नागपूर (डॉ.एम.ए.रशीद) -
कुरआनमध्ये सांगितलेल्या शांती, प्रगती आणि मुक्तिच्या मार्गदर्शनामुळे द्वेष, घृणा, अन्याय आणि अत्याचारांचा अंत होऊ शकतो. त्यासाठी सकारात्मक संवादानी रूढ़िवादी विचारांचा अंत होऊन समाजात शांतीपूर्ण वातावरण बनू शकेल, असे विचार जमाअत ए इस्लामी हिंद प्रसार विभागाचे केंद्रीय सचिव इक़बाल मुल्ला यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र 12 ते 21 जानेवारी पर्यंत इस्लाम : शांति, प्रगति व मुक्तिसाठी राज्यव्यापी अभियान राबवित आहे. नागपूरच्या तलाव , टाटा पारसी शाळेजवळ शिक्षक सहकारी बैंक सभागृहमध्ये अभियानाच्या उद्घाटन समारोहात शुक्रवारी ते बोलत होते.
यावेळी नागपूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, या अभियानचा उद्देश्य सत्यता सांगणे आहे. मानव इतिहास ईशदूत यांनी भरलेला आहे. त्यांनी लोक आणि परलोकचा यशस्वी मार्ग सांगितला. नशा, व्याभिचार, भ्रष्टाचार व अन्यायाने समाजतील शांति भंग होते. कुपोषण आणि भुखमरीमुळे मृत्यु चिंताजनक आहे आणि ते प्रगती साठी बाधक आहे. इस्लाममध्ये मानव जीवनाला उत्तरदाई बनविले आहे. उत्तरदाई जीवन शांति चे महत्वपूर्ण कारक असल्याचेही मुल्ला म्हणाले.
नागपूर शहर झोनचे पोलीस उपायुक्त राहुल ए.माकनीकर म्हणाले, इस्लाममध्ये कुठल्याही प्रकारची जोर ज़बरदस्ती नाही. कुरआन सांगतो कि, जर तुम्ही कोण्या एका नाहक माणसाचे प्राण घेतले तर जणू पूर्ण मानवतेचे प्राण घेतले, मग कसे शक्य आहे कि इस्लाम तलवारीच्या बळावर पसरला आहे. आम्हाला इस्लामच्या जिहाद आणि दयाची परिभाषा यावर अवश्य विचार करायला पाहिजे.
जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्ष तौफ़ीक असलम ख़ान म्हणाले, या देशात कुणीच उपाशी राहू नये , ना कुणाची इज़्ज़त विकावि आणि ना कुणी आपल्या अधिकारापासून वंचित रहावे. हा जमाअत इस्लामीचा मुख्य उद्देश आहे. त्यांनी सांगितले कि, पूर्ण मानवजात एक परिवार आहे आणि मानव सेवा करणारा खरा मानव आहे. स्वातंत्र्याचा इतक्या वर्षानंतरही शेतकरी आत्महत्या करत आहेत. समाज परिवर्तन व्हायला हवे तरच विकास आणि प्रगती शक्य आहे. त्यांनी सांगितले कि कुरआन आम्हाला शांतिचा संदेश देतो. त्यामुळे कुरआनच्या मार्गदर्शनाचा आम्हाला सखोल अभ्यास करून जीवनात त्याचे आचरण करणे गरजेचे आहे. त्यानंतर खर्या अर्थाने आम्ही सर्वांगाने शांती, प्रगती आणि मुक्तीची फळे चाखू शकू. प्रसार विभागाचे राज्य सचिव इम्तियाज़ शेख़ यांनी जमाअतचा परिचय आणि त्याची कार्यप्रणाली यावर प्रकाश टाकला. अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष माननीय डॉ.श्रीपाल सबनीस यांनी कार्यक्रमाचे उद्धाटन करीत सांगितले कि, इस्लामच्या सखोल अभ्यासाची आवश्यकता आहे. इस्लाममध्ये शांती, मानवता, समानता आणि उदारतेचा उपदेश आहे. कुरआनच्या शांतिमय संदेशाला पैग़म्बर हज़रत मुहम्मद साहब यांनी अमलकरून हरित क्रांतिचा काळ आणला. त्यांनी स्त्रियांना मर्यादे युक्त जीवन जगण्याचा अधिकार दिला. कुठल्याही गोष्टीवर मुसलमान यांना पाकिस्तानला जाण्याची गोष्ट करणे अत्याधिक अशोभनीय आहे. मुसलमान याच देशाचा मूलनिवासी आहे. हिंदू आणि मुस्लिम कट्टरवाद चिंतनीय आहे. यांच्या भांडणामध्ये मानवता नष्ट होत आहे. कुरआन पठन हिदायत सिद्दीक़ी यांनी केले तर प्रोफेसर अय्युब ख़ान यांनी भाषांतर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सुत्रसंचालन अशरफ़ बेलिम यांनी केले. जिल्हाअध्यक्ष डॉ आस़िफुज़्ज़मा ख़ान यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, पुरूष, महिला आणि युवक-युवतींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Post a Comment