Halloween Costume ideas 2015

इजराईलची 75 वर्षे : एक धावता आढावा


14 मे 2023 रोजी इजराईलच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथे मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. इजराईल हा जगातील एक असा देश आहे जो त्याच्या स्थापनेपासूनच विवादास्पद आहे. अशा या देशाच्या 75 वर्षाच्या वाटचालीसंबंधी एक धावता आढावा घेणे वाचकांच्या ज्ञानात वृद्धी करण्यासाठी उपयुक्त ठरेल म्हणून हा लेखनप्रपंच.

आज ज्याला इजराईल म्हटले जाते त्याची स्थापना 14 मे 1948 साली संयुक्त राष्ट्राच्या एका घोषणापत्राने झाली. त्यापूर्वी 1914 साली सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात तीन खंडावर राज्य करणाऱ्या उस्मानिया खिलाफतीने जर्मनीला साथ देण्याचा निर्णय केला होता. या युद्धात जर्मनीचा पराभव झाला म्हणजे उस्मानिया खिलाफतीचा पराभव झाला हे ओघानेच आले. या युद्धात आपला विजय निश्चित व्हावा यासाठी ब्रिटनने तीन मोठे कुटनीतिक निर्णय घेतले होते. त्यांनी हिजाज (सध्याचा सऊदी अरब) च्या अरबांना असे वचन दिले होते की, 

 युद्धात विजय झाल्यावर तुम्हाला तुर्कीच्या खिलाफतीपासून आम्ही स्वतंत्र करू. आपल्याला स्वतंत्र देश मिळणार या कल्पनेमुळे हरखून गेलेल्या अरबांनी ब्रिटनच्या बाजूने व तुर्कीच्या विरोधात युद्ध केले होते. दूसरा कुटनीतिक निर्णय म्हणजे ब्रिटनने अमेरिकेतील ज्यू लोकांशी संधान बांधून त्यांना पॅलेस्टाईनमध्ये स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र देऊ, असे वचन दिले. या मागचा उद्देश ज्यूंचे समर्थन मिळविणे हा होता. तीसरा निर्णय ब्रिटनने फ्रांसशी केला होता की युद्ध जिंकल्यानंतर आपण उस्मानिया खिलाफतीमधील त्रिखंडीय क्षेत्र अर्धे-अर्धेे विभागून घेऊ. महायुद्ध संपल्यानंतर या तिन्ही निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. उस्मानीया खिलाफतीचे शकले करून 40 पेक्षा जास्त नवीन देश तयार करण्यात आले. बाकीच्या देशांच्या इतिहासाला बाजूला ठेवून पॅलेस्टीनवर लक्ष केंद्रीत करूया. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर पॅलेस्टाईन हे 1918 ते 1948 या कालावधीमध्ये ब्रिटनच्या अधिपत्याखाली होते. याच कालावधीमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले ज्यू आपल्याला नवीन राष्ट्र मिळणार आनंदीत होऊन पॅलेस्टिनकडे कूच करत होते. ब्रिटनने त्यांचे मुक्तहस्ते स्वागत केले आणि बघता-बघता पॅलेस्टीनमध्ये ज्यूंची लोकसंख्या 55 ट्न्नयांवर गेली. मात्र आपल्याला लवकर आपले राष्ट्र मिळत नाही म्हणून 1942 पासून ज्यूंनी स्वतंत्र राष्ट्रासाठी पॅलेस्टीनमध्ये इंग्रजांच्या विरूद्ध सशस्त्र चळवळ सुरू केली. आत्मघाती हल्ले व बॉम्बस्फोट करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. तेव्हा ब्रिटनने पॅलेस्टाईन, संयुक्त राष्ट्र संघाच्या हवाली करून तेथून काढता पाय घेतला. संयुक्त राष्ट्राने यावर अभ्यास करून पॅलेस्टाईनचे तीन भाग केले. 

45 टक्के भूमी पॅलेस्टाईनला व 55 टक्के भूमी ज्यूना देऊन जेरूसलेम शहर मात्र स्वतःकडे ठेवले व त्यावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण राहील असे जाहीर केले. या घोषणापत्राप्रमाणे 14 मे 1948 रोजी इजराईलची स्थापना झाली. मात्र संयुक्त राष्ट्राचा हा निर्णय इजराईलच्या आजूबाजूला असलेल्या अरब राष्ट्रांना मान्य झाला नाही व त्यांनी लगेच इजराईलवर आक्रमण केले. 1 वर्षे हे युद्ध झाले. त्यात अमेरिका आणि ब्रिटनने इजराईलला भरपूर मदत केली यात अरब राष्ट्रांचा पराभव झाला आणि पराभूत अरब राष्ट्रांच्या बऱ्याच भूभागावर इजराईलने कब्जा मिळविला. आपला अपमानास्पद पराभव झाल्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये असंतोष वाढला आणि 1967 साली पुन्हा अरब राष्ट्रांनी इजराईलवर दूसरा हल्ला केला. हे युद्ध सहा दिवस चालले. यातही ब्रिटन आणि अमेरिकेच्या अत्याधुनिक हत्याराच्या मदतीने इजराईलने या युद्धात विजय मिळविला व इजिप्तसहीत आजूबाजूच्या अरब देशांचा आणखीन भूभाग बळकावला. 1973 साली पुन्हा अरबांनी इजराईलवर हल्ला केला. परंतु त्यांना युद्ध करता आले नाही. कारण तोपर्यंत इजराईल अरबांच्या तुलनेत बलशाली झाला होता. अरबांना परत फिरावे लागले. इकडे पॅलेस्टीनच्या भूमीमध्ये आपोआप अल्पसंख्येत आलेल्या लाखो पॅलेस्टीनी नागरिकांवर इजराईलने अत्याचार सुरू केले. त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून 1974 साली पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ)ची स्थापना करण्यात आली व त्याला संयुक्त राष्ट्र संघाने मान्यताही दिली. 

1979 साली इजिप्त आणि इजराईल यांच्यात पहिला शांतता करार झाला. या करारामुळे इजिप्तची जिंकलेली भूमी इजराईलने परत केली व इजराईलचे तत्कालीन पंतप्रधान व इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष यांना नोबेल शांतता पुरस्कार विभागून देण्यात आला. परंतु इजिप्शीयन नागरिकांना आपल्या पंतप्रधानाचा निर्णय आवडला नाही आणि दोन वर्षांच्या आत म्हणजे 6 ऑ्नटोबर 1981 रोजी वार्षिक परेड समारंभामध्ये राष्ट्रपती अन्वर सादात यांचा खून करण्यात आला. दरम्यान इजराईलने जॉर्डन, सीरिया आणि लेबनान या शेजारी राष्ट्राच्या जिंकलेल्या भूमी आणि पॅलेस्टाईनच्या गाजा आणि वेस्टबँक क्षेत्रात नवीन वस्त्या बांधण्यास सुरूवात केली. या बांधकामांना संयुक्त राष्ट्राने गैरकायदेशीर घोषित केले. परंतु, अमेरिका आणि ब्रिटनच्या असलेल्या पालकत्वामुळे इजराईलविरूद्ध कोणतीही कार्यवाही केली नाही. 

1992 साली इजराईलचे सौम्य प्रवृत्तीचे पंतप्रधान इसाक रॉबिन आणि पीएलओचे अध्यक्ष यासीर अराफात यांच्यात बिल्निलंटन यांच्या पुढाकाराने शांती करार झाला आणि पीएलओला आपल्या भागामध्ये सरकार स्थापन्याची संधी देण्यात आली. ज्याला गव्हर्नमेंट ऑफ पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटी असे म्हटले गेले. यात पॅलेस्टीन भूमीचे तीन गटात वर्गीकरण करण्यात आले. एक ज्यात पॅलेस्टीन मुस्लिमांची संख्या जास्त होती तिथे पॅलेस्टाईन नॅशनल अ‍ॅथॉरिटीला सरकार चालविण्याची संधी देण्यात आली. दोन ज्यात ज्यूंची संख्या जास्त होती त्या पॅलेस्टीनच्या भागाला इजराईलच्या अधिपत्याखाली देण्यात आले. तीन ज्या ठिकाणी मिश्र वस्ती होती त्यात दोघांचे संयुक्त नियंत्रण ठेवण्यात आले. या कृत्यासाठी इसाक रॉबिन आणि यासीर अराफात या दोघांनाही शांततेचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. मात्र इजराईलच्या कट्टरपंथी ज्यूंना हा करार मान्य झाला नाही. त्यांनी 1995 साली इसाक रॉबिन यांची हत्या केली. त्यानंतर ही त्रिस्तरीय विभागणी आपोआपच कोसळली. त्यातून 1995 साली हमासचा उदय झाला. हमास ही एक सशस्त्र चळवळ होती आणि आहे. त्यांना पीएलओच्या शांतताप्रिय वाटाघाटी आवडत नव्हत्या. यांनी निवडणुकाही घेतल्या आणि 2006 मध्ये गाजामध्ये यांनी सरकारही स्थापन केले. परंतु, ब्रिटन आणि अमेरिकेने त्यांच्या सरकारला मान्यता न देता त्यांना एक आतंकवादी संघटन म्हणून घोषित केले. 2007 मध्ये हमास आणि पीएलओ समर्थित फतेह  यांच्यात गृहयुद्ध सुरू झाले आणि गाझामध्ये हमास तर वेस्टबँकमध्ये फतेह यांनी नियंत्रण मिळवून आपापले सरकार सुरू केले. 

येणेप्रमाणे हा प्रश्न ब्रिटन आणि अमेरिकेने मिळून उपस्थित केलेला आहे व त्यांनीच तो सोडवावा, अशी जगाची अपेक्षा आहे. परंतु या दोघांनी मिळून इजराईलला इतके सश्नत केले आहे की इजराईल आता एक अघोषित परमाणू श्नती बनलेला आहे. अमेरिकेने त्याला आयर्न डोम देऊ केलेले आहे. त्यामुळे गाझाकडून हमास कितीही रॉकेट हल्ले करो आयर्न डोममुळे 90 टक्के रॉकेट निष्क्रिय केली जातात. नुकत्याच झालेल्या चकमकीमध्ये मोठ्या प्रमाणात इजराईलने हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करून जबर नुकसान पोहोचवलेले आहे. इजराईलने पॅलेस्टीनीयनवर एवढे अत्याचार सुरू केलेले आहेत जेवढे हिटलरनेही ज्यूंवर केले नसतील. परंतु जग शांतपणे पाहत आहे.       

-एम.आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget