Halloween Costume ideas 2015

सकारात्मक विचारांनीच कोरोनावर मात करू शकतो

ये मत कहो खुदा से मेरी मुश्किले बडी है
इन मुश्किलो से कहे दो मेरा खुदा बडा है

सकारात्मक विचाराने कोणत्याही नकारात्मक गोष्टी वर मात करता येते हा माझा स्वतः चा अनुभव मी इथे नमूद करत आहे. मित्रांनो, माझ्या परिसरात एक पेशंट कोरोनाचा मिळाला होता म्हणून मी आणि माझ्या सोबत 16 लोकांना क्वारंटाइनसाठी नेण्यात आले होते. आता घरातून  जेव्हा अश्याअनोळख्या ठिकाणी नेण्यात येते तेव्हा सहाजिकच अनेक विचार येतात आणि माणूस स्वतः डिप्रेशन मध्ये जातो. आमच्या सोबतच्या लोकांमध्ये नकारात्मक विचार येत  होते. त्यांना वाटत होते आता काय होणार? अश्या खूप सार्‍या गैरसमजुती झाल्या होत्या या मध्ये मी फक्त त्यांना सकारात्मक बोलून धीर दिला. सर्वांना रोज सकारात्मक गोष्टी सांगत होतो आणि मला कुरआन वाचण्याची सवय आहे त्या मुळे  मी त्यांना मराठीतील  कुरआन  वाचून त्याना त्यांतील धीर देणारे आणि सकारात्मक आयातींचा सार सांगत होतो. तसेच महापुरुषांच्या जीवना मधील कठीण प्रसंगी त्यांनी कश्या प्रकारे  सकारात्मक राहून परिस्थिती वर कशी मात केली ? हे ही सांगत होतो. त्यामुळे सर्व मंडळी आनंदीत असायची आणि मग दुसर्‍या दिवशी आमची टेस्ट होती. तर त्या पूर्वी सुद्धा मी त्याना हेच सांगितलं की आम्ही फिट आहोत. अहो आम्हाला काही होऊच शकत नाही या विचारानेच टेस्ट द्या. सर्व लोक आनंदीत आणि सकारात्मक झाले त्याचा परिणाम असा झाला की आमच्या सर्व लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही आणि आम्ही सर्व सुखरूप घरी आलो.
    मित्रांनो आज आपण पाहत आहोत की , आज जिथे पहावे  तिथे फक्त एवढीच चर्चा आहे  की, तिथे एवढे पॉझिटिव्ह पेशंट मिळाले आणि अमक्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अश्या नकारात्मक बातम्यांमुळे समाजामध्ये नकारात्मक विचारांची लहर आली आहे. त्याचा परिणाम म्हणजे आज लोक कोरोनामुळे कमी पण त्याच्या भीतीमुळे जास्त मृत्यू पावत आहे. मित्रांनो! करोना ही एक महामारी आहे हे सत्य परंतु या मध्ये जगण्या मरण्याचा  काही संबध  नाही. त्याचा  संबध आहे तो  आपल्या रोग प्रतिकारक शक्तीशी. ज्या व्यक्ती ची रोगप्रतिकारक शक्ती जितकी जास्त त्याला या करोनाचा धोका तेवढा कमी. परंतु ज्यांना पूर्वीचे आजार आहेत आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी आहे. अश्या लोकांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांच्यामध्ये रोग- प्रतिकारक शक्ती कमी असण्याचे प्रमाण जास्त असते. परंतु मित्रांनो कोरोना आजार हा आपल्या विचारावर सुद्धा अवलंबून आहे. आपला दृष्टिकोन कोणत्या प्रकारचा आहे यावर ही आपले आरोग्य अवलंबून असते, कारण जर आपण या आजाराला आपल्या जिवा पेक्षा मोठं समजून भीतीने समाजामध्ये या आजाराबद्दल भ्रामक गोष्टी पसरल्या आहे त्यामुळे जर नकारात्मक विचार केला तर तुम्ही तुमचे स्वतःचे आयुष्य सुद्धा संपवू शकता. आपल्या विचारांवर आपले सर्व काही अवलंबून असते. जर आपण काळजी  केली  की माझे काय होईल ? मला तर आजार आहे अश्या नकारात्मक विचाराने ग्रस्त असाल तर मग त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती आपोआप कमी होईल आणि मग जे नाही ह्यायचं ते होईल. परंतु आपण सर्वांनी जर हा  विचार केला की मी खूप फिट आहे आणि मला काहीच होणार नाही. कोरोना एक सर्दी सारखा सामान्य आजार आहे. हा आजार  जर झाला तरी 14 दिवसात बरा होतो आणि पुन्हा आपण आपले जीवन सुखकर  बनवू  शकतो. असा जर सकारात्मक विचार केला तर मी आपल्याला साक्ष देतो की हा आजार कधीच जीवघेणा ठरणार नाही. माणसाच्या विचाराने काहीही होऊ शकते.

- प्रा. सलमान सय्यद शेरू,
पुसद
9158949409

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget