Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)

(२५८) तुम्ही त्या माणसाच्या अवस्थेवर विचार केला नाही काय की ज्याने इब्राहीम (अ.) शी वाद घातला होता?२९० वाद याबाबतीत की इब्राहीम (अ.) चा पालनकर्ता कोण आहे, आणि या कारणास्तव की त्या माणसाला अल्लाहने राज्य-सत्ता देऊन टाकली होती.२९१

290) त्या व्यक्तीने, अभिप्रेत नमरूद आहे जो आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या इराक देशाचा बादशाह होता. ज्या घटनेचा येथे उल्लेख आला आहे त्याकडे बायबलमध्ये संकेत आलेला नाही. परंतु तलमुदमध्ये ही पूर्ण घटना वर्णन केली आहे आणि बहुतांश कुरआन वर्णनासारखी आहे. यात दाखविले गेले आहे की पैगंबर इब्राहीम (अ.) यांचे वडील नमरुदच्या दरबारात राज्याचा मुख्‌याधिकारी म्हणून कार्यरत होते. इब्राहीम (अ.) यांनी जेव्हा सार्वजनिकरित्या अनेकेश्वरत्वाचा विरोध आणि एकेश्वरत्वाचा प्रचार सुरु केला आणि देवालयात जाऊन मूर्तभंजन केले, तेव्हा त्यांच्या वडिलांनी स्वयं त्यांचा दावा बादशाह नमरुदच्या दरबारी दाखल केला आणि नंतर तो सर्व वार्तालाप झाला जो येथे दिला आहे.
291) म्हणजे या भांडणात जो विवाद होता तो  हा की इब्राहीम (अ.)आपला पालनकर्ता कोणास मानतात?  आणि हा तंटा यामुळे उद्‌भवला होता, की हा तंटा करणाऱ्या नमरूद बादशाहला अल्लाहने सत्ता दिली होती. या दोन वाःयांत भांडणाच्या स्वरुपाकडे जो संकेत आहे त्यास समजण्यास खालील वास्तविकतेवर नजर टाकणे आवश्यक आहे.
(1) पुराण काळापासून आजपर्यंत सर्व अनेकेश्वरवादी संस्थांची ही सर्वसाधारण विशेषता आहे की ते  अल्लाहला सर्व देवांचे देव महादेवाच्या रूपाने मान्य करतात. परंतु केवळ त्यालाच निर्माणकर्ता, पालनकर्ता  व शासनकर्ता मान्य  करत नाही. तसेच एकमेव अल्लाहला उपास्य मानत नाहीत.
(2) ईशत्वालासुद्धा अनेकेश्वरवादींनी नेहमी दोन भागांत विभागलेले आहे. एक अलौकिक ईश्वर जो कार्यकारणावर शासन करतो आणि ज्याच्याकडे मनुष्‌य आपल्‌या गरजापूर्तसाठी आणि संकटसमयी मदतीसाठी याचना करतो. या ईशत्वात ते अल्लाहसोबत आत्मा, ईशदूत, जिन्न, ग्रह आणि इतर अनेक वस्तूंना भागीदार ठरवितात. त्यांच्याजवळ प्रार्थना करतात आणि सर्व रूढी-परंपरागत पद्धतीने त्यांची उपासना करतात. त्यांच्या वेदींवर बळी देतात आणि नैवेद्य दाखवितात. दुसरे, सांस्कृतिक आणि राजनैतिक क्षेत्राचे ईशत्व (सार्वभौमत्व) जो जीवनविधान निर्धारित करण्याचा अधिकारी आणि आज्ञापालन करण्याचा हकदार असता; जगात या राजनैतिक प्रभुत्वालाच शासन करण्याचे सर्व अधिकार असतात. या दुसऱ्या प्रकाराच्या ईशत्वाला (खुदाई) जगातील तमाम दांभिकांनी आणि अनेकेश्वरवादींनी प्रत्येक काळात अल्लाहशी हिसकावून बादशाह, धार्मिक गुरु, पुरोहित आणि समाजातील मोठ्या लोकांत या ईशत्वाला वाटून टाकले आहेत. म्हणून राजघराणे याच दुसऱ्या अर्थाने प्रभुत्वासाठीचे हकदार बनले गेले आणि या दाव्याला मजबूत करण्यासाठी त्यांनी सर्वसाधारणत: पहिल्‌या अर्थाच्या अल्लाहाची संतान होण्याचा दावा केला. धार्मिक वर्ग या बाबतीत त्यांच्या या षड़्‌यंत्रात सामील झाले. 
(3) नमरूद बादशाहाचा ईशत्वाचा (खुदाई) दावासुद्धा याच दुसऱ्या प्रकारातील होता. तो अल्लाहच्या अस्तिवाला मान्य करणारा होता. त्याचा दावा हा नव्हता की जमीन व आकाशांचा निर्माणकर्ता आणि सृष्टीची व्यवस्था सांभाळणारा तो स्वत: आहे. त्याचे म्हणणे हेही नव्हते की कार्यकारणच्या जगात त्याचेच राज्य आहे. त्याचा दावा तर हा होता की या इराक देशाचा आणि येथील प्रजेचा एकटा निर्विवाद शासक मीच आहे. माझा शब्द कायदा आहे. माझ्यावर कोणतीच श्रेष्ठ सत्ता नाही ज्याच्यासमोर मी उत्तरदायी असेल. इराकचा प्रत्येक तो नागरिक गद्दार व देशद्रोही आहे जो या भूमिकेत मला पालनकर्ता (रब) मान्य करत नाही, किंवा माझ्याशिवाय इतर कोणाला रब (पालनकर्ता शासक) मानतो. 
(4) इब्राहीम (अ.) यांनी जेव्हा सांगितले, "मी फक्त जगाच्या एकमात्र निमार्णकर्ता, पालनकर्ता व शासनकर्ता अल्लाहला रब, उपास्य आणि खुदा (अल्लाह) मानतो आणि त्याच्याशिवाय कोणालाही "रब' मान्य करण्यास व अशा प्रभुत्वास मान्य करण्यास नकार देतो.' तेव्हा प्रश्न फक्त हाच निर्माण होत नाही की राष्ट्रीय धर्म आणि धार्मिक उपास्यांच्या बाबतीत त्यांची ही नवीन धारणा कुठवर सहन करण्यायोग्य आहे ? परंतु हा प्रश्नसुद्धा उभा राहिला की राष्ट्रीय सत्ता आणि केंद्रीय सत्ता यावर या विचारसरणीचा आघात होतो. यास कशाप्रकारे दुर्लक्षित करता येईल? याचमुळे नमरूद बादशाहाने आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांना विद्रोहाच्या आरोपाखाली स्थानबद्ध केले आणि नमरुदच्या दरबारात त्यांना बंडखोरीच्या आरोपात उभे करण्यात आले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget