मुंबई (नाजीम खान)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकार या वर्षी मुस्लिम समाजातील ईद उल अझहा(बकरीद)या सणाच्या सोपस्कारांना परवानगी देण्यास अनुकूल नाही. या संदर्भात जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र चे अध्यक्ष रिझवान ऊर रहमान खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 9 जिल्हे कोरोनामुळे अति प्रभावित झाले आहेत. बाकीच्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणून अशा अल्पप्रभावित भागात बकरा बाजाराला मान्यता मिळावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ते सर्व संरक्षक उपाय करण्याची अट घालून ही परवानगी देण्यात यावी. रेडझोन मध्ये सुद्धा संरक्षणात्मक उपायांसह इतर आर्थिक घडामोडींना परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे काही अतिरिक्त उपायांसाह बकरा बाजाराला परवानगी देण्यात यावी.
यावर्षी मुख्य शेळी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी शहरातील इतर मोकळ्या ठिकाणी त्याचे विकेंद्रीकरण करावे, तसेच या विकेंद्रित बाजाराच्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर स्थापित करून तेथेच कुर्बानी करण्याची अनुमती देण्यात यावी जेणेकरून मुख्य बाजारामध्ये होणारी गर्दी टाळता येऊ शकते, असेही रिझवान ऊर रहमान खान यांनी सांगितले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळ्या खुल्या परिसरात तसेच क्रीडांगणे आणि इतर सोयीस्कर जागेत तात्पुरत्या स्वरूपात मंडी भरवल्यास गर्दी होणार नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाला तेथील सर्व स्तरातील जबाबदार नागरिकांचे पाठबळ आहे. या संदर्भात कोरोनाविषयी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात यावीत, असेही आवाहन रिजवानुर्रहेमान खान यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Post a Comment