‘‘उमर बिन खत्ताबकडून अबू उबैदा व मुआ़ज (रजि.) यांच्या नावे, तुमच्यावर शांती असो.
तुम्हां दोघांचे पत्र मिळाले, त्यात लिहिले आहे की यापूर्वी मी वैयक्तिक सुधार, प्रशिक्षण, संरक्षण आणि निरीक्षणासाठी विचार केला होता, परंतु आता या सर्व जनसमुदायाची जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली आहे. माझ्यासमोर वरिष्ठ दर्जाचे लोकही बसतील व कनिष्ठ दर्जाचे लोकदेखील, मित्रही जवळ येतील व शत्रूही आणि प्रत्येकाला अधिकार आहे की त्याच्याशी न्याय केला जावा. तुम्ही लिहिले आहे की ‘‘हे उमर (रजि.)! अशा स्थितीत काय करायला हवे याचा विचार करा.’’ मी याचे उत्तरादाखल आणखी काय म्हणू शकतो कारण उमर (रजि.) जवळ न उपाय आहे न क्षमता. जर त्याला क्षमता मिळण्याची शक्यता आहे तर ती फक्त अल्लाहकडून मिळू शकते. मग तुम्ही मला त्या परिणामापासून भयांकित केले आहे ज्या परिणामाला पूर्वीचे लोक भयग्रस्त होते. ही रात्रंदिवसाचा पेâरा जो मानवाच्या जीवनाशी संलग्न आहे, तो दूर असलेल्या वस्तूला एकसारखा जवळ आणू लागला आहे आणि प्रत्येक वस्तूला जुने बनवू लागला आहे आणि प्रत्येक भविष्यकथन घेऊन येत आहे (माहिती देत आहे प्रत्येक घडणाऱ्या घटनेची), इतकेच नव्हे तर जगाचे आयुष्य संपुष्टात येईल आणि परलोक प्रकट होईल, त्यात प्रत्येक मनुष्य स्वर्ग अथवा नरकात जाईल. तसेच तुम्ही आपल्या पत्रात या गोष्टीची भीती दाखविली आहे की या जनसमुदायाचे लोक अंतिम युगात उघडपणे एकमेकांचे मित्र असतील आणि परोक्षात एकमेकांचे शत्रू असतील. खबरदार! तुम्ही ते लोक नाही ज्यांच्याबाबतीत ही माहिती दिली गेली आहे आणि ते युगदेखील नाही जेव्हा हा ढोंगीपणा जाहीर होईल. तो काळ असा असेल जेव्हा लोक आपल्या भौतिक लाभाकरिता एकमेकांशी प्रेम करतील आणि भौतिक लाभाला वाचविण्याकरिता एकमेकांना भीतील. मग तुम्ही लिहिले आहे की अल्लाहचा आश्रय की मी तुमच्या पत्राचा काही चुकीचा अर्थ काढीन. निश्चितच तुम्ही खरे बोलत आहात. तुम्ही शुभेच्छेच्या भावनेनेच लिहिले आहे. यापुढे पत्र लिहिण्याचे थांबवू नका. मी तुम्हा दोघांच्या सदुपदेशापासून निस्पृह राहू शकत नाही. तुम्हावर अल्लाहची कृपा असो.’’ (अल मुस्लिमून, फेब्रुवारी १९५४)
सत्याशी प्रेम, असत्याशी द्वेष, सत्कर्माचा आदेश देणे आणि दुष्कर्मापासून रोखणे
माननीय इब्राहीम बिन मैसरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने एखाद्या धर्मद्रोह्याचा सन्मान केला म्हणजे त्याने इस्लामला नेस्तनाबूद करण्यास मदत केली.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘धर्मद्रोही’ म्हणजे असा मनुष्य ज्याने इस्लाममध्ये एखादा दृष्टिकोन अथवा आचरण प्रविष्ठ केले जे इस्लामच्या विरूद्ध आहे अथवा त्यास लागू होत नाही. असा मनुष्य इस्लामची इमारत ढासळविण्याचा प्रयत्न करतो आणि जो मनुष्य अशा व्यक्तीचा सन्मान करतो तो इस्लामला पाडण्यात मदत करतो. पैगंबर मुहम्मद (स.) यांची अशी इच्छा आहे की अशाप्रकारच्या लोकांना मुस्लिम समाजात प्रतिष्ठा व मान-सन्मान मिळू नये आणि त्यांच्या कामांना सहन केले जाऊ नये. जरा या हदीसवर विचार करा आणि मग आपल्या समाजाकडे पाहा की यानुरूप आपल्या समाजाची स्थिती काय आहे?
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
‘‘धर्मद्रोह्याला सरदार म्हणू नका कारण जर असे घडले तर तुम्ही आपल्या पालनकर्त्याला नाराज केले.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘सरदार म्हणू नका’ म्हणजे जो मनुष्य सांगतो एक आणि करतो दुसरेच, ज्याला इस्लामच्या सत्यतेवर विश्वास नाही, ज्याला इस्लामी शिकवणींबाबत शंका वाटते; अशा मनुष्याला आपला सरदार किंवा नेता बनवू नका. जर असे कराल तर अल्लाहची नाराजी ओढवून घ्याल. ज्यावर अल्लाह नाराज झाला त्याचे काही खरे नाही; या जगात आणि परलोकातदेखील विनाश.
माननीय अब्दुल्लाह इब्ने अमर इब्ने अल-आस (रजि.) यांनी सांगितले, ‘‘मद्य पिणारे जेव्हा आजारी पडतील तेव्हा त्यांची विचारपूस करण्यासाठी जाऊ नका.’’ (हदीस : अल-अदबुल मु़फरद)
Post a Comment