(२५८) जेव्हा इब्राहीम (अ.) नी सांगितले, ‘‘माझा पालनकर्ता तो आहे ज्याच्या अखत्यारीत जीवन व मृत्यू आहे.’’ तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘‘जीवन व मृत्यू माझ्या अधिकारात आहे.’’ इब्राहीम (अ.) ने सांगितले, ‘‘असे होय, तर अल्लाह, सूर्य पूर्वेकडून उदयास आणतो, तू जरा त्याला पश्चिमेकडून उदयास आणून दाखव.’’ हे ऐकून तो सत्याचा इन्कार करणारा आश्चर्यचकित झाला,२९२ परंतु अल्लाह अत्याचाऱ्यांना सरळमार्ग दाखवीत नसतो.
(२५९) अथवा उदाहरण म्हणून त्या माणसाकडे पहा ज्याचे एका अशा वस्तीवरून जाणे झाले जी आपल्या छतांवर कोलमडून पालथी पडलेली होती.२९३ त्याने सांगितले, ‘‘ही वस्ती, जी नाश पावली आहे हिला अल्लाह कशाप्रकारे पुन्हा जीवन प्रदान करील?’’२९४ यावर अल्लाहने त्याचे प्राण काढून घेतले आणि तो शंभर वर्षांपर्यंत मृतावस्थेत पडून राहिला. नंतर अल्लाहने त्याला पुन्हा जीवन दिले आणि त्याला विचारले, ‘‘सांग तू किती काळ पडून राहिला आहेस?’’ त्याने उत्तर दिले, ‘‘एक दिवस अथवा काही तास राहिलो असेन.’’ फर्माविले, ‘‘तुझ्यावर याच स्थितीत शंभर वर्षे व्यतीत झाली आहेत. आता जरा आपल्या अन्न आणि पाण्याकडे पाहा, त्यांच्यात जरादेखील फरक पडलेला नाही. दुसरीकडे आपल्या गाढवाकडेदेखील बघ, (की त्याच्या हाडांचा सापळादेखील जर्जर झाला आहे) आणि हे आम्ही यासाठी केले आहे की आम्ही तुला लोकांकरिता एक निशाणी बनवू इच्छितो.२९५ मग पाहा की हाडांच्या या सापळ्याला आम्ही कशाप्रकारे उत्थापित करून त्याच्यावर मांस व कातडी चढवितो.’’ अशा प्रकारे जेव्हा सत्य स्थिती त्याच्यासमोर पूर्णपणे प्रकट झाली तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला माहीत आहे की अल्लाह प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व राखतो.’’
292) परंतु आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या सुरवातीच्या वाक्यानेच हे स्पष्ट झाले होते की पालनकर्ता प्रभु अल्लाहशिवाय दुसरा असूच शकत नाही. तरीही नमरुदने उद्धटपणे त्याचे उत्तर दिले. दुसऱ्या वाःयानंतर मात्र त्याच्यासाठी आणखी काही धिटाईने बोलण्यासारखे राहिले नाही. तो स्वत: जाणत होता की सूर्य आणि चंद्र त्याच अल्लाहच्या आधीन आहेत ज्यास इब्राहीम (अ.) यांनी पालनकर्ता रब मान्य केले आहे. मग शेवटी नमरूदजवळ सांगण्यासाठी राहिलेच काय? अशाप्रकारे जे सत्य त्याच्यापुढे स्पष्ट होऊ लागले होते, त्यास मान्य करणे म्हणजे आपल्या बेलगाम सत्तेपासून हाथ धुण्यासारखे होते. यासाठी त्याच्या (नमरुद) मनातील "तागूत' तयार नव्हता. त्यामुळे नमरुद फक्त आश्चर्यचकित होऊन राहिला. गर्वाच्या अंधारातून बाहेर पडून नमरुद सत्यवादीतेच्या प्रकाशात येऊ शकला नाही. नमरुदने त्याच्या या "तागूत'ऐवजी अल्लाहला आपला समर्थक आणि रक्षणकर्ता बनविले असते तर आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या वक्तव्याने (प्रचार) सरळमार्ग बनला असता.तलमुदचे वर्णन आहे की यानंतर त्या बादशाहाच्या आदेशाने आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांना कैद करण्यात आले. दहा दिवसांपर्यत ते तुरुंगात राहिले. नंतर बादशाहाच्या दरबारी लोकांनी त्यांना जिवंत जाळण्याचा निर्णय घेतला. त्यांना आगीत झोकून देण्याची घटना घडली ज्याचे वर्णन कुरआनमधे 21:51; 29:16; 37:83 मध्ये उल्लेखित आहे.
293) ही एक अनावश्यक वार्ता आहे की तो मनुष्य कोण होता आणि ती वस्ती कोणती होती. मूळ उद्देशासाठी येथे उल्लेख झाला आहे. त्याचे कारण केवळ हेच दाखविणे आहे की ज्याने अल्लाहला आपला रक्षणकर्ता बनविले होते, त्यास अल्लाहने कशाप्रकारे प्रकाशमय केले. मनुष्य आणि स्थान निश्चितीसाठी आमच्याकडे काहीच साधन नाही व त्याचा काहीच फायदा नाही. परंतु नंतरच्या वर्णनाने हे स्पष्ट होते की ज्या सज्जनाचा इथे उल्लेख आला आहे, ते निश्चितच पैगंबर असतील.
294) या प्रश्नाचे हे उत्तर नाही की ते सद्गृहस्थ मरणोत्तर जीवनाला नाकारणारे होते. किंवा त्यांना परलोकविषयी शंका होती. त्यांना सत्याचा अनुभव हवा होता. सत्य त्यांना आपल्या डोùयाने पाहÿन ¿यावयाचे होते जसे पैगंबरांना दाखविले जात होते.
295) एक अशा माणसाचे जिवंत परत येणे ज्यास जगाने शंभर वर्षांपूर्वीच मृत समजले होते, त्यांना स्वत: आपल्या समकालीन लोकांत एक जिवंत निशाणी बनविण्यासाठी पुरेसे होते.

Post a Comment