Halloween Costume ideas 2015

युनानी पॅथी आणि मालेगावचा काढा

युनानी पॅथी म्हणजेच युनानी इलाज पद्धती. हिकमत ही काही आजीबाईंचा बटवा नाही तर एक संपूर्ण औषध पद्धती होय.
युनानी हा शब्द युनान (ग्रीस) पासून जन्माला आला आहे. युनान हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावरील एक देश आहे. प्राचीन इतिहास लाभलेला विकसीत देश. युनान हा शब्द लोनियनचे अरबी रूपांतर आहे. भारतात 100 हून अधिक महाविद्यालयात ही पद्धत शिकविली जाते तर 1971 मध्ये केंद्रीय युनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान (सीआरआययुएम) हैद्राबाद येथे स्थापित करण्यात आले आहे. अरबी लोकांनी ग्रीकांच्या या विधीमध्ये भर घातली आणि अशा रीतीने प्रगत झालेली चिकित्सा ही युनानी चिकित्सा बनली.
बुकरात (हिप्रॉक्राटीझ) (इ.स.पू.सु. 460-370) यांचा शरीरद्रव्य सिद्धांत हा आधारभूत सिद्धांत आहे. युनानी वैद्यकात 1) दम (रक्त) 2) बलगम (श्‍लेष्मा) 3. सफरा (पित्त) 4. सौदा (कृष्णपित्त) या चार द्रव्यांचे संतुलित मिश्रण म्हणजे आरोग्य आणि असंतुलित मिश्रण म्हणजे ’रोग’. ग्रीक व अरबी वैद्यकीय शास्त्रांची दीर्घकाळ युती होती. ग्रीक वैद्य केवळ अनुभवसिद्ध व गुढवाद यावर विसंबून होते. उलट अरबांनी गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, भूगोल, वैद्यक आणि वनस्पती विज्ञान यांचा युरोपीयनांना परिचय करून दिला.
बगदादच्या खलीफांचे वैद्य व वझीर असलेल्या इब्न सीना (इ.स. 980-1037) यांनी विविध विषयावर शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यापैकी अल-कानून-फील-तिब्ब या ग्रंथांत त्यांनी वैद्यकांचे सर्व ज्ञान क्रमवार सांगितले आहे. त्यांनी या ग्रंथात अ‍ॅरिस्टॉटल (इ.स.384-322) अरिस्त आणि जालीनूस हकीम (गेलन) (इ.स.131-202) यांच्या तत्वांची जुळणी करण्याचा प्रयत्नही केला आहे. शिवाय, इ.स. (700-1100) या काळात अरबी वैद्यकावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. खलीफा हारून अल रशीद (इ.स.809-763) यांच्या काळापासून आयुर्वेद व अरबी वैद्यक यांच्यात संपर्क प्रस्थापित झाला. आयुर्वेदिक तज्ञ बगदादला भेटीला गेले तर युनानी हकीमांनी सुश्रूत वागभट वगैरेंची आयुर्वेदिक माहिती मिळविली.
अरबी व्यापार्‍यांबरोबर भारता त आलेल्या युनानी वैद्य (हकीम) यांची मुगलांच्या काळात प्रसार व भरभराट झाली होती. भारतीय हकीमांनी येथील स्थानिक हवामानास अनुकूल असे फेरफार करून युनानी पॅथीला पूर्णपणे देशी रूप दिले. अरबी ग्रंथाचे प्रथम पर्शियन व नंतर उर्दू भाषेत अनुवाद करण्यात आले. (1869-1927) मसिहुल मुल्क हकीम अजमल खान यांनी भारतातील युनानी वैद्यकांची चांगल्या रितीने मांडणी व बांधणी केली. त्यांनी दिल्लीमध्ये तिब्बिया कॉलेज स्थापन केले. हकीम अजमल खान फक्त हकीम (वैद्य) नव्हते तर एक स्वतंत्रतासेनानीही होते. गांधीजींना ते 1919 मध्ये भेटले. इंडियन नॅशनल काँग्रेसचे 5 वे अध्यक्ष होते.     हकीम अजमलखान हे अत्यंत हुशार होते. लहानपणीच त्यांनी संपूर्ण कुरआन तोंडपाठ केले होते. ते हाफिज होते. देशभक्ती अशी की खादीच्या वस्त्राला वाईट म्हणणार्‍या राणीचा इलाज त्यांनी नाकारला. ते म्हणाले, भारताच्या खादीला नाव ठेवतात तर मी ही भारतीय आहे. युनानी पॅथी मध्ये रोगनिदानसाठी नाडी परीक्षा आणि मूत्र व विष्ठा परीक्षा केली जाते.
युनानी औषधी मुख्यतः वनस्पतीपासून तयार करतात. काही खनिजांपासून ही तयार होतात. औषधींची चव खूप चांगली आणि रूग्णास सेवन करण्यास सोपी असते. गोड हलवे व माजून ही देण्यात येतात. सध्या ह्या कोरोनाच्या महामारीवर गुणकारी मालेगावच्या काढ्याची खूप चर्चा आहे. सध्या याबद्दल यू ट्यूबवर कोणीही मनाने काहीही अदरक, तुळस, पुदीना, गुळ वगैरे पाण्यात गरम करून त्याला मालेगावचा काढा म्हणायला लागलेत. पण मालेगावच्या काढ्यामध्ये फक्त गरम मसाले नाही तर औषधींचा समावेश आहे.
मुहम्मदीया तिब्बिया कॉलेज (युनानी कॉलेज) जे की मालेगाव जि. नाशीकच्या मन्सुरा या भागात आहे. इथल्या हकीमांनी (युनानी डॉक्टर्स) मालेगावात वाढत्या कोरोना रूग्ण संख्येला लक्षात घेता, हकीम अजमल खान यांच्या पुस्तकामधून एक महामारीचे लक्षण जे तंतोतंत कोरोनाशी जुळत होते ते तपासले, कारण     त्या काळी कोरोना हे नाव अस्तित्वात नव्हते. मात्र असे नाही की व्हायरॉलॉजी ही सुद्धा माहित नव्हती. फक्त लक्षणांच्या आधारे त्याचा इलाज त्यांनी सांगितला. हकीम अजमल खान यांच्या हाजीक पुस्तकातला हा फार्म्युला युनानी डॉक्टर्स यांनी वापरत, रूग्णांवर उपचार केले आणि ते यशस्वी झाले . आणि काढ्याला अंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली. 20 रूपयात मालेगावात मिळणार्‍या या काढ्याची ब्लॅक मार्केटिंग सुरू झाली आणि आता दुसरीकडे लोक याच काढण्याची पुडी 100 रूपयाला घेउ लागलेत.
    मी ही माझी बी.यु.एम.एस. (बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी) ची पदवी याच महाविद्यालयामधून 2004 साली घेतली आहे. आणि तेव्हापासून युनानी प्रॅक्टीस आणि हिजामा थेरपी करत आहे. मी माझ्या गुरूंशी चर्चा करून ह्या काढ्याची ’आयुष’ (आयुर्वेदिक-युनानी सिद्धा होमिओपॅथी) माहिती मिळविली आहे. मंंत्रालयाने ही ह्या काढ्याला मान्यता दिली आहे. ह्या काढ्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि झपाट्याने कोरोनाचे रूग्ण कमी झालेत.

ह्या काढ्यात प्रमुखरित्या 9 औषधांचा प्रयोग होतो. जनजागृतीसाठी मी ते वाचकांसमोर ठेवतो. प्रथम युनानी नाव मराठी नाव, लॅटीन नाव
1.मुलेठी- जेष्ठमध - Glycyrrhiza glabra,
2.उन्नाब - बोर - Ziziphus satvus
3.गावजबान - गोजी हवा - Onosma bracteatum
4.खतमी - गुलखैर, बानाचा आवा - Althaea officinatis
5.खुब्बाजी - गुरूचन्ती - Malva sylvestris
6.सपीस्ताँ - लसोडा - Cordia Myza
7.अडुलसा - बनसा - Justica Adhatoda
8.खाकीस - खाकची - sisymbriutziriolino
9.उत्सखुद्दूस - खारू - Lavendula, stoechas (Arabian Lavender)


    ह्या सर्व जटीबुटींनी सम वजनात घेऊन त्याला वाटायचे मग 6 ग्राम पावडर, 1 कप पाण्यात उकळून सकाळ, संध्याकाळ घ्यावे. आठवडाभर उपयोग करावा. ही कोरोनावरची औषधी आहेत असे आपण जाहीर करू शकत नसून ह्या औषधीच्या सेवनाने लक्षणात कमी येते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सुरूवातीचे लक्षण ताप, सर्दी, घश्यात खरखर करणे ह्याच्यावर हा हुकमी उपाय आहे.
वरील सर्व औषधी साहित्य नाही भेटले तर घाबरून जाऊ नये. हमदर्द कंपनीचा ’जोशांदा’ जडीबुटीचा मिश्रण ही आपण वापरू शकता. मिळेल तेवढा त्याचा वापर करावा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरी रहा सुरक्षित रहा.
    -----------------

- डॉ. अब्दुल खय्युम शेख
8421388317,9421420940
(लेखक - राहत क्लिनिक हिजामा सेंटर, लातूरचे संचालक आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget