कंद हा एक भाजीचा प्रकार आहे. अनेकांनी ह्याची चव घेतली असणार. महाराष्ट्र राज्यात सर्व भाजी विक्रेत्यांकडे सुरण मिळतो. देखणा नसेल, आकाराने ओबडधोबड असेल पण याची भाजी खाणार्यालाच कळेल, किती चविष्ठ असते! सुरणाचा कंद अर्धगोलाकृत चपटा आणि गडद तपकिरी रंगाचा असतो. हा कंद म्हणजे सुरणाचे रूपांतरित खोड (modified underground sterm) म्हणूनच ही वनस्पती बहुऋतुजीविता असून तीस घनकंद(corn) असतो. आशियाई खंडातील विविध देशामध्ये सुरण आणि इतर कंदांचे पीक जास्त घेतले जाते. भुसभुशीत माती खालील भागात अनेक कंद तयार होतात. काही नैसर्गिक जगतात तर काहींची शेती केली जाते. राताळी, कणघरे, करांदे, शेवर कंद इत्यादी पिकं ही जमिनी खाली तयार होतात. मात्र त्याची पाने, वेली इत्यादी मॉन्सूनमध्यें सर्वत्र हिरवीगार दिसतात. शेतकऱ्यानी लागवड केलेली कंदमुळं मॉन्सून नंतरच्या कडक उन्हामुळें त्याची हिरवळ अति आर्द्रतायुक्त उष्म्यामुळे वाळून जाते. खूण म्हणून त्या ठिकाणी एखादी लाकडी मेढ रोवली जाते. जेणेकरून कंद लावलेली जमीन ओळखता यावी. मोठी दिवाळी सण झाल्या नंतर शेतकरी ह्याचे पीक जमिनी बाहेर काढण्यासाठी म्हणून ठरलेल्या जागेखाली फूट दोन फूट खोदल्यास खाली बऱ्यापैकी आकार घेतलेली कंद मुळाच्या सान्निध्यात एकमेकात गुंतलेली दिसतात. बाहेर काढून त्यांची नीट स्वच्छता करून त्यांस मेसाच्या टोपलीत किंवा घमेल्यात ठेवली जातात. शेतकऱ्यांना पीक घरात आल्याचे समाधान मिळते. अशा कंदाच्या वेलीना जमिनीवर येताच नीट आधार द्यावा लागतो. जेणेकरून त्या वेलीची वाढ नीट दिशे व्हावी आणि मुळातील कंदाची वाढ देखील व्यवस्थित व्हावी. जोराचा वारा, अतिवृष्टी झाल्यास वेलींना आधार मिळतो. म्हणून शेतकरी बरीच काळजी घेत असतो. अशा वेलीना जमिनीवर पडू न देता त्यांची वरवर वाढ होत राहिल्यास त्यास भुंगा लागत नाही. कीड मुंग्यापासून वेलींची सुरक्षा आवश्यक आहे. अधूनमधून रानटी गवत आकार घेत राहिल्यास पिकाची अपेक्षित वाढ होत नाही, म्हणूनच वेळच्या वेळी तेथील बेनणी होणे आवश्यक असते. जेणे करून जागा स्वछ राहते. सुरण हा प्रकार सांबार मध्ये आवर्जुन वापरला जातो. वांगी, शेवगा आणि सुरणाचे लहान लहान तुकडे मिश्रित भाज्यांचा जो रस्सा तयार होतो त्यांस उडुपी रेस्टॉरंट मध्ये लोक आवडीने खातात. इडली/वडा सांबर आणि त्यासोबत नारळ खोबऱ्याची चटणी. लंच घेतल्याचे समाधान मिळते. काहीं गृहिणी सुरणाची मसालेदार चविष्ठ भाजी शिजवून वरण-भात समवेत जेवणात घेतात. खरंतर हे एक पूर्णान्न आहे. मराठी जेवणात सुरणाची भाजी आवडीने खातात. कोकणात तर याला विशेष स्थान आहे. त्याचे जरी औषधी गुण कळत नसले तरी चवीला मस्त वाटणारे कंद ही एक विशेष डिश समजली जाते. सुरण ही वनस्पती कंद कुळातली असून ती विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अरण्यात मिळते. त्याचे आयुर्वेद उपयुक्त खूप फायदे असल्याने अनेकांनी त्याची थेट शेती करण्याचे ठरविले. म्हणूनच सुरण कंद वजनावर भाजी मंडईत विकला जातो. पाईल्सवर याचे सेवन केल्याने खूप फायदा होतो असे विकिपीडियावर नोंद केल्याचे वाचनात आले. कणघरं, रातळी, करांदे इत्यादी कंद भाजी मंडईत सहसा रोजच मिळत नसतील, कारण अशा कंदांचे सेवन सणासुदीला घरोघरी केले जाते. दापोली तालुक्यातील सारंग, ताडील या गावातील काही शेतकरी आंग्ल नववर्षाच्या सुरुवातीला आपली कंद पिकं एसटी स्टॅंड बाहेर विक्रीला आणतात. त्याहीपुढे दापोली पनवेल महामार्गावर पेण, रामवाडी भागातील शेतकरी हमरस्त्याच्या कडेला अनेक प्रकारची कंद टोपलीत घेऊन बसतात. त्याची विक्री खूप होते. प्रायव्हेट कारवाले विविध प्रकारचे करांदे, सुरण इत्यादी पीके आवडीने विकत घेत असतात. जशा आपण जेवणात इतर भाज्या खातो तसेच सुरणाची चटपटीत मसालेदार भाजी आपल्या ताटात नक्की असावी, कारण सुरण हे पुरणान्न आहे. हे गृहिणी ओळखून आसतात. ह्याची शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास शेतकऱयाला आर्थिक नफा घेता येतो. फक्त ज्या ठिकाणी कंद जमिनीखाली लावले जातात त्या संपूर्ण जागेला काटेरी कुंपण किंवा मत्स्यव्यवसायातील टाकावू जाळ्याचे कोट केले जातात. मी स्वतः असा एक प्रयोग केला होता. भुईमूग, कणघर, सुरण कंद अशी आंतर पिकं घेण्याचा विचार होता. लागवडीला पूरक अशी काटेरी कुंपण असल्याने रानडुक्कर नाही पोचू शकले. एकदोन जाणकार शेतकऱयांनी कंद शेती करण्यापूर्वी जमिनीची मशागत करणे आवशयक असते, असे सुचविले. जँतु नाशक पावडरीचा उपयोग करणे गरजेचे आहे. माती टिकावाने खोदून त्यांतील बारीक-सारीक दगड बाहेर टाकून द्यावेत. आयुर्वेदिक खताचे त्या मातीत मिश्रण आवश्यक असते. अशा पद्धतीने कमावलेल्या मातीत कंद लागवड केल्यास ऐशी टक्के पीक मिळू शकते. कोकणात अतिप्रमाणात पाऊस पडतो म्हणूनच कंद शेती उतारावर लावणे जास्त बरे. ती पद्धत पेण-रामवाडी या रायगड जिल्ह्यातील भागात हमरस्त्यावरन सहज दिसते. शेतकऱ्यांना कंद पिकाची वाहतूक सोईची होते. आजची नवीन पिढी याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊ पाहते हे जास्त म्हत्वाचे. चकचकीत माहोल मध्ये ओबडधोबड दिसणारी कंद पिकं लोक खातात, हे छान. सर्वांनी याचा आपल्या रोजच्या आहारात प्रयोग करून पहावा, एवढीच अपेक्षा.
- इकबाल शर्फ मुकादम
९९२०६९४११२
Post a Comment