Halloween Costume ideas 2015

सूरह इब्रहिम : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(४५) वास्तविकत: तुम्ही त्या लोकांच्या वस्तीत वास्तव्य करून चुकला होता ज्यांनी स्वत:च आपल्यावर अत्याचार केला होता आणि पाहिले होते की आम्ही त्यांच्याशी कसा व्यवहार केला आणि त्यांची उदाहरणे देऊन तुम्हाला आम्ही समजाविलेदेखील होते.

(४६) त्यांनी आपली सर्व कटकारस्थाने करून पाहिली पण त्यांच्या प्रत्येक कारस्थानाला अल्लाहपाशी उत्तर होते. त्यांची कारस्थाने इतकी भयंकर होती की पर्वतही मागे सरावेत’’५५

(४७) तर हे पैगंबर (स.)! तुम्ही कदापि असा समज करून घेऊ नका की अल्लाह कधी  आपल्या  पैगंबरांना  दिलेल्या  वचनांविरूद्ध वागेल.५६ अल्लाह महान शक्तिशाली आहे आणि शिक्षांही करणारा आहे.

(४८) सावध करा यांना त्या दिवसापासून जेव्हा पृथ्वी व आकाशाचे मूळ रूप बदलले जाईल,५७ आणि सर्वच्या सर्व एकमेव महान शक्तिमान अल्लाहसमोर उघडे पडून हजर होतील.

(४९) त्या दिवशी तुम्ही अपराध्यांना पाहाल की साखळदंडाने हातपाय जखडलेले असतील


५५) पूर्वीच्या लोकांनी ईशनियमांविरुद्ध लोकनीती स्वीकारल्याने आणि त्या दुष्परिणांमापासून वाचण्यासाठी आणि पैगंबरांच्या आवाहनकार्याला विफल करण्यासाठी कशा प्रकारच्या जबरदस्त चाली खेळल्या गेल्या हे तुम्ही पाहिले आहे. तसेच तुम्ही हेसुद्धा पाहिले आहे की अल्लाहच्या एकाच युक्तीने त्यांच्या सर्व चाली विफल ठरल्या. तरी तुम्ही सत्याविरुद्ध कटकारस्थाने करण्यापासून दूर राहू शकले नाही. तुमची ही कारस्थाने यशस्वी होतील तुम्ही हेच समजून आहात.

५६) या वाक्यात संबोधन प्रत्यक्ष पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आहे. परंतु खरेतर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या विरोधकांना सचेत करणे हा उद्देश आहे. त्यांना सांगितले जात आहे की अल्लाहने पूर्वी आपल्या पैगंबरांना जी वचने दिली होती त्यांना पूर्ण केले आणि त्यांच्या विरोधकांची नामुष्की केली होती. आतासुद्धा अल्लाह आपले पैगंबर मुहम्मद (स.) यांना जे वचन देत आहे त्याससुद्धा पूर्ण केले जाईल आणि विरोधकांना तोंडघशी पाडले जाईल.

५७) कयामतच्या दिवशी जमीन व आकाश पूर्णत: नष्ट होणार नाहीत तर वर्तमान नैसर्गिक व्यवस्थेला अस्ताव्यस्त केले जाईल. हेच या आयतीवरून व कुरआनच्या इतर संकेतांवरून स्पष्ट होते, त्यावेळी पहिले आणि दुसरे नरसिंग फुंकण्याच्या मधील काळात जमिनीचे व आकाशाचे वर्तमान स्वरुप बदलले जाईल आणि एक दुसरी सृष्टीव्यवस्था प्रकृतीच्या दुसऱ्या विधानांसह बनविली जाईल. यालाच आखिरत (परलोक) म्हटले जाते. दुसऱ्यांदा नरसिंग फुंकल्याने तर ती सर्व माणसे जी प्रथम पुरुष (आदम (अ.)) यांच्यापासून ते कयामत (पुनरुत्थान) पर्यंत जन्मले होते, त्या सर्वांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि ते अल्लाह समोर हजर केले जातील. याचेच नाव कुरआनच्या भाषेत `हश्र' आहे. `हश्र' चा अर्थ होतो एकत्रित करणे किंवा गोळा करणे. कुरआन संकेतानुसार आणि हदीस कथनानुसार हे सिद्ध आहे की `हश्र' याच धरतीवर होईल. येथेच ईशन्यायालय स्थापित होईल. येथेच मीजान (तराजू) (न्यायनिवाड्यासाठी) लावला जाईल आणि जमिनीवरील वादविवाद व तंटे जमिनीवरच चुकते केले जातील. मनुष्याच्या या दुसऱ्या जगात हे सर्व घडेल, ते फक्त आध्यात्मिक स्वरुपाचे नसतील. ठीक त्याच्या स्वत:च्या व्यक्तित्वासह त्याच शरीरात आणि आत्म्यानिशी मनुष्याला जिवंत केले जाईल ज्याप्रकारे आज जिवंत आहे. प्रत्येकजण ठीक त्याच्याच व्यक्तित्वाने तिथे जिवंत केला जाईल ज्याला घेऊन त्याने जगाला निरोप दिला होता. हे सर्व कुरआन व हदीसने सिद्ध आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget