1 जुलै 2016 रोजी बांग्लादेशची राजधानी
ढाका
येथे
झालेल्या
आतंकवादी
हल्ल्यामध्ये
सामील
तरूणांपैकी
एकजण
मुंबईच्या
डॉ. जाकीर नाईकशी प्रभावित असल्याची बातमी ढाक्याच्या एका वर्तमान पत्रात प्रकाशित झाली होती. त्या आधारे जाकीर नाईक यांची चौकशी करून त्यांची सर्व मालमत्ता जप्त करून त्यांची चारी बाजूंनी कोंडी करण्यात आली. इतकी की ते त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांना त्यांचे तोंडही पाहता आले नाही. सरकारने त्यांना आंतरराष्ट्रीय आतंकवाद समर्थक घोषित करण्यासाठी इंटरपोलला रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याचा प्रस्ताव देखील पाठविला. अलिकडेच इंटरपोलने सरकारचा प्रस्ताव नाकारत डॉ. जाकीर नाईक यांच्या विरूद्ध जारी केलेली रेड कॉर्नर नोटिस चौकशीअंती इंटरपोलच्या नियमात बसत नसल्यामुळे ती वगळली आहे.
यावरही सरकार विचार करेल का?
ढाक्याच्या कुठल्याश्या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीवरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार यांनी जाकीर नाईक यांची चौकशी केली. याच न्यायाने दि. 6 डिसेंबर 2017 रोजी मुहम्मद अफराजुल याची हत्या करून जारी केलेल्या आपल्या व्हिडीओमध्ये शंभुलाल रेगर याने आपण कुणाशी प्रेरित आहोत याचा खुलासा केलेला आहे. मात्र तो ज्याच्याकडून प्रेरित झाला त्यांची चौकशी कधी होणार? त्यांच्यावर कारवाई कधी होणार? का जाकीर नाईकला एक माप आणि शंभुलाल रेगरला प्रेरित करत असलेल्या हिंदुत्ववादी संस्था आणि वाहिन्यांना दुसर्या मापाने मोजले जाईल? जगातील सगळ्यात मोठा लोकशाहीला हे शोभणारे आहे काय? हा प्रश्न सामान्य जनतेमध्ये चर्चिला जात आहे. ज्या लव्ह जिहाद संबंधी शंभुलालने आपल्या व्हिडीओमध्ये ओरड केली होती. त्याचीही पोलखोल नवभारत टाईम्सने केलेली आहे.
Post a Comment