Halloween Costume ideas 2015

शाळेतील लहान मुलांना वाचनाची सवय कशी लावाल...!

Students
शाळेतील लहान मुलांना काही ठराविक काळात जडणघडण विषयी चांगल्या सवयी किंवा चांगले संस्कार देणे अतिशय गरजेचे असते.साधारणपणे ५ ते १० वर्षातील शालेय मुलांना चांगल्यासवयी लवकर लागतात.
लहान मुलांचे मन अतिशय चंचल असते. लहानमुलं लगेच कृती, नक्कल किंवा खोड करायला शिकतात. कारण जे सवयी किंवा संस्कार लहान वयात होतात तेच त्यांच्या भविष्यात तरुणपणी दिसुन येतात. शाळेतील लहान मुलांवर करण्यात येणारा एक अतिशय महत्वाचा संस्कार म्हणजे त्यांना‘वाचन सवय संस्कार’लावणे. वाचन केल्यामुळे मुलांमधील जडणघडण उत्तम प्रकारे होते. वाचन केल्याने व्यक्तिमत्व विकास होते. वाचन केल्याने शब्द साठा वाढते, विचार करण्याची शक्ती मिळते, नवनवीन माहिती/ज्ञान मिळते, समाजातील चालूघडामोडी समजते, संभाषण कौशल्य वाढते, अभ्यास करायला मदत होते, समाजात उत्तम नागरिक बनते असे विविध फायदे फक्त आणि फक्त वाचन केल्यानेच होते. त्यामुळे मुलांच व्यक्तिमत्व अधिक खुलून येते. पालकांनी मुलांना हुशार, बुद्धिमान, विचारिक, चंचल व्हावं असं जर वाटत असेल तर अगदी लहानपणा पासूनच त्यांना वाचनाची सवय लावणे. आजकाल मात्र पालक व घरातील ईतर मंडळी सुध्दा वाचनापासून दुरावतांना दिसत आहे. त्यांना वाचनाची सवय राहिलेली नाही असे दिसुन येत आहे. समाजातील लोकांन बरोबर घरातील पालकवर्ग सुध्दा वाचायला वेळच मिळत नाही असं रोक ठोक उत्तर देतांना दिसत आहे. खंरतर पालकांनी घरातच मुलांना वाचनाची सवय लावू शकतात उदा. मुलांना वाचून दाखवणे, मुलांन कडून वाचून घेणे, एकत्र बसुन वाचन करणे, वाचतांना त्यांना काही अडचणी येत असल्यास ते सोडवणे, पुस्तकाबद्दल माहिती देणे, वर्तमानपत्र वाचून दाखवणे, मुलांन कडून वर्तमानपत्रातील हास्य लेख, बाललेख, विनोदी लेख, संपादकीय लेख वाचून घेणे, मुलांना घरात नवनवीन पुस्तके वाचनासाठी उपलब्द करून देणे, मुलांना ग्रंथालय भेटी साठी घेऊन जाणे, वाचनाचं महत्व सांगणे, वाचनाबद्दलची आवड जाणुन घेणे व त्याप्रमाणे वाचून घेणे-देणे, अभ्यास करतांना त्यांना मदत करणे, घरात मोठ्याने वाचून घेणे किंवा आपणच स्वत: मोठ्याने वाचणे इत्यादी उपक्रम पालकवर्ग घरात करू शकतात. त्यामुळे मुलांना वाचनाची सवय तर लागेलच पण वाचनाची संस्कृती किंवा गरज समाजात किती आहे हे पण समजतील. शेवटी मुलं स्वत:हून वाचन करायला लागतील व पालकांना पण वाचून दाखवतील. खंरतर वाचनामुळे माणसाचं विचार करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, बौद्धिक विकास, मानसिक
विकास किंवा हाव-भाव खऱ्या अर्थाने बदल तर होतेच पण स्वत:मध्ये विकास पण होत असतो. यासाठी फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे वाचन सवय व वाचन संस्कृती टिकून ठेवण अतिशय गरजेचे असते.
