(१२४) जेव्हा त्यांच्यासमोर एखादे वचन येते तेव्हा ते सांगतात, ‘‘आम्ही मान्य करणार नाही जोपर्यंत ती गोष्ट स्वत: आम्हाला दिली जात नाही जी अल्लाहच्या पैगंबरांना दिली गेली आहे.’’९१ अल्लाह अधिक चांगल्याप्रकारे जाणतो की आपल्या पैगंबरत्वाचे काम कोणाकडून घ्यावे व कसे घ्यावे? जवळच आहे तो काळ, जेव्हा या अपराधींना आपल्या कुटिलतेपायी अल्लाहपाशी, अपमान आणि कठोर यातनेला सामोरे जावे लागेल.
(१२५) म्हणून (ही वस्तुस्थिती आहे की) ज्याला अल्लाह मार्गदर्शन प्रदान करण्याची इच्छा करतो त्याचे मन इस्लामकरिता मोकळे करतो९२ आणि ज्याला पथभ्रष्टतेत गुरफटविण्याची इच्छा करतो त्याच्या मनाला संकुचित बनवितो आणि अशाप्रकारे बनवितो की (इस्लामचा विचार येताच) त्याला असे वाटू लागते जणू त्याचा आत्मा वर आकाशाकडे गमन करत आहे. (अशाप्रकारे अल्लाह सत्यापासून पलायन व त्याच्या द्वेषाची) अपवित्रता त्या लोकांवर प्रस्थापित करतो जे श्रद्धा ठेवीत नाहीत.९२-अ
(१२६) वास्तविकत: हा मार्ग तुमच्या पालनकत्र्याचा सरळमार्ग आहे आणि त्याची चिन्हे त्या लोकांकरिता स्पष्ट केली आहेत जे उपदेश आत्मसात करतात.
(१२७) त्यांच्या पालनकत्र्याजवळ त्यांच्याकरिता शांतीचे निवासस्थान आहे.९३ आणि तो त्यांचा वाली आहे, त्या उचित कार्यप्रणालीमुळे जी त्यांनी अंगीकारली.
(१२८) ज्या दिवशी अल्लाह या सर्वांना वेढून एकत्र करील त्या दिवशी तो जिन्न९४ (जिन्नरूपी शैतान) यांना संबोधून फर्मावील, ‘‘हे जिन्नसमुदाय! तुम्ही तर मानवजातीचा खूपच उपयोग करून घेतला,’’
प्रत्येकाने एकमेकांचा खूपच उपयोग करून घेतला.९५ आणि आम्ही त्या घटकेपर्यंत येऊन पोहचलो आहोत जी तू आम्हासाठी निश्चित केली होती.’’ अल्लाह फर्मावील, ‘‘बरे तर अग्नी तुमचे निवासस्थान आहे, त्यांत तुम्ही सदैव राहाल.’’ यापासून तेच लोक वाचतील ज्यांना अल्लाह वाचवू इच्छील, नि:संशय तुमचा पालनकर्ता बुद्धिमान व सर्वज्ञ आहे.९६
(१२९) पाहा, अशा प्रकारे आम्ही (परलोकात) अत्याचाऱ्यांना एकमेकाचे सोबती बनवू, हे त्या कर्मामुळे जे ते (जगात एक दुसऱ्याच्या सहकार्याने) करीत होते.९७
९१) म्हणजे आम्ही पैगंबरांच्या त्या विवेचनावर विश्वास ठेवणार नाही की त्यांच्याजवळ देवदूत (फरिश्ता) अल्लाहचा संदेश घेऊन आला. किंबहुना आम्ही त्यांच्यावर तेव्हाच श्रद्धा ठेवू जेव्हा फरिश्ता स्वत: आमच्याजवळ येईन आणि प्रत्यक्ष आम्हाला म्हणेल की हा अल्लाहचा संदेश आहे.
९२) मन मोकळे करणे म्हणजे इस्लामच्या सत्यतेवर पूर्ण संतुष्ट करणे तसेच शंकाकुशंका, गैरसमज, दुविधा यांना दूर करणे आहे.
९२अ) या वाक्याने हे स्पष्ट झाले की जे लोक ईमान धारण करीत नाहीत अशा लोकांचेच हृदय
अल्लाह संकुचित करून टाकतो आणि अशा लोकांना सद्बुद्धी देण्याचा इरादा करीत नाही.
९३) (`सलामतीचे घर') शांतीभुवन म्हणजे स्वर्ग जेथे मनुष्य प्रत्येक आपदेपासून सुरक्षित आणि प्रत्येक वाईटापासून वाचलेला असेल.
९४) येथे जिन्न म्हणजे शैतान जिन्न आहे.
९५) म्हणजे आम्हापैकी प्रत्येकाने दुसऱ्यापासून अनुचित लाभ घेतला आहे. प्रत्येकजण दुसऱ्याला धोक्यात टाकून आपल्या इच्छा पूर्ण करीत राहिला आहे.
९६) म्हणजे यद्यपि अल्लाहला अधिकार आहे की इच्छिल त्याला शिक्षा द्यावी आणि हवे त्याला माफ करावे. परंतु ही शिक्षा आणि माफी निष्कारण निव्वळ इच्छेवर अवलंबून नसेल तर ज्ञान आणि तत्त्वदर्शितेवर अवलंबून असेल. अल्लाह त्याच अपराधीला माफ करील ज्याच्याविषयी तो जाणतो की तो स्वत: आपल्या अपराधाला जबाबदार नाही आणि ज्याच्या बाबतीत अल्लाहची तत्त्वदर्शिता हा निर्णय करील की त्याला शिक्षा दिली जाऊ नये.
९७) म्हणजे ज्याप्रमाणे ते जगात गुन्हे करण्यात आणि वाईट कमविण्यात एकदुसऱ्याचे भागीदार होते त्याचप्रमाणे परलोकात शिक्षा भोगण्यातही एकदुसऱ्याचे भागीदार असतील.

Post a Comment