Halloween Costume ideas 2015

मिलता नहीं है


कोरमंडला रेल्वे दुर्घटनेत जे लोक मारले गेले त्यातले बरेचसे ओळखीपलीकडे होते. एक पिता आपल्या मुलाला शोधत म्हणत होता, “मिलता नहीं है”. कपडे पाहूनच जसे काही लोक कोण आहेत ते तसेच त्याचे कपडे पाहून तो माणूस कोण हे उघड होते. एक अत्यंत गरीब व्यक्ती त्याचा मुलगा या गाडीने प्रवास करत होता. त्याचा शोध घेत पिता तिथे आणि थेट जिथे शव ठेवले होते त्या ठिकाणी आपल्या मुलाला हुडकत होता. त्याची खात्री होती की त्याचा मुलगा वाचला नाही. कारण गरीब माणसे रेल्वेच्या जनरल बोगीमध्ये प्रवास करतात आणि जिथे ७३ प्रवाशांना बसण्याची सोय आहे तिथे २०० पर्यंत लोक या डब्यात खच्चून बसलेले-उभारलेले असतात. बरेच लोक दरवाजाजवळच्या जागेत तर काहीलोक अगदी बाथरुममध्ये उभे राहून प्रवास करतात. म्हणून या पित्याला पक्की खात्री होती की त्याचा मुलगा वाचला नसेल. म्हणून एकेक शवावरची चादर ज्या नशीबवान डेथबॉडींना ती मिळाली होती, उचलून आपल्या मुलाला शोधत होता. बऱ्याच डेथबॉडी उघड्याच होत्या. लक्षावधी उद्योगपतींचे कर्ज माफ केल्यानंतर चादरी घ्यायला कुठे पैसे शिल्लक राहतील. “मेरा लडका मिलता नहीं” असे तो माणूस प्रत्येकाला डोळांत अश्रू भरलेला आवाड निघत नसताना सांगत होता. एका आशेवर की कुणीतरी त्याला सांगावं की तुमचा मुलगा तिथे आहे. जीवंत की मयतही, त्याची पित्याला काळजी नव्हती. पण त्याचा मुलगा मिळाला नाही. ओडिशा रेल्वे दुर्घटनेत जवळपास ३०० लोक मरण पावले. अक्षरशः किती ते माहीत नाही. हा अपघात झाल्यावर रेव्ले मंत्र्यांचे नाव पहिल्यांदाच कानावर पडले आणि लक्षात आले की या देशाला एक मंत्रींडळदेखील आहे. मंत्र्यांना आपल्या शासनाच्या शासकाचे गुणगान करण्यापलीकडे कुठे वेळ मिळत असेल आपली जबाबदारी पार पाडण्याची! एक प्रकारे गुणगान करणे एवढीच एक जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली आहे की काय असे देखील काहींना वाटत असेल. असो मंत्री महोदय बाहेर आले. अपघात स्थळावर पोहोचले. तिकडे काही मीडियावाले कुणाच्या काळात किती रेल्वेअपघात झाले, त्यामध्ये किती मरण पावले, याची आकडेवारी शोधत होते. अर्थ एवढाच की आम्ही किती लोकांचे प्राण घेतले आणि तुम्ही किती, कारण या पलीकडे त्यांची दुसरी कोणती जबाबदारी देखील नाही.

या अपघाताच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी अहवाल, आकडेवारी रेल्वेसंबंधीची सर्वांना कळली. ते सगळं ऐकल्या-वाचल्यावर एकच प्रश्न सतावतो की जर रेल्वेचे ते सर्व बजट खर्च करून जरजर अवस्थेतील रेल्वे सुरक्षित झाली असती आणि त्या पित्याला आपला मुलगा कमीतकमी मेलेल्या प्रवाशांच्या ढिगाऱ्यात शोधण्याची वेळ आली नसती. जनरल बोगीत प्रवास करणाऱ्यांच्या वारसांना शासनाची रेल्वेची मदतही मिळू शकत नाही. कारण जनरल बोगीमध्ये प्रवास करणाऱ्यांचा पुरावा नसतो, की ते याच गाडीने प्रवास करत होते. म्हणून त्या पित्याला त्याचीही आशा नाही.

रेल्वे अपघात झाल्यावर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होताच फारच रागावून जातात मंत्रीलोक. त्यांना वाटते ड्रायव्हरच्या अगर दुसऱ्या कुणाच्या चुकीने अपघात झाल्यावर त्यांचा काय दोष! दोष सारा नागरिकांचाच. त्यांना चांगले व्यवस्थापन हवे, चांगले शासन हवे, चांगल्या रेल्वेगाड्या हव्यात. प्रत्येक गोष्ट त्यांना चांगली हवी. याचा कधी राग ह्या मंत्र्यांना येणार नाही का?

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक,

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget