Halloween Costume ideas 2015

सूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१०८) ....आम्ही तर अशाच प्रकारे प्रत्येक गटासाठी त्याच्या कृतीला आकर्षक बनविले आहे,७३ मग त्यांना आपल्या पालनकर्त्याकडेच परतून यावयाचे आहे, तेव्हा तो त्यांना दाखवील की ते काय करीत राहिले होते.
(१०९) हे लोक कठोर शपथा घेऊन-घेऊन सांगतात की जर एखादी निशाणी७४ (म्हणजे चमत्कार) आमच्यासमोर आली तर आम्ही त्यावर श्रद्धा ठेवू. हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘निशाणी तर अल्लाहच्या अखत्यारीत आहेत.’’७५ आणि बरे तुम्हाला कसे समजावयाचे की जरी संकेत आले तरी हे श्रद्धा ठेवणार नाहीत.७६
(११०) आम्ही त्याचप्रमाणे यांच्या हृदयांना व दृष्टीला फिरवीत आहोत ज्याप्रमाणे यांनी प्रथमत: या ग्रंथावर श्रद्धा ठेवली नव्हती७७ आम्ही यांना यांच्या दुर्वर्तनातच भटकण्यासाठी सोडून देत आहोत.
(१११) जर आम्ही यांच्यावर ईशदूत जरी अवतरले असते आणि मृत लोक यांच्याशी बोलले जरी असते आणि जगभरातील वस्तू जरी यांच्या दृष्टीसमोर गोळा केल्या असत्या तरीसुद्धा यांनी श्रद्धा ठेवली नसती, ही गोष्ट वेगळी की अल्लाहची इच्छा हीच असावी. (की यांनी श्रद्धा ठेवावी)७८ परंतु बहुतेकजण अज्ञानाची कृत्ये करतात.
(११२) आणि आम्ही तर अशाच प्रकारे नेहमी शैतानी प्रवृत्तीच्या मानव व जिन्न यांना प्रत्येक पैगंबरांचे शत्रू बनविले आहे जे एकदुसऱ्यापाशी तोंडपुजलेपणा, धोकेबाजी व फसवणूक करीत राहिले आहेत.७९


७३) येथे पुन्हा त्या तथ्याला ध्यानात ठेवले पाहिजे ज्याकडे आम्ही यापूर्वी टीपाटीप्पणीद्वारे लक्ष वेधले नैसर्गिक नियमांना बनविणारा आहे आणि जे काही या नियमांनुसार घडते ते अल्लाहच्याच आदेशानुसार घडते. ज्याला अल्लाह सांगतो की आम्ही असे केले आहे, तेच आम्ही असे म्हणू की ७४)    निशाणी म्हणजे असा स्पष्ट चमत्कार आहे ज्याला पाहून पैगंबर मुहम्मद (स.) यांची सत्यता आणि पैगंबर (स.) यांना अल्लाहने पाठविले आहे, हे मान्य करण्याशिवाय तरणोपाय राहात नाही.
७५)    म्हणजे चमत्कार करण्याचे मला सामथ्र्य नाही. हा अधिकार अल्लाहचाच आहे. त्याला वाटेल तर दाखविल अथवा नाही.
७६)    हे संबोधन मुस्लिमांशी आहे जे बेचैन होऊन आशा करीत होते आणि कधी कधी वाणीद्वारे ही इच्छा व्यक्त करीत होते की एखादी निशाणी (चमत्कार) अशी प्रकट व्हावी ज्यामुळे त्यांचे मार्गभ्रष्ट बंधु सरळमार्गावर येतील. त्यांच्या याच कामना व इच्छेच्या उत्तरादाखल म्हटले जात आहे की, आता आणखी कोणत्या प्रकारे तुम्हाला समजावून सांगावे की, त्या लोकांचे ईमानधारक (श्रद्धावंत) होणे चमत्कारावर अवलंबून नाही.
७७)    म्हणजे त्यांच्यात तीच मनोवृत्ती काम करत आहे, ज्यामुळे त्यांनी प्रथमत: पैगंबर मुहम्मद (स.) यांचा संदेश ऐवूâन त्याला अमान्य केले होते. त्यांच्या दृष्टिकोनात अद्याप कोणतेच परिवर्तन झालेले नाही. त्यांची तीच वुंâठित बुद्धी आणि संकुचित दृष्टिकोन जो त्यांना त्या वेळी योग्य समजणे व योग्य पाहण्यापासून परावृत्त करत होता, आजसुद्धा त्यांच्यावर प्रभावित आहे.
७८)    म्हणजे हे लोक त्यांच्या अधिकार आणि निर्णयाने सत्याला असत्यावर प्राधान्य देऊन स्वीकारणार नाहीत. आता त्यांची सत्यवादी बनण्याची एकच पद्धत बाकी आहे, ती म्हणजे प्राकृतिक (नैसर्गिक) नियमांनी सृष्टीतील इतर सर्व विवश वस्तूंना सत्याचे अनुसरण करण्यास निर्माण केले आहे, त्याचप्रमाणे या लोकांना विवश करून नैसर्गिकरित्या व जन्मजात ईमानधारक बनवावे. हे मात्र तत्त्वदर्शितेच्या विपरीत आहे ज्यासाठी अल्लाहने मनुष्याला निर्मिले आहे. म्हणून तुमची ही अपेक्षा व्यर्थ आहे की अल्लाहने प्रत्यक्षत: बळजबरीने नैसर्गिकरित्या त्यांना ईमानधारक बनवावे.
७९)    म्हणजे आज शैतानरूपी जिन्न व शैतानरूपी मानव एकत्रित येऊन तुमच्याविरुद्ध प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. ही काही नवीन गोष्ट नाही जी तुमच्याबरोबर होत आहे. प्रत्येक काळात असेच होत आले आहे. जेव्हा कधी एखादा पैगंबर जगाला सरळमार्ग दाखविण्यासाठी उभा राहिला तेव्हा सर्व शैतानी शक्ती त्याच्याविरुद्ध त्याच्या मिशनला (चळवळीला) विफल करण्यासाठी उभ्या ठाकल्या होत्या. तोंडपुजलेपणाने अभिप्रेत त्या सर्व युक्त्या, शंका व कुशंका आणि आक्षेप आहेत ज्यांचा हे लोक सत्याकडे बोलविणाऱ्याविरुद्ध आणि त्याच्या संदेशाविरुद्ध लोकांना भडकविण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी उपयोग करतात. मग या सर्व गोष्टींना एकत्रितरित्या धोका आणि फसवणे म्हटले गेले आहे, कारण सत्याशी लढण्यासाठीचे हत्यार सत्यविरोधी वापरतात, ते फक्त दुसऱ्यासाठीच नव्हे तर स्वत:त्यांच्यासाठीसुद्धा खरे तर एक धोका आहे, जरी बाह्यत: ते फार फायद्याचे आणि सफल हत्यार दिसते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget