Halloween Costume ideas 2015

पशु कुरबानी ही नेहमी प्रतिकात्मकच !

राज्याच्या गृहमंत्रालयाने येत्या ईद ऊल अज़हाच्या पार्श्‍वभूमीवर काही मार्गदर्शक निर्देश जारी केले आहेत. त्यापैकी एक निर्देश असादेखील आहे की, शक्यतोवर प्रतिकात्मक कुरबानी करावी. ती प्रतिकात्मक पशु कुरबानी कशी करावी, याचं स्पष्टीकरण मात्र शासनाच्या पत्रात केलेलं नाहिये. काही मुस्लिम नेत्यांनी याबाबत विचारणाही केल्यावर शासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाहिये. त्यामुळे जनतेत अनेक संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण खरं म्हणजे पशुंना हलाल करून दरवर्षी एकप्रकारे प्रतिकात्मकच कुरबानी केली जात असते. ती कशी? ते खालीलप्रमाणे -
    चार हज़ारवर्षापूर्वी इराकमध्ये अंधश्रद्धा निर्मुलनासाठी सर्वात तीव्रतेने कुणी पावलं उचलली असतील तर ते परिवर्तनवादी चळवळ चालवणारे आदरणीय प्रेषित इब्राहिम (अलै.) यांनी. आपल्याच बापाच्या उपास्यगृहातल्या मुर्त्याफोडून त्यांनी फक्त एक मोठी मुर्ती शाबूत ठेवली. हे काम कोण केलं अशी विचारणा जेंव्हा लोकं करू लागले, तेंव्हा त्यांना चिकित्सा करायला लावण्यासाठी प्रतिप्रश्‍न केला की, त्या मोठ्या (मुर्ती)ला विचारा. लोकांनी म्हटलं की, ती मुर्ती कसं काय बोलेल? यावर आदरणीय इब्राहिम अलै. यांनी त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की, एवढं तर कळते की, ’हे तुमचे उपास्य बोलू शकत नाही तर मग हे तुमचे कल्याण कसे काय करू शकतात अन् मग यांची उपासना करून काय फायदा!’ यावर चिडून तिथल्या अंधश्रद्ध लोकांनी भयंकर मोठा जाळ करून त्यात प्रेषित इब्राहिम यांना ढकलून एकप्रकारे मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न केला. पण अल्लाहकृपेने ते त्यातून सुखरूप वाचले आणि नंतर ते तिथून स्थलांतर करून दुसर्‍या देशाकडे निघून गेले. पण दुसर्‍या देशातही त्यांनी सामाजिक परिवर्तनाद्वारे व्यवस्था परिवर्तनाची चळवळ मात्र सुरूच ठेवली.
    चळवळीत अनेकवेळा मोठा त्याग करावा लागतो. वेळप्रसंगी स्वतःचाच नव्हे तर स्वतःच्या लेकरांचाही जीव धोक्यात घालावा लागतो. यासाठी प्रेषित इब्राहिम अलै. यांचा एक आदर्श समोर राहावा म्हणून अल्लाहने त्यांची परीक्षा घेतली. स्वतःच्या मुलाची कुरबानी करण्याचे संकेत दिल्यावर खरंच प्रेषित इब्राहिम अलै. हे डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांच्या मुलाच्या गळ्यावर सुरी चालविण्यासाठी सरसावले, तेंव्हा अल्लाहने जीब्रील फरीश्त्याद्वारे त्यांच्या मुलाऐवजी तिथं एक जनावर ठेऊन दिला. मुलाऐवजी जनावराची कुरबानी झाली. ईद ऊल अज़हानिमित्त होणारी पशु कुरबानी ही त्याच परिवर्तनवादी चळवळ राबविणार्‍या प्रेषित इब्राहिम यांची परंपरा आहे. पशु कुरबानी प्रतिकात्मकच असते. इराक, पॅलेस्टिन व पूर्ण अरबस्तानात प्रेषित इब्राहिम यांच्या अंधश्रद्धा निर्मुलनाच्या चळवळीचं प्रतिक म्हणजे पशु कुरबानी! चळवळीच्या ध्येयपूर्तीसाठी कोणत्याही कुरबानीसाठी तयार राहण्यासाठीचा हा एक प्रतिकात्मक संस्कारच ! मागील रमज़ान महिन्यात देशभरातील इमानवंतांनी मोठ्या प्रमाणात प्रगल्भतेचा आदर्श समोर ठेवला. सर्वांनी घरातच नमाज अदा केली. याचं स्वतः शरद पवारांनीही कौतूक केलं. पण लॉकडाऊन 1 पेक्षा अनलॉक-1 मध्ये तुलनात्मकदृष्टीने ज्याप्रमाणे काहीप्रमाणात जास्त सवलती दिल्या, त्याचप्रमाणे नमाज पठणाच्या बाबतीतही थोडी सवलत सरकारने देण्याची गरज आहे, अर्थातच नमाजींची मर्यादित संख्या, फिजीकल डिस्टन्स, मास्क वगैरेच्या खबरदारी घेणार्‍या अटींसह. हे तर झालं सार्वजनिक नमाजबाबत, पण कुरबानी ही प्रत्येक जन सहसा आपापल्या घरातच वैयक्तिकरित्या करतो. कोरोना संकट काळाचं निमित्त करून किमान यावर्षी मटन वाटप करू नका म्हणणार्‍यांना प्रश्‍न विचारावासा वाटतो की, गरीबांना राशन किट वाटल्यानं कोरोना पसरत नाही पण काही जन म्हणतात तसं ईदच्या दिवशी गरीबांना मटन किट वाटल्यानंच कसा काय कोरोना पसरतो? म्हणून पशुंच्या कुरबानी करण्यावर कोणत्याही मर्यादा आणू नयेत. कारण पशुंची कुरबानी करणे हे प्रत्येक सक्षम इमानवंतावर वाजीब (आवश्यक) आहे. याविषयी प्रेषित मुहम्मद सल्लम यांची हदिस (वचन) आहे -
काला रसुल्लाही (स.) - मन् काना लहू सआता वलम् युज़बाह फलाह यकरबना मुसल्लाना. (संदर्भ : इब्न ए माजा) अर्थात - प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी म्हटलं आहे - सक्षम असूनही जो कुणी पशु ज़ुबाह (युज़बाह) करणार नाही, त्याने नमाज पढण्याकरिता आमच्या ईदगाहच्या जवळपासही फिरकू नये. (- संदर्भ: हदिस इब्ने माजा शरीफ). प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी दुसर्‍या एका हदिसमध्ये म्हटलं आहे -
धर्मात बिदअत ( त्या नवनवीन गोष्टी ज्यामुळे एखादी सुन्नत म्हणजे प्रेषित परंपरा रोखली जाते) सुरू करणे, हे सर्वात वाईट कृत्य आहे. (संदर्भ: हदिस बुखारी शरीफ). त्यामुळे सरकार म्हणते तसं प्रतिकात्मक कुरबानी किंवा काही लोकं पशु कुरबानीऐवजी गरीबांना रोख पैसे देऊन तथाकथित आर्थिक कुरबानी वगैरे करण्याचे दिलेलेे सल्ले कुचकामी तर आहेतच शिवाय ती धर्मात एकप्रकारची ढवळाढवळ आहे.
    सरकारने लोकांच्या धर्म परंपरेत अशी ढवळाढवळ करण्यापेक्षा दवाखान्यातील सोयी सुविधा, कमी दरात वीज, पाणी व इतर सोयी सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे, प्रतिकात्मक कुरबानी वगैरेचे सल्ले देण्याच्या भानगडीत कृपया पडू नये.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget