Halloween Costume ideas 2015

आर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय


हे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाला स्थलांतरित केले जाऊ शकेल. मग हे आवश्यकता भासते की मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह मध्ये पैसे लावले जावेत आणि अतिरिक्त माल खपविण्यासाठी बाजार शोधले जावेत.

या जागतिक संघर्षात बँका पतपेढ्या आणि उद्धव व्यापाऱ्यांची, भांडवलदारांची लहान अशी टोळी सर्व जगाची आर्थिक सामग्री आणि संसाधनावर या प्रकारे प्रभावी झालेली आहे. समस्त उपाय त्यांच्याविरोधात पूर्णपणे निरुपाय झालेले आहे. आता कोण्या व्यक्तीसाठी हे असंभव झालेले आहे की तो आपल्या कष्टाने आणि आपल्या बुद्धीच्या योग्यतेने एखादे काम स्वतंत्र रूपाने करू शकेल. तसेच ईश्वराच्या धरतीवर अस्तित्वात असलेल्या जीवन साधने स्वतः काही भाग प्राप्त करू शकेल. लहान व्यापारी, लहान कारागीर आणि लहान शेतकऱ्यांसाठी आज जगात हात-पाय मारण्याची काही एक संधी बाकी राहिलेली नाही. सर्वच्या सर्व भांडवलदारांचे गुलाम, नौकर, मजूर बनण्यास विवश आहेत. हे लोक कमीत कमी जीवन सामग्रीच्या मोबदल्यात त्यांच्या शरीर आणि बुद्धीच्या सर्व शक्तीआणि त्यांचा पूर्ण वेळ घेतात. या कारणास्तव सर्व मानव जात एक आर्थिक पशु बनून राहिलेली आहे खूप कमी भाग्यशाली लोकांना या आर्थिक संघर्षामध्ये इतका वेळ मिळू शकतो की आपल्या आध्यात्मिक विकासासाठी काही करू शकतील. कोण अशा उद्देशा कडे लक्ष देऊ शकेल जो पोट भरण्याच्या उद्देशा पेक्षा श्रेष्ठ आहे.आपल्या व्यक्तीत्वाच्या त्या तत्त्वांना विकसित करू शकेल जे उपजीविकेच्या शोधा पेक्षा दुसऱ्या पवित्र उद्देशासाठी ईश्वराने त्याच्या मध्ये ठेवले होते. वास्तवात या सैतानी व्यवस्थेमुळे आर्थिक संघर्ष इतके कठोर रूप धारक करते की, जीवनाचे इतर दुसरे विभाग निष्क्रिय हो होऊन बसतात.यापेक्षाही मोठे मानवाचे दुर्भाग्य हे आहे की जगाचे नैतिक दर्शन राजनीतिक व्यवस्था आणि कायदे सिद्धांत या सैतानी अर्थव्यवस्थेने प्रभावित झालेले आहेत. पूर्वेपासून पश्चिमे पर्यंत नैतिकतेचे आचार्य अतिरिक्त खर्चापासून वाचण्यावर जोर देत आहेत. जितके कमवायचे तितकाच खर्च करून टाकणे एक मूर्खता समजली  जाते . प्रत्येक व्यक्तीला शिकवण दिली जाते की, आपल्या मिळकतीतून काही न काही वाचवून बँकेत डिपॉझिट ठेवावे अथवा विमा पॉलिसी खरेदी करावी अथवा कंपन्याचे शेअर खरेदी करावेत. म्हणजे जी गोष्ट मानवतेचा विनाश करणारी आहे तीच नैतिकतेच्या दृष्टीत चांगुलपणाचे मापदंड करणारी ठरली आहे. राहिली राजनीतिक शक्ती तर ती व्यवहारतः पूर्णपणे एका सैतानी व्यवस्थेच्या ताब्यात आलेली आहे. ती या अत्याचारापासून मनुष्याला वाचविण्या ऐवजी स्वतः अन्याय करणारी मशीन झालेली आहे. जगाचे कायदे सुद्धा या व्यवस्थेच्या प्रभावात संयोजित होत आहेत.

या कायद्यांनी लोकांना व्यवहारतः पूर्ण सूट देऊन ठेवली आहे की ते ज्याप्रकारे इच्छितील समाजहिताच्या विपरीत आपल्या आर्थिक उद्देशासाठी प्रयास करतील. पैसे कमविण्याच्या पद्धतीत वैथ आणि अवैधतेचा फरक जवळजवळ लुप्त झालेला आहे. प्रत्येक ती पद्धत जिच्याने व्यक्ती दुसऱ्यांना लुटून अथवा नष्ट करून धनवान बनवू शकतो, कायद्याच्या दृष्टीत पात्र आहे दारू बनवा आणि विका व्यभिचाराचे अड्डे स्थापन करा, कामोत्तेजक चित्रपट बनवा, अश्लिल निबंध लिहा वासनालय, भावना भडकवणारी चित्रे प्रकाशित करा, सटृयाचा व्यवहार पसरवा, व्याजखोरीच्यासंस्था स्थापन कराजुगाराच्या नवनवीन पद्धती काढा. सारांश हा की वाटेल ते करा. कायदा फक्त याची परवानगीच देणार नाही तर तुमच्या अधिकारांचे रक्षण ही करेल.

इस्लामी उपाय

1: इस्लामने जीवनाच्या सर्व समस्यांना या नियमात समोर ठेवले आहे की, जीवनाचे जे सिद्धांत स्वाभाविक आणि नैसर्गिक आहेत, त्यांना शिल्लक ठेवले जावे आणि जिथे नैसर्गिक मार्गाने विचलित झाले आहे, तेथूनच त्याला वळवून नैसर्गिक मार्गावर लावून दिले जावे.

2: दुसरा महत्वपूर्ण नियम ज्यावर त्याची सर्वच सुधारात्मक कार्य निर्भर असतात, तो हा आहे की समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये केवळ काही वरवरचे उपाय लागू करण्यावर न थांबता, सर्वात जास्त जोर नाही नैतिक आणि मानसिक सुधारावर दिला जावा. कारण मानवी मनात निर्माण होणाऱ्या बिघाडाची मुळे कापली जावीत.

3: तिसरा मौलिक नियम ज्याची झलक आपणास संपूर्ण इस्लामी जीवन प्रणालीत मिळेल, हा आहे की शासनाच्या बळावर आणि कायद्यांच्या शक्तीने फक्त तीच कामे घेतली जावीत जिथे याशिवाय काम चालू शकत नसेल. या तिन्ही नियमांना दृष्टीसमोर ठेवते इस्लाम जीवनाच्या आर्थिक विभागामध्ये त्या सर्वच अभाविक सिद्धांतांना अधिकाहुन अधिक नैतिक सुधार आणि कमीत कमी प्रशासनिक हस्तक्षेपाद्वारे मिटवीत असतो, जे सैतानाच्या प्रभावाने मानवाने अंगीकारले आहेत. मानव आपल्या जिविकेसाठी प्रयास करण्यास स्वतंत्र असावा. मानव आपल्या श्रमाने जे काही प्राप्त करेल ती त्याची मिळकत स्वीकार केली जावी आणि मानवामध्ये योग्यतांच्या आणि त्यांच्या परिस्थितीच्या प्रमाणानुसार अंतर असावे. या सर्व बाबींना इस्लाम त्याच मर्यादेपर्यंत स्वीकार करतो ज्या मर्यादेपर्यंत हे निसर्ग अनुकूल असते. मग तो यांच्यावर असे प्रतिबंध लावीत असतो ज्यांच्यामुळे न ही निसर्गाच्या सीमेच्या पुढे वाढू शकते आणि न अन्याय आणि अत्याचाराचे कारण बनते.

सर्वात अगोदर धन कमविण्याच्या प्रश्नाला घ्या इस्लामने मनुष्याच्या या अधिकाराला स्वीकारले आहे. अल्लाहच्या धरतीवर आपल्या रुची, क्षमता आणि योग्यतेनुसार स्वतः आपली जीविका त्याने शोधावी. परंतु तो त्याला हा अधिकार देत नाही की त्याने आपली जीवीका प्राप्त करण्यासाठी नैतिकतेला बीघडविणारी व सभ्यतेच्या व्यवस्थेला बिघडविणारी साधने वापरावीत. तो धन कमविण्याच्या साधनांमध्ये अवैध आणि वैधतेचे अंतर निर्धारित करतो. अत्यंत विस्तारासहीत वेचून वेचून प्रत्येक हानिकारक पद्धतीला अवैध करून टाकतो. त्याच्या कायद्यामध्ये दारू आणि दुसरे मादक पदार्थ केवळ आपल्या जागेवर अवैध आहेत तर त्यांचे बनविणे, विकणे, विकत घेणे आणि बाळगणे सर्व अवैध आहे. तो व्यभिचार, संगीत आणि याच प्रकारच्या इतर दुसऱ्या साधनांना सुद्धा संपत्तीच्या कमाईचे वैध साधन मानत नाही. तो अशा सर्व साधनांना अवैध ठरवितो, ज्यात एका व्यक्तीचा लाभ दुसऱ्या लोकांच्या अथवा समाजाच्या हानीवर निर्भर करीत असेल.

लाच, चोरी, जुगार ,सट्टा तसेच धोका, दगाबाजी चे व्यवहार जमा खोरी अर्थात गरजेच्या साधनांना यासाठी रोखून ठेवणे की किमती वाढाव्यात. उत्पादनाच्या साधनांना एक व्यक्ती अथवा काही व्यक्तीचा अधिकारी ठरविणे की दुसऱ्यासाठी प्रयास क्षेत्र तंग व्हावे. या सर्व पद्धतींना त्यांनी अवैध ठरवले आहे. या व्यतिरिक्त व्यवसायाच्या अशा सर्व प्रकारांना त्याने वेचून वेचून अवैध घोषित केले आहे जे आपल्या आकाराच्या दृष्टीने विवाद निर्माण करणारे आहेत इस्लामच्या या व्यापारी कायद्यांचे विस्तृत रूपाने अध्ययन कराल तर आपणास माहित होईल की आज ज्या पद्धतीने लोक करोडपती बनत आहेत. त्यांच्यातून अधिकांश त्या पद्धती आहेत ज्याच्यावर इस्लामने अत्यंत कडक कायदेशीर प्रतिबंध लावले आहेत. तो धन कमविण्याच्या ज्या साधनांना अवैध ठरवितो, त्यामध्ये सीमित राहून काम केले तर लोकांसाठी अपार धन जमा करत जाण्याची खूप कमी संभावना शेष राहते.

आता पहा, मनुष्य मान्य पद्धतीने जे काही प्राप्त करेल, त्याला इस्लाम त्या व्यक्तीची मिळकत म्हणून परवानगी देतो. परंतु तिच्या उपभोगात त्याला पूर्णतः हा स्वतंत्र सोडत नाही तर त्यावरही अनेक बंधने घालतो. विदित आहे की या कमाविलेल्या संपत्तीच्या वापराचे तीन प्रकार संभव आहेत. एक तर ती खर्च करून टाकावी, किंवा तिला लाभदायक कामावर लावावे, अथवा ती जमा करावी. यामधून एक एकावर इस्लामने जी बंधने घातली आहेत संक्षेपात अशी आहेत. खर्च करण्याचे जितके प्रकार नैतिकतेला हनी पोचवितात अथवा ज्यांच्यामुळे समाजाला नुकसान पोहोचते ते सर्व वर्जित आहेत. आपण आपली संपत्ती जुगारात उडवू शकत नाही व दारू पिऊ शकत नाही. आपण व्याभिचार करू शकत नाही. आपण गाणे वाजविणे, नाच रंग आणि विलासितेच्या दुसऱ्या प्रकारांमध्ये आपला पैसा वाहू शकत नाही. तुम्ही रेशमी वस्त्र परिधान करू शकत नाही. सोने व जवाहीर यांच्या दागिन्यांचा वापर करू शकत नाही. असे दागिने फक्त स्त्रिया घालू शकतात. आपण छायाचित्रांनी आपल्या भिंतींना समजू शकत नाही. सारांश हा की इस्लामने त्या सर्व दारांना बंद करून टाकले ज्यांच्यामुळे मांनवाच्या संपत्तीचा अधिकांश भाग आपल्या विलासितेवर खर्च होत असतो. तो खर्चाच्या ज्या पद्धतींना मान्य करतो त्या या प्रकारच्या आहेत की माणसाने फक्त एका सामान्य दर्जाचे शिष्टता पुर्ण आणि पवित्र जीवन व्यतीत करावे. त्याहून अधिक जर काही शिल्लक राहत असेल तर त्याला खर्च करण्याचा मार्ग इस्लामने हा सुचविला आहे की त्याला पुण्य आणि भलाईच्या कामांमध्ये जनहितार्थ आणि त्या लोकांच्या सहाय्यता कार्यात खर्च करावे जे आर्थिक संपत्ती मधून आपल्या गरजांनुसार वाटा मिळविण्यापासून वंचित राहिले आहेत. इस्लामच्या दृष्टीत सर्वात अधिक योग्य पद्धती आहे की माणूस जे काही कमवितो त्याला आपल्या मान्य आणि उचित गरजांवर खर्च करावे आणि मग जे काही शिल्लक राहील त्याला दुसऱ्यांना देऊन टाकावे. म्हणजे ते आपल्या या गुणाला इस्लामने उच्चतम स्तराच्या नैतिकतेत सम्मिलित केले आहे. एका आदर्शाच्या रूपात याला इतक्या शक्तीनिशी प्रस्तूत केले आहे की जेव्हा कधी समाजात इस्लामच्या नैतिकतेचा गाजावाजा असेल सामाजिक जीवनामध्ये ते लोक अधिक आदराच्या दृष्टीने पाहिले जातील जे कमवितात खर्च करून टाकतात आणि त्या लोकांना चांगल्या दृष्टीने पाहिले जाणार नाही जी संपत्तीला साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतील किंवा कमिविलेल्या संपत्तीतून शिल्लक राहिलेल्या वाट्याला पुन्हा कमविण्याच्या कामी लावतील.तरीसुद्धा विशुद्ध नैतिक शिकवणी द्वारा आणि समाजाच्या नैतिक प्रभाव आणि दबावाने अत्याधिक लोभ आणि लोलुपता ठेवणाऱ्या लोकांच्या कमतरतेचे पूर्णतः उन्मूलन केले जाऊ शकत नाही. असे असताना सुद्धा अनेक असे लोक बाकी राहतील जे आपल्या गरजा पेक्षा अधिक असलेल्या संपत्तीला आणखीन जास्त संपत्ती कमविण्यात लावू इच्छितात. यासाठी इस्लामने त्यांच्या वापराच्या पद्धतीवर काही कायदेशीर प्रतिबंधलावलेले आहेत. इस्लामी कायद्यात पूर्णतः निषिद्ध आहे आपण कोणाला आपला माल कर्जावर देत आहात जरी त्याने ते कर्ज आपल्या गरजा वर खर्च करण्यासाठी घेतले असेल अथवा जिविकेच्या साधन निर्मिती साठी इत्यादी, प्रत्येक दशेत आपण त्याच्याकडून केवळ आपली मूळ रक्कम परत घेण्याचे अधिकारी आहेत. या प्रकारे इसलाम अन्याया वर आधारित भांडवलदारी ची कंबर तोडून टाकतो आणि त्या सर्वात मोठ्या शास्त्राला बोथट करून टाकतो. ज्याला आपण व्याज म्हणतो. ज्याच्या द्वारे भांडवलदार केवळ आपल्याच बळावर आसपासच्या आर्थिक धनसंपत्तीला साठवत जातो. शिल्लक धन व्यक्ती वाटेल तर आपल्या व्यापार उद्योग अथवा दुसऱ्या व्यवसायात लावू शकतो अथवा दुसऱ्याच्या सोबत लाभा मध्ये सामील होऊन त्याने संपत्ती जमा करावी याला इस्लाम वैध करार देतो आणि यापेक्षा जी आवश्यकतेपेक्षा अधिक धन लोकांजवळ साठत जाते त्याचा उपाय   दुसऱ्या प्रकारे करीत असतो.

(क्रमशः, भाग - ३)

-अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget