त्याग, समर्पण आणि ईश्वराप्रती निष्ठेचे प्रतीक म्हणजे ईद उल अज्हा. प्रेषित हजरत इब्राहिम अलै. यांच्या आणि प्रेषित ईस्माईल अलै. या पिता पुत्राच्या असीम प्रेम आणि त्यागाचे प्रतीक ही ईद उल अज्हा आहे. सौभाग्यशाली आहेत ते लोक जे ईश्वराकडून घेण्यात आलेल्या प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात.
ईद उल अजहानिमित्त ऐपतदारांनाच कुर्बानी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यांनीच आपल्या कुर्बानीतील दोन हिस्से गोरगरीब आणि नातेवाईकांत वितरण करण्याचे आदेश आहेत. ईश्वर फर्मावितो, ‘‘त्यांचे मांसही अल्लाहला पोहचत नाही आणि त्यांचे रक्तदेखील नाही परंतु त्याला तुमची निष्ठा पोहचते. त्याने यांना तुमच्यासाठी अशाप्रकारे अधीन केले आहे की जेणेकरून त्याने प्रदान केलेल्या मार्गदर्शनावर तुम्ही त्याचा महिमा वर्णावा. आणि हे पैगंबर (स.), शुभवार्ता द्या सदाचारी लोकांना.’’ (सुरे हज (22) आयत क्र. 37)
Post a Comment