एस.आय.ओ.ची आमदारांकडे
मागणी
औरंगाबाद (सलीम खान
यांजकडून)- विधानसभेच्या अगामी हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायजेशन
ऑफ इंडिया दक्षिण महाराष्ट्र (एस आय ओ) च्या वतीने अनेक आमदारांच्या भेटी घेवून सदर
अधिवेशनात काही महत्त्वपूर्ण शैक्षणिक मुद्यांवर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात एस आय ओ च्या वतिने देण्यात आलेल्या
प्रसिध्दी पत्रकात सांगण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण पाठ्यपुस्तक निर्मित्ती मंडळ पुण्याच्या वतिने इयत्ता अकरावी व बारावीची पाठ्यपूस्तके
इंग्रजी आणि मराठी भाषेतून उपलब्ध करून दिली जातात परंतु उर्दू माध्यमातील पुस्तक निर्मितीचे कार्य हे खाजगी संस्थांकडे सोपविले जाते. विश्वस्नीय
आणि दर्जेदार पाठ्यपूस्तकांच्या आभावामूळे राज्यातील 562 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना
भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, सामाजिकशास्त्र व अर्थशास्त्रासारख्या विषयांच्या अभ्यासक्रमात
अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या या थंड धोरणामूळे एसआयओ ने या संदर्भात न्यायालयाकडे
धाव घेतली होती. सदरच्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने सरकारला या बाबतीत
आपल्या धोरणाचा लवकरात लवकर खुलासा सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत. पत्रकात पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या वतीने
देशात महाराष्ट्रासह पाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठांतर्गत केंद्रे
स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इतर सर्व केंद्रे तर स्थापन झाली आहेत परंतु
औरंगाबाद परिसरात स्थापन केल्या जाणार्या केंद्राच्या बाबतीत सरकारकडून कसलेच प्रयत्न
करण्यात आलेले नाहीत. या बाबतीत कुलगूरूंच्या वतिने राज्य सरकारला पत्र पाठवून सदर
आदेशाला अनुसरून आवश्यक इमारतीच्या बांधकामाची देखील मागणी केली होती.
महेमूदूर्रहमान समितीचा हवाला देऊन पत्रकात असे
सांगण्यात आले आहे की राज्यातील मुस्लिम समुदाय हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे.
या समितीने शिक्षण व रोजगाराच्या मैदानात मुस्लिम समाजासाठी दहा टक्के आरक्षण देण्याची
मागणी केली होती. राज्यसरकारने 2014 मध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के आणि मुस्लिम समाजासाठी
पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, ज्याला राज्यपालांनी मान्यता देखील दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने या धोरणावर स्थगिती आणली परंतु मुस्लिम समाजाच्या बाबतीतील
आरक्षणाचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर राज्यसभेमध्ये यावर चर्चा न झाल्याने हा प्रस्ताव
पडून आहे. या संदर्भात एस.आय.ओ.च्या एका प्रतिनिधी मंडळाने औरंगाबादचे आमदार इम्तीयाज
जलील, सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख व प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. सदर मान्यवरांनी
एस आय ओ ला हे आश्वासन दिल की ते नक्कीच आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे
मांडून त्यावर योग्य ती चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करतील.
Post a Comment