लहानमुलाचं खंर मित्र जर कोणी असेल तर ते पुस्तक आहे. अशी भावना किंवा विचार मुलांच्या मनात राबविल्या पाहिजे. माणसाच्या प्रत्येक क्षणी पुस्तक सोबतच असते. वाचन हे एक कौशल्य आहे; आणि ते कौशल्य लहान पणा पासूनच मुलांच्या अंगी असायला पाहिजे. खंरतर वाचनाची सवय किंवा आवड असलेल्या व्यक्तीला कधीच नैराश्य येत नाही. वाचनाने मानसिक ताण किंवा तणाव कमी होत. कारण वाचन केल्याने त्यांच्या जवळ शब्दाचा साठा भरमसाठ असतो. त्यामुळे विचार करण्याची शक्ती आपोआपच प्राप्त होत जाते. वाचन करण्यासाठी घरात किंवा ग्रंथालय मध्ये विविध वाचन साहित्य उपलब्द असतात. त्याचप्रमाणे लहान मुलांन साठी पण घरात एक छोटस ग्रंथालय असायला पाहिजे. जेणेकरून लहान मुल कधीही आणि केव्हाही वाचन करू शकेल. घरात वाचन साहित्य असेल तर मुलांच्या सवयी प्रमाणे किंवा गोडीप्रमाणे लहान मुलं वाचन करतील. घरातील ग्रंथालय मध्ये लहान मुलांच्या आवडी किंवा सवयीप्रमाणे वाचन साहित्य होम ग्रंथालयमध्ये उपलब्ध करणे. उदा. हास्यकथा, हास्यलेख, बालकथा, बाललेख, विनोदीकथा, विनोदीलेख, प्रवासवर्णन, संपादकीय लेख, विशेष लेख, कथा-कादंबरी, वर्तमानपत्र, मासिके,. उदा. कथा, कादंबरी, लेख, लघु-लेख, लघु-कथा, आत्म-कथा, आत्म-चरित्र, प्रवासवर्णन, बाल-कथा, बाल-लेख, कविता, निबंध, पत्र, गोष्टीचे पुस्तके, संशोधक-लेख, वर्तमानपत्र, मासिके, दिवाळी अंक, माहितीचे-लेख, वर्तमानपत्रातील लेख, संपादकीय लेख, ऐतिहासिक, आवांतर वाचनाचे पुस्तके, आनंददायात्मक पुस्तके, प्रोत्साहनपरक पुस्तके, हस्तलिखित पुस्तके, गमंतीदार पुस्तके, हास्यकारक पुस्तके, विनोदी कथा, स्वयंपाकशास्त्रवरील पुस्तके, काल्पनिक कथा, काल्पनिक पुस्तके, रहस्य कथा, रहस्यमय पुस्तके, इत्यादी. याचबरोबर ज्ञान वाढवणाऱ्यावाचन साहित्याचा संग्रह करणे. उदा. स्पर्धा परीक्षेवरील वाचन साहित्य, सामान्यज्ञान, भौगोलिक-ऐतिहासिक पुस्तके इत्यादी. शिवाय वाचन साहित्य हि माणसाची एक उत्तम संगत असु शकते. मुलांना वाचण्याची सवय जर असेल तर त्यांना शैक्षणिक जीवनातदेखील चांगला फायदा होऊ शकते. वाचन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते, एकग्रता वाढते, स्वत:च निणNय स्वत:च घेऊ शकते, चांगला-वाईट मधील फरक कळायला लागते, एकाद्या गोष्टी बद्दल तर्क लावू शकते, कौशल्य विकसीत होते, संवेदनशीलता वाढते, समाजाबद्दल – आणि देशाबद्दल प्रेमाची भावना वाढते, बौद्धिक आणि मानसिक विकास होते अशा विविध कारणांसाठी वाचन उपयुक्त आहे.
शाळेतील लहान मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी अगदी सहज आणि सोपे उपाय:
  • बाळ जेव्हा गर्भात असते तेव्हा जर आईने उत्तम चरित्रकथा, कादंबरी, लघुकथा, बालकथा, बाललेख, आत्मकथा, आत्मचरित्र, प्रेरणादायी कथा इत्यादी पुस्तके वाचली तर त्यांच्या गर्भावर उत्तम परिणाम होतो. त्यामुळे लहान बाळाला देखील पुढे चालू न वाचनाची सवय लागू शकते.
  • पालकांकडून घरातील पारंपरिक कथा, वाचन संस्कृती अशी जोपावी, बालकथा, चरित्रकथा, आत्मकथा, आत्मचरित्र, पोथी-पुराण इत्यादी वाचन साहित्य सांगून शाळेतील लहान मुलांच्या मनात पुस्तकं वाचण्याबाबत कुतूहल निर्माण करणे.
  • लहान मुलांना चांदोमामा, कासव-सशाची कहाणी, इत्यादी पुस्तकांवरती मोठ-मोठी चित्रे असलेली पुस्तके मुलांना वाचायला भेट देणे.
  • घरातील लहान मुलं पालकांचे अनुकरण करतात. खरं तर लहान मुलं ना पालकांचे आदर्श असतात. पालकांनी दैनदिन जीवनात नियमित मुलांसोबत वाचन करायला पाहिजे. घरात पालकवर्ग मुलांसमोर दररोज वाचन केल्याने मुलांना आपोआप वाचनाची सवय लागू शकते.  
  • पालकांनी घरात छोटंसं ग्रंथालय सुरु करावे. ज्यात मुलांसाठी अवांतर वाचनाची पुस्तके असतील. जेणेकरून पालकांबरोबर लहान मुलांना पण वाचनाची सवय लागेल. मुलांना सवयीप्रमाणे स्वत:च पुस्तकं निवडायला लावणे किंवा मुलांच्या सवयीप्रमाणे घरातील ग्रंथालयमध्ये पुस्तके घेऊन येणे.
  • १ ते ५ वयोगटातील लहान बाळांना गोष्टीची पुस्तके उपलब्ध करून देणे. उदा. ज्या पुस्तकांत मोठ-मोठी चित्रं असतील म्हणजेच हे चित्र पाहून वाचन सवय लागेल.
  • लहान मुलांना मोबाईल, संगणकवर गेम खेळायला देण्यापेक्षा त्यांना ई-साहित्य वाचण्याची सवय लावणे.
  • दरवर्षी २३ एप्रिलला मोठ्या उत्साहात ‘विश्व ग्रंथ दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या दिवशी लहान मुलांना एखादा विषय देऊन त्याविषयी माहिती गोळा करायला सांगणे.
  • मुलांच्या शाळेतील गृहपाठ करण्यासाठी तुम्ही फक्त त्यांना मदत करण्याऐवजी मार्गदर्शनच करावे. जेणेकरून स्वशिक्षणाची किंवा विचार करून लिहण्याची सवय लागेल.
  • मुलांना शाळेत वाचन तासात वाचन कार्यक्रम राबवणे. शिक्षकाकडून वर्ग तासिकेत मोठ-मोठ्याने वाचन करायला लावणे. शाळेत उत्तम वाचन केल्यामुळे शाबासकी म्हणून पुस्तक भेट देणे. मुलांना शाळेत जन्मदिवसानिमित्त शिक्षकाकडून पुस्तक भेट देणे. मुलांना ग्रंथापालांकडून ग्रंथालयची ओळख करून देणे.
  • घरातील सगळ्यांनी एकाच वेळी वाचन करावे. म्हणजे लहान मुलांना वाचन करण्याचे वळण लागेल. मुलांना एकदा प्रश्न किंवा काही संकेत असेल तर त्यांना पुस्तकं वाचनातून उत्तर मिळू शकते हे शिकवणे.
  • मुलांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल सारांश लिहायला सांगणे, शब्द लिहायला सांगणे, शब्द पाठ करायला सांगणे, पुस्तकांची नोंद करायला सांगणे. त्यामुळे मुलांना अभ्यास करायला मदत होऊ शकते.
  • अभ्यासाबरोबर इतर वाचन साहित्य वाचण्याची सवय लावणे. मुलांना अभ्यास करता-करता कंठाळा येत असेल तर त्यांना अवांतर वाचण्याची सवय लावणे. पुस्तकाबद्दल मुलांसोबत चर्चा करणे. मुलांच्या वाचण्याच्या सवयीबद्दल त्यांचे पालकांकडून कौतुक, शाबासकी, गुणगौरव करणे. त्यामुळे मुलांमध्ये वाचण्याबद्दल सवय निर्माण होईल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget