Halloween Costume ideas 2015

मी त्याचं बोट धरलं

माणुसकीची मुद्रा उमटवणारी कविता

धर्म नैतिकतेचे संचालन करतो. अनैतिकतेला धर्म मानताच येत नाही. अनैतिकतेच्या माध्यमाने विषमतेला, परधर्मद्वेषाला वंदनीय ठरविण्याच्या प्रयत्नाला धर्म म्हणता येणार नाही. ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वातच धर्माचे सौंदर्य आहे. स्वतःच्या स्वातंत्र्याबरोबरच इतरांचे स्वातंत्र्य जपण्या धर्माचे मर्म आहे. विसंवादाचे रूपांतर संवादत, द्वेषाचे रूपांतर प्रेमात करणे हीच धर्माची नीती आहे. धर्माने माणसांना जोडण्याचेच काम करायला हवे. पण जेव्हा धर्म माणूस जोडण्याच्या अभियानाला ब्रेक लावत असेल तर त्याला धर्म म्हणता येणार नाही. तो अधर्म ठरतो. सर्वच धर्माच्या अनुयायांनी धर्माचे विशुद्ध तत्त्वज्ञान समजून घेणे आणि त्यावर अभंग निष्ठा ठेवणे महत्त्वाचे आहे. धर्माच्या विशुद्ध तत्त्वज्ञानाला कृतीत उतरविण्याचे बौद्धिक साहस प्रत्येक धर्माच्या अनुयायांमध्ये असल्यास कोणीही एकमेकांच्या धर्मावर कुरघोडी करणार नाही. पण आज सर्वसामान्य माणसांपर्यंत धर्माचे विशुद्ध तत्त्वज्ञान पोहचविण्याऐवजी धर्माचे तपशील पोहचविल्या गेले, त्यामुळे सर्वसामान्य माणूस तपशिलालाच तत्त्व मानू लागला. धर्माच्या ठेकेदारांनी धर्माचे तत्त्व समजून घेतले नाही की मुद्दाम समजून घेण्याचे टाळले, हा गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाने खरे पाहता मानवी उन्नयनाला गोठविले आहे. याचा प्रत्यय शेख बिस्मिल्ला सोनोशी यांच्या ‘मीच त्याचं बोट धरलं’ या कवितासंग्रहामधून येतो. ‘मीच त्याचं बोट धरलं’ हा कवितासंग्रह 2018 ला परिवर्तन पब्लिकेशन, बुलडाणाने प्रकाशित केला आहे.
कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांनी आपल्या ‘मीच त्याचं बोट धरलं’ या कवितासंग्रहाच्या निमित्ताने देशातील सर्वच गोंधळलेल्या समाजापुढे माणुसकीचा वस्तुपाठ मांडला आहे. या वस्तुपाठातून कवीने मानवी सौंदर्याची प्रस्थापना केली आहे. कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांनी ‘मीच त्याचं बोट धरलं’ या कवितासंग्रहामध्ये सामाजिक विषमतेचे प्रश्न, बेकारीचे प्रश्न, दंगलींचे प्रश्न भ्रृणहत्येचे प्रश्न, शेतकèयांचे प्रश्न इत्यादी प्रश्नांची अत्यंत पोटतिडकीने चर्चा केली आहे. मानवी जीवनाच्या विराट सौंदर्याची कुरूपता पाहून कवी बेचैन होतो. कवी आपल्या कवितेमधून समाजाला नवी मानवी सौंदर्यसंस्कृती देण्याचा प्रयत्न करतो आहे.
समाजाचे आचार आणि विचारशास्त्र कसे असावे याचे प्रात्याक्षिक कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांच्या कवितेमधून पाहावयास मिळते. समाजात सर्वच प्रकारची समानता प्रस्थापित व्हावी. कोणीही कोणाला दुय्यम ठरवू नये. धर्माच्या आधारावर इतरांच्या देशभ्नतीवर कोणी प्रश्न उपस्थित करू नये. राष्ट्रवादाचे वारसदार फ्नत आपणच आहोत असे समजू नये. कोणीही बेजबाबदारपणे वागू नये असे कवीला वाटणे म्हणजेच कवी समाजात असलेल्या व्यवस्थेत हस्तक्षेप करतो आणि व्यवस्थेपुढे नवा पर्याय उभा करतो. हे करणे म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारणेच होय. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांनी केले आहे.
‘माझाच धर्म श्रेष्ठ म्हणून
का घडवता दंगली
स्वार्थासाठी घेता
का निष्पापांचे बळी’
(पृ.क्र. 37)
धर्मश्रेष्ठत्त्वाच्या हट्टाने या देशात गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण केले आहे. हे प्रश्न साधे नाहीत तर काटेरी आहेत. हे प्रश्न माणुसकीला घायाळ करणारे आहेत. हे प्रश्न मानवतेला आग लावणारे आहेत. या प्रश्नांनी माणसामाणसांत परस्परद्वेषाच्या भिंती निर्माण केल्या आहेत. या प्रश्नांनी माणसांच्या परस्पर भेटींवर प्रतिबंध लावलेला आहे. या प्रश्नांनी अज्ञानाचे तुरुंग निर्मांण केले आहेत. या प्रश्नांनी मानवी नात्यातील ओलाव्याला वाळवंटाच्या हवाली केले आहे. या प्रश्नांनी मानवी जीवनात रणांगणसदृश्य स्थिती निर्माण केली आहे. या प्रश्नांचा मुखवटा हा धर्म आणि संस्कृती रक्षणाचा आहे. या मुखवट्याआड असलेले कपटी कारस्थान समाजाला दिसत नाही. म्हणून येथे दंगली घडतात. निरपराध माणसे मारली जातात. ही सर्वसामान्य माणसांच्या स्वप्नांची हत्या नाही का?असा धुमसणारा प्रश्न कवीने विचारला आहे.
‘मी मुस्लिम म्हणून
देशद्रोही समजून छळल्या जातो
वेळोवेळी टाळल्या जातो
अन् भरडल्या जातो
गव्हातील किड्याप्रमाणे’
(पृ.क्र. 36)
कवीने आपले धुमसणारे काळीज वरील ओळींमधून मोकळे केले आहे. कवी जातीने मुस्लिम असल्यामुळे येथील व्यवस्था कवीला परका आणि उपरा ठरविते. कवीची ही वेदना प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. वरील ओळींमधून कवीने मुस्लिम समाजाची कैफियत मांडली आहे. येथे रोजच मुस्लिम समाजाला अपमानाच्या जखमा आपल्या शरीरावर घेऊन जगावे लागते. त्यांच्या मनांमध्ये कायमच असुरक्षिततेची भावना असते. दुसरीकडे मुस्लिमांचा अनुनय केला जातो असा आरोप मुस्लिमांवर केला जातो. येथील राजकीय व्यवस्था आणि मुस्लिम नेतृत्त्वही सर्वसामान्य मुस्लिम समाजाला अनुनय आणि सुरक्षितता अशा अंतर्विरोधाच्या हिंदोळ्यावर झुलवितात. यामुळे मुस्लिम समाज सातत्याने घायाळ होतो. गेल्या अनेक शतकांपासून येथील मुस्लिम समाज भारत देशाचा नागरिक आहे. तो या देशातील परिवर्तन मानतो, येथील संविधान मानतो. तो या देशाच्या सुखदुखाचा सहप्रवासी आहे. पण येथील प्रस्थापित समाजयंत्रणा मुस्लिम समाजाला देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न करते आणि या प्रयत्नात ती आज यशस्वी होताना दिसते. कवी सच्चा भारतीय मुस्लिम असल्याची स्वतः ग्वाही देतो. ही ग्वाही देण्याची आवश्यकता कवीला का भासते? या ग्वाहीची संदर्भचौकट लक्षात घेण्यासारखी आहे. ही ग्वाही जे सांगू इच्छिते आणि सूचित करू इच्छिते ते हे की, कवीच्या मृत्यूनंतर कवीला याच मातीत दफन करण्यात येणार आहे. या मातीत दफन करणे हाच राष्ट्रप्रेमाचा दाखला आहे. हेच त्याच्या देशनिष्ठेचे प्रमाणपत्र आहे. वरीज्ञ ओळींमधील वेदना ही मराठी कवितेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. या वेदनेचे दिग्दर्शन येथील द्वेषमूलक व्यवस्थेने केले आहे हे कवी विसरत नाही.
मुस्लिम समाजाने अज्ञानाच्या अंधारछायेत आपले जीवन व्यतीत करावे असे येथील व्यवस्थेला वाटते. या व्यवस्थेत आता इले्नट्रॉनिक मिडिया या उपशाखेचीही भर पडली आहे. ही उपशाखा अलीकडे रोजच मुस्लिमांच्या अस्मितेचा लिलाव करीत आहे. ही उपशाखा मुस्लिमांना गुन्हेगार ठरविण्यात धन्यता मानते. ह्यामुळे आकाशात झेप घेऊ पाहणाèया मुस्लिमांच्या स्वप्नांचा गर्भपात रोज येथे होत आहे. कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांच्या वरील ओळींमधील वेदना थेट हृदयाला भिडणारी आहे. ‘तडफडणाèया जिवांना वाचवण्या
न पुजारी आले न इमामा आले’ (पृ.क्र. 64)
वरील ओळींमधील आशय हा आस्वादकांना आपल्या मनांचे संशोधन करायला लावतो. प्रत्येकाने आता सजग असायला हवे. ही संदर्भसूचकता वरील ओळींमध्ये आहे. मंदिर आणि मशिदीच्या नावावर येथे मनांची फाळणी केली जाते. मनांची फाळणी करणाèयांनी सर्वसामान्यांना मृत्यूच्याच दारात लोटले आहे. वरील ओळींतील आशय सर्वसामान्य माणसांना आरपार अस्वस्थ करणारा आहे. जेव्हा सर्वसामान्य माणूस धर्मवाद्यांपुढे आपली मान तुकवितो तेव्हा त्याच्या वाट्याला जीवघेण्या यातनाच येतात. त्याचे जीवन विस्कटून जाते. कोणताही पुजारी अथवा इमाम त्यांच्या मदतीला धावून येत नाही. धर्मवाद्यांनी या देशात खूपदा दंगली घडवून आणल्या आहेत. या प्रायोजित दंगलीत सामान्य माणसे मारली जातात. म्हणून प्रत्येकाने प्रायोजित दंगलींचे मानसशास्त्र समजावून घेणे महत्त्वाचे आहे. माणूस जगेल तरच पुजारी आणि इमाम टिकेल. पण आज पुजाèयांनी आणि इमामांनी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरल्याचे दिसून येते. या लोकांनी भारत देशातील सर्वसामान्य हिंदू-मुस्लिमांच्या जीवनात विष कालवण्याचेच काम केले आहे. या लोकांनी येथील हिंदू-मुस्लिमांच्यापुढे सांस्कृतिक आणि सामाजिक मरणच वाढले आहे. कवीने समाजाला विवेकवादी बनण्याचा आग्रह केला आहे. विवेकवादानेच योग्य काय आणि अयोग्य काय हे ओळखता येते. कवीने आपल्या गंभीर चिंतनाने धर्मवाद्यांचा खोटेपणा चव्हाट्यावर आणला आहे. धर्माच्या नावाने येथे सहज दंगली घडविता येतात. दंगलीत मारल्या जाणाèया माणसांशी त्यांचे काहीही घेणेदेणे नसते. दंगलीत हिंदू मरत नाही, मुस्लिमही मरत नाही. दंगलीत माणूस मरतो. म्हणून प्रत्येकाने दंगलीचे मानसशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. कवी माणसाला वेठीस धरणाèया मानसिकतेवर प्रहार करतो. या प्रवृत्तींनी येथील सर्वसामान्य माणसाला यातनांशिवाय काय दिले आहे? या प्रवृत्तींनी हिंदू-मुस्लिमांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक दरी निर्माण केली आहे. ही दरी नष्ट व्हायला हवी ही अपेक्षा वरील ओळी करतात.
‘माझा जन्मच मुळी
वान्टेड ठरलेल्या
समाजातला
म्हणूनच
वेळोवेळी टाळल्या जातो
संशयाच्या अग्नीत
पोळल्या जातो...’
(पृ.क्र. 77)
ही वेदना केवळ कवीचीच नाही तर ही वेदना एकूणच मुस्लिम समाजाची आहे. ही वेदना घेऊन मुस्लिम समाज अस्वस्थ मनाने येथे जगतो आहे. वरील ओळींमधून कवीने पराकोटीचा संताप व्य्नत केला आहे. हा कवीच्या मनात धुमसणारा संताप आस्वादकांनी समजून घ्यायला हवा.
सभोवतालाच्या वास्तवात कवीसकट मुस्लिम समाज होरपळून निघतो आहे. येथील सामाजिक व्यवस्था सर्वधर्मसमभावाचा देखावा करते. प्रत्यक्षात आपल्या कृतीमधून सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा अपमान रोजच व्यवस्थेकडून केला जातो आहे. असा व्यवहार हा अत्यंत घाणेरडा आणि घृणास्पद असतो. या व्यवहारशैलीचा तपशील अत्यंत पोटतिडकीने कवीने मांडला आहे. कवी म्हणतो की, या व्यवहाराच्या तपशिलाचे आणि तत्त्वाचे विसर्जन व्हायला हवे. प्रत्येक धर्मातील लोक जेव्हा अंतर्विरोधातीत होतील तेव्हाच खèया अथाने माणसाच्या प्रतिष्ठेला महत्त्व येईल. प्रत्येकाने आपल्या इमानदार वर्तनाचा आदर्श समाजापुढे ठेवायला हवा. असे केल्याने कोणाच्याही जीवनात ‘वान्टेड’चे काळे ढग येणार नाही, कोणालाही जातीच्या आधारावर टाळता येणार नाही. कोणालाही मुस्लिमांचा उदंड आवाज दाबता येणार नाही.
‘दुरावली माणसे, हाती हात नाही
जिव्हाळा कुणाचा हृदयात नाही
नित्य वसे निर्मळ अंतरी
देव मशीद मंदिरात नाही’
(पृ.क्र. 86)
माणसांनी आपल्याभोवती स्वार्थाच्या चौकटी निर्माण केल्या आहेत. या चौकटींमुळे परस्परांशी बंधुभावाने वागणारी माणसे आज परस्परांशी वैरभावनेने वागत आहेत. यामुळे परस्परांमध्ये प्रेमभावनेचा दुष्काळ निर्माण झाला आहे. या दुष्काळाने माणसाच्या मनांची वाटणी केली आहे. या दुष्काळाने माणसांच्या भोवती स्वार्थाच्या बेड्या ठोकल्या आहेत. स्वार्थपणाची राखणदारी करणे टाळले तरच माणसाला माणुसकीच्या आकाशात भरारी घेणारे पंख लाभतील. स्वार्थीप्रवृत्तीला कायमचे संपविणे गरजेचे नाही का? हा प्रश्न कवीने उपस्थित केला आहे. हा प्रश्न मोठा अन्वर्थक आहे. स्वार्थवृत्तीने माणसांसमोर संकटे निर्माण केली आहेत. माणसामाणसांत आज भांडणे सुरू आहेत. या भांडणांमुळे या पृथ्वीवरून माणूसच एकदिवस नामशेष होईल याची कवीला भीती वाटते. माणसाला या पृथ्वीवरून नामशेष होऊ द्यायचे नसेल तर माणसाला माणसाशी जोडण्याच्या प्रक्रियेला अग्रक्रम द्यावा लागेल असे स्वच्छ मत कवीने आपल्या कवितेच्या माथ्यावर कोरले आहे.
‘मित्रांनो, आता बंद केला पाहिजे
आपसातील कुरघोडीचा खेळ’
(पृ.क्र। 94)
वरील ओळी अंतर्मुख करणाèया आहेत. सामान्य माणसांच्या भोवती निर्माण केलेल्या मर्यादांचे सीमोल्लंघन करण्याचे सूत्र कवीने मांडले आहे. माणसांभोवती मर्यादांची तटबंदी निर्माण करणाèयांनी सामान्य माणसांना हैराण करणाèया तत्त्वज्ञानाचेच विष पाजले आहे. सामान्य माणूस हतबल कसा होईल याचेच सापळे त्यांच्याकडून रचले गेले. या सापळ्यात येथील सामान्य माणूस अलगद फसत गेला. या विघातक फसवणुकीतून बाहेर येण्याचे मार्ग कवीने शोधले आहे. मानवी सौंदर्याची दिशाभूल करणाèया सूत्रधारांचे उपासक होणे टाळून त्यांच्या विरोधात आंदोलन निर्माण करणे हाच फसवणुकीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. दुसरा मार्ग हा की आपण आपल्यातील छोट्या-छोट्या अस्मिता बाजूला सारून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. असे केल्यानेच सर्वच वंचितांच्या वाट्याला उजेडाची दौलत येईल. एकत्र येणे सर्वच वंचिताच्या हितांच्या आहे. सर्वच वंचितांच्या एकत्रित श्नतीतून माणुसकी उगवत राहील. या एकत्रिकरणामधून सर्वच वंचितांमध्ये अज्निंयपणाची ऊर्जा सतत उफाळत राहील. ही ऊर्जा सर्वच वंचितांना एकत्र आणणारी आहे. सर्वच वंचितांना सुरक्षिततेची आणि उन्नयनाची हमी देणारी आहे. सामाजिक गतिशीलतेचा जाहीरनामा कवी बिस्मिल्ला सोनोशी यांनी वरील ओळींमधून मांडला आहे. हा जाहीरनामा सर्वच वंचिताना एकसंध करणारा आहे. हा जाहीरनामा मानवी सौंदर्यमर्माचा दस्तावेज आहे.
- (पूर्वार्ध)


-डॉ. अक्रम पठाण
अंजुमन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर.
मो.: ८६००६९९०८६

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget