Halloween Costume ideas 2015

मुस्लिमांचे महामानवांसाठी योगदान


- दीपक त्रंबक गायकवाड
भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. पण तो आतून फुटलेला आहे. हे सत्यवचन आज प्रत्येक भारतीयाला विचार करायला लावणारे असले तरी भारत कोणामुळे फुटलेला आहे, म्हणजेच भारताच्या बंधुत्वाला व ‘हे विश्वची माझे घर’ मानणाऱ्या तत्त्वाला कोणामुळे तडा गेलेला आहे या प्रश्नाचे उत्तर वाचकानेच स्वत:च्या बुद्धीला विचारावे असे मला वाटते. पण मला एक तत्त्व या ठिकाणी सांगायचे आहे ते असे की, ज्यांनी भारत फोडला व ज्यांनी भारत जोडण्याचे काम केले, त्या मुस्लिम समाजाला या देशातल्या मातीतला माणूस समंजस होऊन त्याला न्याय देणार आहे की नाही? की तोडणारांच्या व फोडणारांच्या विचारांचा गुलाम होऊन आपल्याच मुस्लिम बांधवांना आरोपीच्या पिंजऱ्यात कायम उभे करून तोडणाऱ्या-फोडणाऱ्या वृत्तीलाच मदत करणार आहे? या वरील वाक्यात मी ‘मुस्लिम बांधव’ हा शब्द यासाठी वापरला आहे की, आज भारतात जेवढे मुस्लिम आहेत ते सर्व मुळातले खानदानी मुस्लिम नसून ते मुळचेच या भारतीय मातीतले मूलनिवासी आहेत. सच्चे भारतीय आहेत. माझ्या या म्हणण्याला जसा ऐतिहासिक पुरावा आहे तसाच भाषाशास्त्राचाही भक्कम पुरावा आहे. ऐतिहासिक या दृष्टीने की सेतू माधव पगडी हे ‘काश्मीरचा इतिहास’ या पुस्तकात महाराष्ट्रीयन मुस्लिमांबद्दल लिहितात की महाराष्ट्रातले गावोगावी पसरलेले व वास्तव्य करून राहिलेले मुस्लिम हे दुसरे तिसरे कोणी नसून ते छ. शिवाजी महाराज्यांच्या मराठा सैन्यातीलच कर्तबगार मुस्लिम आहेत. तसेच १९९२ मध्ये अमेरिकेच्या बामशात नावाच्या शास्त्र विभागाच्या प्राध्यापकाने जगातील प्रमुख वंशाचे दोन लाख लोकांचे रक्त नमुने तपासून हे सिद्ध केले होते व त्याच्या या संशोधनाला भारतीय सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. तसेच या संशोधनात अमेरिकेबरोबर भारतातील मानववंशास्त्र विभाग, पुरातत्व विभाग व भाषाशास्त्र विभाग हाही सामील होता. या संशोधनाने सरळ सिद्ध केले होते की भारतातील इतर सर्व जनसमूहांच्या व वंशांच्या रक्तातील डी.एन.ए. एकमेकांशी पूर्णपणे जुळतात, पण मूळ भारतीयांचे डी.एन.ए. फक्त आणि फक्त ब्राह्मण वंशाशी जुळत नाहीत. तसेच मूळ भारतीयांचे रक्त डी.एन.ए. ब्राह्मणी वंपशासी न जुळण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के आहे. तसेच हेही सांगितले होते की भारतातील ब्राह्मणी वंशाचे व समाजाचे डी.एन.ए. भारता बाहेरील फक्त आणि फक्त यहुदी वंशाशी जुळतात. या संशोधनाच्या निष्कर्षात सरळ मांडले की, भारतीय ब्राह्मण हे भारत देशाचे मूळ नागरिक नसून ते त्या भूमित परकीय आहेत. पण याहीपेक्षा या संशोधनाने भारतीय मुस्लिम हे भाराततील परकीय आहेत असे कोठेच मांडले नाही. म्हणजेच भारतीय मुस्लिम हे या मातीचे मूळ भारतीय आहेत, असा सरळ अर्थ होतो. कारण मुस्लिमांच्या रक्तातील डी.एन.ए. मूळ भारतीयांच्या रक्ताशी पूर्णपणे जुळतात. यात कोणतीच शंका नाही.
दुसरे असे की भारतीय मुस्लिम हे मूळ भारतीयच आहेत याला भारतीय बाषाशास्त्र विभागाचा व मानववंशशास्त्राचाही पुरावा मिळतो. माळी हा शब्द मराठी भाषेचा आहे. पण याच मराठी भाषेतील माळी शब्दाला हिंदू भाषेत बागवान म्हणता. आता माळी ही हिंदू धर्मातही जात आहे आणि आडनावही आहे. तसेच मुस्लिम धर्मात बागवान आडनावाचा समाज आहे. म्हणजेच ज्या माळ्यांनी हिंदू धर्माला कंटाळून इस्लाम धर्मात धर्मांतर केले ते धर्मांतरित बागवान झाले. तसेच हिंदू धर्मातल्या व मराठा समाजातल्या बऱ्याच जनांची आडनावे पाटील आहेत आणि ज्या पाटलांनी मुस्लिमांत धर्मांतर केले तेच मुस्लिम पटेल आडनावाने ओळखले जाऊ लागले. याचप्रमाणे हिंदूंत वैदू ही एक जमात आहे. त्यांचा धंदा पोत, मणी विकण्याचा आहे. त्यांनी इस्लाम धर्मात प्रवेश केला आणि ते मणियार म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदू धर्मात बांगड्यांचा व्यवसाय करणारे कासार आहेत. हे इस्लाम धर्मात गेल्यावर कासार, बांगडीवाला झाले. हे जसे हिंदू धर्मातून धर्मांतर करणाऱ्या मुस्लिमांच्या बाबतीत घडले तेच शीख धर्मियांच्या बाबतीतही घडले. म्हणजेच थोडक्यात सांगायचे तर भारतीय मुस्लिम हे या मातीचे मूळ नागरिक आहेत. त्यांना पाकिस्तानात चालते व्हा असे म्हणणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. जे खरोखर परकीय मुस्लिम होते ते भारत पाकिस्तानची फाळणी झाल्या झाल्या गेलेले आहेत. कारण त्यांची भारतीय मातीशी कोणतीच नाळ जुळलेली नव्हती. पण ज्यांची जुळलेली होती ते गेलेच नाहीत. कारण त्यांच्या आजपर्यंत ज्या हजारो पिढ्या उभ्या राहिल्या त्या याच भारतीय मातीतल्याच आहेत. म्हणून ते आजही आपल्याला मूळ भारतीय भावंडाचा अतोनात त्रास सहन करूनही भारतातच राहात आहेत. कारण आपलीच बावंडे कधझीतरी सुधारतील व या देशात मुळातच परकीय असणाऱ्या ब्राह्मणाचे ऐकून न घेता हिंदू-मुस्लिम भाईभाई म्हणून जवळ घेऊउन उराशी कवटाळतील ही त्यांना मनोमन आशा आहे. ती त्यांनी आजही त्याच ताकदीने जपलेली आहे.
भारतीय मुस्लिमांनी फक्त बंधुत्वाची आशाच धरलेली नाही तर त्यासाठी त्यांनी वेळप्रसंगी प्राणाची बाजी लावून त्यागही केलेला आहे. त्यांच्या या त्यागाला इतिहास साक्षी आहे. बरे तो छ. शिवाजी महाराजांपासून फुले-आंबेडकरांपर्यंतचा आहे. छत्रपतींच्या अंगरक्षणात सर्वांत जास्त म्हणजे १८ पैकी १३ जण हे मुस्लिम होते. औरंगजेबाच्या ताब्यात आपले मुंडके देऊन प्रतिशिवाजी म्हणून बसणारा मदारी मेहतर हा मुस्लिम होता. तर काझी हैदर हा वकील व तोफखाण्याचा इब्राहीम खान हाही मुस्लिमच होता. छत्रपंतींच्या रयतेच्या राज्याला हिंदवी स्वराज्य म्हणून त्याच छत्रपतींच्या स्मृतीदिनाला रायगडावर हजारो ढोल वाजवणाऱ्या आजच्या मराठ्यांना हे समजले पाहिजे. खरे तर छ. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मराठा जातीचे सैन्यच नेमके किती होते हे ‘मराठ्यांच्या तलवारीला महारांची धार हे पुस्तक वाचल्यावर त्यांना समजून येईल. कारण छ. शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्या उभे केले तेच मुळात महार, मुस्लिम व ओबीसी समाजाच्या ताकतीवर व शुरत्वावर, हे छत्रपतींचा इतिहास वाचून मन लावून समजून घेतले तरच समजते. पण हे सत्य मानील त्याला मराठा कसे म्हणावे हा माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण छ. शिवाजी महाराजांची विचारसरणीच मुळात माणूस ओळखण्याची व बंधुत्वाची होती. पण आज त्यांचेच वंशज तो विचार ब्राह्मणी विचाराने प्रेरित होऊन तोडण्यासाठी व फोडण्यासाठी वापरत आहेत. या मार्गक्रमणाचे विशेष वाटते.
छ. शिवाजी महाराजांची मूळ भारतीयांवर जेवढी मर्जी व विश्वास होता तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक त्यांचा मुस्लिमांवर होता, तर मुस्लिम सत्तेशी लढणे हा त्याचं्या स्वराज्य कारभाराचा राजकीय भाग होता. बहुजनांपेक्षा मुस्लिमांवर छ. शिवाजी महाराजांचा अधिक विश्वास होता याचे कारण असे होते की छ. शिवाजी महाराजांच्या आजोबांचे म्हणजेच मालोजी राजेंचे गुरू मुहम्मद बाबा शेख नावाचे मुस्लिम ग्रहस्थ होते. या मुहम्मद बाबांना मालोजी राजेंनी मोठ्या श्रद्धापूर्वक अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथे आणून तेथे त्यांना आश्रम स्थापून दिला. आजही श्रीगोंदे येथे या मुहम्मद बाबांची समाधी असून महाराष्ट्रातल्या सर्वच हिंदू-मुस्लिमांच्या बंधुत्वाचे ते प्रतीक आहे. हाच श्रद्धेचा वारसा छ. शिवाजी महाराजांनी पुढे तेवढ्याच हिमतीने चालवला.
छ. शिवाजी महाराजांचे खरे तीन गुरू आहेत आणि ते अनुक्रमे जीजाऊ माता, संत तुकाराम व रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावचे बाबा याकूत हे मुस्लिम साधू होत. पण मराठे आज मनुवाद्यांकडून हिंदुत्व लेखणीतून छ. शिवाजी महाराज समजून घेत असल्यामुळे ते फक्त संत तुकारामांच्याच नावाचा गुरू म्हणून उदोउदो करून मुस्लिम बाबा याकूतांना जाणीवपूर्वक विसरण्याचे ढोंग करतात. हे त्यांचे कृत्य इतिहासाला नाकारणारेच आहे.
परकीय आर्य वंशाच्या पुरुषप्रधान वैदिक संस्कृतीला या देशात बुद्ध, चार्वाक, संत तुकाराम व यांच्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी सुरूंग लावला. मूळ भारतीयांचे त्यांच्या बपोली भाषेत प्रबोधन करून व तशी ग्रंथसंपदा निर्माण करून वैदिक धर्माचे व अमानूष वृत्तीचे ऑडीच केले. पण हे करत असताना मूळ भारतीयांना राष्ट्रपिता फुले देण्यासाठी मुस्लिमांचा त्यापाठीमागे किती मोठा त्याग व मानवतावाद आहे याचा विचार आज मूळ भारतीय म्हणून प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
ज्या वेळी गोविंदरावांनी ज्योतिबांना शाळेत टाकले त्या वेळी गोविंदरावांचा घरगडी कृष्णाजीराव गोविंदरावांना म्हणाला, ‘‘गोविंदराव, तुम्ही हे काय केले? तुमच्या मुलाला तुम्ही शाळेत टाकले? तुम्ही शूद्र आहात. शूद्राचा मुलगा जर ज्ञान प्राप्त करेल तर ते धर्मपाप होईल. तुमचे कुळ भ्रष्ट होईल.’’
हे कथन सत्य समजून ज्योतिबा फुलेंना शाळेतून काढून घेण्यात आले. परंतु गोविंदरावांच्या शेजारी राहणाऱ्या गफ्फार मुन्शी बेग यांनी ज्योतिबांना स्वत:च्या हिमतीवर परत शाळेत बसवले. म्हणजे ज्योतिबा फुलेंना शिक्षणाचे धडे देऊन महात्मापणाकडे वाटचाल करायला लावणारा गफ्फार मुन्शी बेग हा मुस्लिम सत्पुरुष होता हे विसरून कसे चालेल? एवढेच नाही तर फुलेंनी पुढे मुलींसाठी शाळा काढून स्वत:च्या पत्नीला म्हणजे सावित्रीमातेला शिक्षिका नेमले तेव्हा ‘धर्म बुडाला - धर्म बुडाला’ म्हणून ब्राह्मणांनी ओरड करून गोविंदरावांचे कान भरले आणि ज्योति-सावित्रीला घराबाहेर हाकलून देण्यास भाग पाडले. पण ज्या वेळी ज्योतिबा आपल्या बायकोला संगती घेऊन सामाजिक क्रांतीसाठी बाहेर पडले त्या वेळी माळी तर सोडाच पण एखादा पाटील-देशमुख सुद्धा त्यांना साथ देण्यास पुढे आला नाही. त्या वेळी या क्रांतिज्योतीला आणि ज्ञानसावित्रीला साथ दिली ती फक्त फातिम शेख आणि उस्मान शेख या मुस्लिम बहीण-भावांनी. म्हणूनच म्हणावे लागते. या क्रांतिज्योतिबांना जर मुस्लिमांनी साथ दिली नसती तर प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता ज्योतिबा फुले नावाचे तिसरे गुरू मिळाले असते का?
(पूर्वार्ध)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget