Halloween Costume ideas 2015

राजसमन्द : भयंकर अपराध आणि भितीदायक घृणा

- राम पुनियानी
राजस्थानच्या राजसमंदमध्ये 6 डिसेंबर रोजी घडलेली घटना मन हेलावून टाकणारी होती. शिवाय, घृणा पसरविण्याच्या अभियानाने आपले किती अधःपतन झालेले आहे, हे ही रेखांकित करणारी होती. शंभुलाल रेगर नावाच्या एका व्यक्तीने जो पूर्वी संग-मरमर या मौल्यवान दगडाचा व्यापारी होता ने 6 डिसेंबरला अफराजुलखान नावाच्या एका मुस्लिम मजुराची काम देण्याच्या निमित्ताने बोलावून निघृण हत्या केली. पश्चिम बंगालहून आलेल्या अन्य मजुरांप्रमाणे अफराजुलसुद्धा राजस्थानमध्ये येऊन सडक निर्माण आणि इतर मजुरीचे काम करून आपला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. या घटनेतील सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे शंभुलालने आपल्या 14 वर्षाच्या पुतण्याकडून या हत्याकांडाचा व्हिडीओ बनविला आणि नंतर तो समाज माध्यमावरही टाकला.
      शंभुलालला जरी अटक झाली तरी त्याच्या या बर्बतापूर्ण हत्येच्या समर्थनार्थ काही लोक पुढे आलेले आहेत. एका वकीलाने शंभुच्या परिवाराला  50 हजार रूपयांची मदद केलेली आहे. देशभरातून 3 लाख रूपये गोळा केलेे गेलेले आहेत. हिंदू सनातन संघ नामक एका संघटनेच्या उपदेश राणा नावाच्या एका व्यक्तीने उदयपूरमध्ये शंभुलालच्या समर्थनार्थ रॅली काढण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. पोलिसांना कित्येक ठिकाणी शंभुलालच्या समर्थकांना पिटाळून लावण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. कित्येक लोक शंभुलालला नायक समजू लागलेले आहेत. ही घटना ओरिसामधील बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने ख्रिश्चन धर्मगुरू ग्राहम स्टेन्सला जीवंत जाळण्यात आलेल्या घटनेची आठवण करून देणारी आहे. शंभुलालच्या घृणास्पद अपराधानंतर सुद्धा त्याचे समर्थक ज्या पद्धतीने पुढे येत आहे, ही बाब समाजामध्ये घृणेचे विष किती खोलपर्यंत रूजलेले आहे, हे दाखवून देणारी आहे.
      या घटनेवर पीयुसीएलच्या अहवालात म्हटलेले आहे की, ” शंभुलाल, आर.एस.एस.च्या घृणा पसरविणार्या फॅक्ट्रीमधील एक क्लोन होता आणि म्हणूनच त्याने हा भयानक गुन्हा केला.” या घटनेमुळे आंतकित झालेले कित्येक मजुरांचे परिवार राजस्थान सोडून पश्चिम बंगालला पळून जात आहेत. दारासिंहने ग्रामस्टेन्स आणि त्याच्या दोन कोवळ्या मुलांना जीवंत जाळून मारल्यानंतर तेव्हाचे राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी म्हटले होते, ” ये घटना दुनिया की काली कर्तुतों की सूची में शामिल होगीदारासिंह हा हिंदू दक्षीणपंथी संघटनांमध्ये सक्रीय होता आणि सांप्रदायिक हिंदूमधील एक वर्ग त्याच्याकडे अत्यंत सन्मानाच्या नजरेने पाहत होता. याच वर्गाने दारासिंहला कोर्टातील लढाई लढण्यासही मदत केली होती. त्याला मिळालेल्या मृत्यूदंडाला जन्मठेपेमध्ये परावृत्तीत करण्यासाठीही प्रयत्न केले होते.
      शंभुलालचा व्यापार व्यवस्थित चालत होता. मात्र नोटबंदी झाल्यानंतर त्याला झालेल्या नुकसानामुळे तो आपला बहुतेक वेळ व्हॉटस्अॅपवर घालवत होता. त्याने अपलोड केलेल्या व्हिडीओंची पडताळणी केल्यावर लक्षात येते की, त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या विरूद्ध किती घृणा भरलेली होती. त्याला असे वाटत होते की, मुस्लिम पुरूष हे लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू महिलांना आपल्या जाळ्यात ओडत होते. त्याला वाटत होते की, मुस्लिम समुदाय हा हिंदु समुदायासाठी मोठे संकट आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये बाबरी मस्जिद, पद्मावती, लव्ह जिहाद इत्यादी शब्द ओरडून वापरले आणि हे म्हटले की, ” इन लोगों से बदला लिया जाना चाहिए.”
      काही लोक या घटनेची तुलना कर्नाटकात झालेल्या एका हिंदू मुलाच्या हत्येशी करीत आहेत. त्या मुलाचे लिंग कापण्यात आले होते. आपल्या समाजात दिवसेंदिवस घृणास्पद गुन्ह्यांची संख्या वाढत आहे, यात शंका नाही. अनेक पीडित बिगर मुस्लिम देखील आहेत. परंतु, बहुतेक करून अल्पसंख्यांक आणि दलितांनाच टार्गेट केले जात आहे. त्यातही मुस्लिमच जास्त पीडित आहेत. मागील काही वर्षांपासून देशात जातीय हिंसेच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. समाजाला भंग करणार्या विचारधारेचा बोलबाला झालेला आहे. मागच्या तीन वर्षापासून या प्रक्रियेमध्ये गती आलेली आहे. परंतु, आपल्या सर्वांना लक्षात ठेवायला हवे की, धार्मिक आधारावर देशाला विघटित करण्याची प्रक्रियाही इंग्रजांच्या काळात सुरू झालेली होती. मुस्लिम शासकांद्वारे जिझीया लावणे, मंदिरांना नष्ट करणे, आणि हिंदूंना बळजबरीने मुसलमान बनविणे सारख्या मुद्यांना मुद्दामहून प्रसिद्धी दिली जात आहे. या चुकीच्या संकल्पना आता समाजाच्या विचार प्रक्रियेचा भाग बनलेल्या आहेत. याचा उपयोग आपसात घृणा फैलावण्यासाठी केला जात आहे. काही पूर्वगृह समाजात पूर्वीपासून अस्तित्वात होते. परंतु, वैश्विक आतंकवाद ज्याची पाळेमुळे तेलाच्या राजनीतिमध्ये आहेत ने परिस्थितीला आणखीन वाईट बनविलेले आहे.
      भारतात 1980 नंतरच्या कालखंडात मुस्लिमांचे लागूनचालन, त्यांचा व्यक्तीगत कायदा, त्यांच्यात असलेली निरक्षरता आणि त्यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात मुलं जन्माला घातल्या जात आहेत, सारख्या मुद्यांचा उपयोग करून संपूर्ण मुस्लिम समाजाची प्रतिमा वाईट करण्याच्या प्रयत्नाला सुरूवात झालेली आहे. ज्याप्रमाणे ख्रिश्चनांचे दानवीकरण करण्यासाठी धर्मपरिवर्तन या मुद्याला पुढे करण्यात आले. त्याचप्रमाणे मुस्लिमांचे दानवीकरण करण्यासाठी पवित्र गाय, लव्ह जिहाद इत्यादी मुद्यांचा उपयोग केला गेलेला आहे.
      मागील काही वर्षामध्ये जो बदल झालेला आहे तो हा की, अखलाख, पहेलू जुनेदच्या खुन्यांना आणि उणामध्ये दलितांविरूद्ध दबंगगिरी करणार्या लोकांना असे वाटू लागले आहे की, ते कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकतात. यामुळे त्यांची हिम्मत वाढलेली आहे. कारण सत्तेत बसलेली मंडळीही त्यांचीच भाषा बोलत आहेत. यामुळे या लोकांना वाटत आहे की, सरकार आपलेच आहे. जेव्हा केंद्रीयमंत्री अखलाखच्या खुनाचा आरोप असलेल्या आरोपीच्या प्रेताला तिरंग्यामध्ये गुंडाळतो याचा देशात काय संदेश जाईल? अखलाखच्या हत्येच्या आरोपीला दिला गेलेला सन्मान, शंभू सारख्या लोकांना ह्याच प्रकारचे अपराध करण्याचे धाडस आणि प्रेरणा देईल, अशा प्रकारच्या गुन्ह्यांची कल्पनासुद्धा काही वर्षापूर्वी करणे शक्य नव्हते.
      या घटनेची तुलना कर्नाटकमध्ये झालेल्या खुनाच्या घटनेशी करणे म्हणजे देशातील वाढत्या जातीयवादाकडून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र आहे. कायदा आपले काम करेल आणि ते कायद्याकडून अपेक्षितही आहे. परंतु, दुष्प्रचाराचे काय? अफवांचे काय? ज्यामुळे समाजातील एका गटामध्ये दुसर्या गटाच्या रक्ताची तृष्णा तयार होत आहे. जेव्हा आपले पंतप्रधान जाणून बुजून अशा गुन्ह्यानंतर गप्प राहतात तेव्हा लोकांना कळून चुकते की ते ट्विटरसारख्या समाज माध्यमांवर घृणा पसरविणार्या लोकांना ते फॉलो करीत आहेत. याचा भविष्यात निर्माण होणार्या शंभुसारख्या लोकांना काय संदेश जात असेल?

      या देशाचा इतिहास विभिन्न समुदायाच्या लोकांचा एकत्रित राहण्याचा, जीवंत आणि अनेक रंगानी युक्त अशा संस्कृतीचा इतिहास आहे. या देशामध्ये अस्तित्वात असलेल्या विभिन्न धर्माच्या लोकांनी खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्याची लांब आणि कठीण लढाई लढलेली आहे. तो देश आज कुठे पोहोचला आहे? आपल्याला हा देश परत एक करावा लागेल. उपदेश राणा आणि त्याच्यासारख्या लोकांच्या धार्मिक राष्ट्रवादाच्या चंगूलमधून या देशाला काढून प्रत्येक धर्मामध्ये निहित असलेल्या प्रेम आणि सद्भावनासारख्या मानवी मुल्यांची ओळख देशाला परत करून द्यावी लागेल. (इंग्रजीतून हिंदीत एल.एस. हरदेनिया आणि हिंदीतून मराठीत बशीर शेख, एम.आय.शेख यांनी भाषांत केले.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget