माणूस सध्या माणसांचा
होत नाही तर तो आम्हा पक्षांचा कसा काय होईल? आमची निर्मिती तर अल्लाहने माणसांच्या
फायद्यासाठीच केली आहे. मात्र माणूस आमच्या जीवावरच उठला आहे. निसर्गाला त्याने दुषित
करण्याचा चंगच बांधलेला आहे. त्याने नदी प्रदुषित केली, हवा प्रदुषित केली, ध्वनी प्रदुषित
करतोय, दुरध्वनींच्या घातक लहरी व विविध रसायनांच्या माध्यमातून त्याने पूर्ण आसमंत
प्रदुषित केलाय. आमचे जगणे तर तो हराम करतोयच मात्र तो आपल्यांचे सुद्धा जगणे हराम
करतोय. त्याने जाती- पाती आणि धर्माच्या नावावर रक्तपात सुरू केलाय. पूर्वेपासून-पश्चिमेपर्यंत,
दक्षिणेपासून - उत्तरेपर्यंतच्या लोकांच्या मनात भेदभाव निर्माण करून ठेवलाय. त्यांची
मने दुभंगलीत. हे अल्लाह सांग ! तू या मानवाला सर्व काही दिलेस तरी तो नाफरमान झालाय.
आम्ही तर तू ज्या स्थितीत ठेवतो त्या स्थितीत राहत आहोत. मी तर आता माणसांच्या जवळ
सुद्धा फटकत नाही, मला त्याची व त्याच्या विचाराची कीव येतेय, त्याच्या आचरणाची घृणा
येतेय. आजपर्यंत मी तो जसा सांगेल तसा बोलत होतो. ऐ अल्लाह ! तू सांग येणार्या काळात
याचं भविष्य कसं असेल? मी तर आता निःशब्दच झालोय! नांदेडच्या गोदातीरी शांतपणे बसून
हा पोपट अल्लाहकडे अशी विनवनी तर करीत नसेल ना! -
(बशीर शेख)
Post a Comment