यांची परीक्षा घ्यायला सुरूवात केली. पहिली परीक्षा सुरह मरियम मधील आयत क्र. 42 मध्ये वर्णन केलेली आहे,        
” (यांना जरा त्या प्रसंगाची आठवण करून द्या) जेव्हा त्याने आपल्या पित्याला सांगितले की, ”हे पित्या, आपण का त्या वस्तूंची उपासना करता ज्या ऐकतही नाहीत आणि पहातही नाहीत आणि आपले कोणतेही काम पार पाडू शकत नाहीत?”
    प्रिय बाबा ! माझ्याकडे एक असे ज्ञान आले आहे जे की तुमच्याकडे नाही. तुम्ही माझ्या मागे चला मी तुम्हाला सरळ मार्ग दाखवीन. तेव्हा वडिलांनी उत्तर दिले तू माझ्या देवी देवतांचा इन्कार करतोयस की काय? तू असे करण्यापासून थांबला नाही तर तुला दगडाने ठेचून मारण्यात येईल. तू मला तोंड दाखवू नकोस. नेहमी करता घरातून निघून जा. आणि जेव्हा इराकचा राजा नमरूद याने इब्राहीम अलै. यांना जीवंत जाळण्याची शिक्षा फरमावली तेव्हा मोठा अग्नीकुंड पेटविण्यात आला. तो अग्नी तांडव बघूनही इब्राहीम अलै. हे आपल्या निश्‍चयापासून तुसभरही ढळले नाहीत. त्यांचा हा दृढ विश्‍वास पाहूनच अल्लाहने त्या अग्नीकुंडाला थंड होण्याचा आदेश फरमाविला आणि जेव्हा इब्राहीम अलै. यांना शिपायांनी अग्नीकुंडात फेकले तेव्हा अग्नी मंद झाला. इतका की विझून गेला आणि इब्राहीम अलै. यांना जरासुद्धा जखम झाली नाही.
    दूसरी परीक्षा यापेक्षा कठीण होती. उतारवयात झालेल्या बाळाला आणि आपल्या प्रिय पत्नीला अरबस्थानाच्या मक्का येथील मरूस्थलामध्ये, जिथे जीवनाची कोणतीच निशाणी दिसत नव्हती, सोडून निघून जाण्याबद्दल अल्लाहने त्यांना आजमावले. या संबंधी कुरआनमध्ये सुरे इब्राहीमच्या आयत क्र. 37 मध्ये तपशील उपलब्ध आहे. तो खालीलप्रमाणे - ” हे पालनकर्ता ! मी एका निर्जल व आसोड खोर्‍यात आपल्या संततीपैकी काहींना तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे, हे पालकनर्ता ! असे मी अशासाठी केले आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी, म्हणून तू लोकांच्या हृदयांना यांच्याकडे आकर्षित कर व यांना खावयास फळे दे, कदाचित हे कृतज्ञ होतील.” सदरील नमूद आयातीप्रमाणे केलेल्या प्रार्थनेप्रमाणे अल्लाहने त्या मरूस्थलामध्ये जमजम नावाचा एक गोड पाण्याचा झरा निर्माण केला व हेच स्थान पुढे मक्का शहरामध्ये रूपांतरित झाले व जगातील सर्व उत्कृष्ट जिन्नसा आजही तेथे उपलब्ध होतात. प्रार्थना स्वीकारली जावी तर अशी.
    तीसरी परीक्षा अल्लाहने अशी घेतली की त्यांना तीन दिवस सारखे स्वप्न पडत होते की ते आपल्या तरूण मुलाला म्हणजे इस्माईल अलै. यांचा अल्लाहच्या हुजूरमध्ये बळी देत आहेत. प्रेषितांना पडलेले स्वप्न हे खरे असते. याबाबत त्यांनी आपल्या मुलाला विचारले असता त्या मुलानेही आपण बळी जाण्यास तयार असल्याचे कळविल्याने इब्राहीम अलै. यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला खाली पाडून त्याच्या मानेवर सुरी चलविली. पण विद्युत गतीने हालचाल करत एक देवदूत त्या ठिकाणी आला आणि इस्माईल अलै. यांच्या जागी त्याने एक मेंढा ठेऊन दिला. इब्राहीम अलै. यांच्या सुरीने क्षणार्धात त्या मेंढ्याच्या मानेचा वेध घेतला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. इब्राहीम अलै. यांनी    जेव्हा बळी पूर्ण झाल्याची जाणीव झाली तेव्हा त्यांनी आपल्या डोळ्याची पट्टी काढली तेव्हा पाहिले की इस्माईल मंद मंद हसत उभा आहे आणि मेंढ्याचा बळी गेलेला आहे. या घटनेचे वर्णन सुरे अस्सफातच्या आयात नं. 104 ते 108 मध्ये खालीलप्रमाणे आलेला आहे.
    ”आणि आम्ही पुकारले, ” हे इब्राहीम, तू स्वप्न साकार केलेस, आम्ही सत्कर्म करणार्‍यांना असाच मोबदला देत असतो. निश्‍चितच ही एक उघड परीक्षा होती. आम्ही एक मोठे बलिदान प्रतिदानात देऊन त्या मुलाची सुटका केली. आणि त्याची प्रशंसा व गुणगान भावी पिढ्यांत सदैव ठेवले.”
    याशिवाय, सुरे बकरामध्ये अल्लाह तआला फरमावितो की, ” आणि आठवण करा इब्राहीम आणि इस्माईल जेव्हा काबागृहाची निर्मिती करत होते तेव्हा प्रार्थना करत होते की, हे आमच्या पालनकर्त्या आमची ही सेवा स्वीकार कर, तू सर्वांच्या प्रार्थना ऐकणारा आहेस. तू सर्वांची गार्‍हाणी ऐकणारा आहेस, तुला सर्व काही ठाऊक आहे. हे अल्लाह! आम्हा दोघांना आपला आज्ञाधारक बनव. आमच्या पिढ्यांमधून एक असा समाज निर्माण कर जो तुझी उपासना करणारा असेल. आम्हाला तुझी प्रार्थना कशा पद्धतीने करावी? याचे ज्ञान दे. आमच्या चुकांकडे दुर्लक्ष कर. तू मोठा क्षमा करणारा आणि दयावान आहेस. आणि हे आमच्या पालकनकर्त्या त्या समाजामधून एक असा प्रेषित जन्माला घाल जो त्यांना तुझे आदेश ऐकवेल. त्यांना ईश्‍वरीय ग्रंथ आणि त्यातील आयातींचा अर्थ समजावून सांगेल आणि त्यांचे जीवन सुंदर बनव. इब्राहीम अलै. यांच्या जीवनातून जी सर्वात महत्त्वाची बाब शिकण्याची आहे ती अल्लाहवर अढळ विश्‍वास. शेवटी अल्लाहच्या हुजूरमध्ये प्रार्थना करते की, हे अल्लाह ! आम्हाला तुझा आज्ञाधारक बनव. तू आमच्या ज्या परीक्षा घेशील त्यात उत्तीर्ण होण्याची योग्यता आमच्यामध्ये निर्माण कर. आणि तुझ्या आज्ञा पालन करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण करा.  (आमीन.)

- खान अर्शिया शकील,
मुंबई 9867377180

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget