Halloween Costume ideas 2015

सामाजिक माध्यमाचा वाचनावर पडलेला प्रभाव

Books
आज माहितीतंत्रज्ञान युगात टी.व्ही., रेडिओ, मोबाईल, संगणक, इंटरनेट, ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप, इत्यादी आधुनिक प्रसारमाध्यमाच्या उपलब्धतेत वाचन साहित्य आणि वाचन सवयीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. समाजातील तरुणमंडळी किंवा प्रौढ व्यक्तीजवळ यापैकी एक तरी साधन असतेच. दिवसेंदिवस सामाजिक माध्यमे वाढतच आहे. आज सर्रास समाजात माणंस या साधनांचा वापर करत आहे. आधुनिक वाचकवर्ग मोबाईलवर, संगणकवर, ई-रिडरवर किंवा ईतर प्रसारमाध्यमाद्वारे वाचन करत आहे. थोडक्यात काय तर प्रसारमाध्यमाच्या विळख्यात सापडल्याने वाचन सवयीवर किंवा वाचन उपलब्धतेवर काय चांगले- वाईट परिणाम झाले हे बघणे आज गरजेचे आहे.
    पुस्तकांना पूर्वीसारखा वाचक मिळत नाही. आज पुस्तक प्रकाशन होतांना ई-स्वरुपात पण पुस्तक प्रकाशन होत आहे. आताचे आधुनिक वाचक सरळ-सरळ गुगल वर जाऊन ई-स्वरूपातील वाचन साहित्य डाउनलोड करून वाचतात. आज ग्रंथांना पुर्वी सारखी मागणी होत नाही असा आरडा-ओरड समाजातील किंवा साहित्य व्यवहारात होताना दिसून येत आहे. आधुनिक प्रसारमाध्यमाच्या प्रभावामुळे पुस्तकाचं वाचकवर्ग दुरावत चालला आहे. पुर्वी करमणुकीचे साधन म्हणुन पुस्तक वाचन करायचे; पण आज करमणुकीचे साधन म्हणुन ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप, टी.व्ही. किंवा युट्यूब सारखे नवनवीन सामाजिक साधने वापरतात. पूर्वीचा काळ असा होता की पुस्तकाचे वाचन करणे हा एक गौरव किंवा कौतुक समजला जायचा. संग्रह करणे, लेख लिहिणे, पोथी-पुराण लिहिणे हे सगळे वैचारिक लक्षणे समजले जायचे. ग्रंथ आदान-प्रदान करून पहिले वाचायचे आणि नंतर स्व:च हस्ताक्षर मध्ये लिहून काढायचे. काही लोक तर ग्रंथच पाठांतर करायचे. उदा. साने गुरुजीं यांना रामरक्षावाचण्याची खुप आवड होती. पण त्यांच्या घरी रामरक्षा पुस्तक नव्हत. गुरुजींचा शेजारी मित्र भास्करकडे हे पुस्तक होते. गुरुजींनी हे पुस्तक त्यांच्याकडून मागुन घेतले. पहिले संपुर्ण पुस्तक वाचुन काढले नंतर संपुर्ण पुस्तक अगदी थोड्याच दिवसात हस्ताक्षरमध्ये लिहुन काढले आणि सर्वात शेवटी पाठांतर करून घेतले.
    पुर्वी समाजात कोण कोणती व किती वाचन साहित्य वाचली त्यातून काय मिळाले याविषयी चौकाचौकांत आपआपसात चर्चा-विवाद करत असायचे. याचबरोबर गावा-गावात व शहरा-शहरात दैनिक वृत्तपत्र वाचण्यासाठी वाचक वाचनालयामध्ये दररोज येत असायचे. तेथे लहानपणापासून तर प्रौढांपर्यंत सगळे वाचक एकत्र मिळून वृत्तपत्र वाचायचे. पण आता ते दुरावत होतांना दिसत आहे. तेथे एकमेकांशी संवाद व्हायचा त्यासंवाद मधून माहिती-ज्ञान मिळायची. त्यांनी नवीन वाचकाला वाचनाची आवड-सवय लागत होती. चांगल्या व प्रेरणादायी कथा, कादंबर्‍या वाचताना वाचक त्या ग्रंथात भावनिक स्थितीत हरवला जायचा. मग यामध्ये अजून इतर वाचन साहित्याचा भर पण पडायचा.  कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, ललित-कथा, हास्यकथा, पोथी-पुराण, आत्मचरित्र, आत्मकथा, विज्ञान लेख इत्यादी गद्य-पद्य यांच्या वाचणाने रसिक वाचक आणखी समृद्ध होत जायचा. याचबरोबर दैनिक पेपर, दैनिक लेख, नियतकालिके, विशेष अंक, संशोधन लेख, वृत्तपत्रातील रविवारच्या अंकातील साहित्य व प्रेरणादायी लेख किंवा पुरवण्या यावर वाचकांच्या ज्ञानात व वाचनाची सवयी मध्ये एक मोठा भर पडायचा.
    पूर्वीच्या एखाद्या चांगला उत्तम पुस्तक बाजारात आल्या आल्याच पुस्तकाच्या सर्व आवृत्ती हातोहात खपल्या जायच्या असा तो गौरवाचा काळ होता. पुर्वी लोक वाचन साहित्याचा वापर व संग्रह आवडीने करत होते. बाजारात पुर्वी पुस्तक वाचकप्रेमी पुस्तक खरेदी करायचे. पण आता बघता-बघता वाचक व वाचन सवयी दुरावतांना दिसत आहे. त्याचबरोबर पूर्वीचा वाचक-वाचन साहित्याचा कौतुकास्पद व गौरवाचा काळ होता; तो पण लोप पावत चालला आहे. याला कारणीभुत आत्ताची स्थिती आहे. यामध्ये संगणक, मोबाइल, इंटरनेट, टीव्ही, सोशल मीडियामध्ये फेसबूक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब यासारखे आधुनिक करमणुकीचे प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचक व वाचन साहित्य वाचनास झाले आहे. पुर्वी जे वाचन साहित्य रांगा लावून हातोहात विकली जायची ती आता सवलत-सुठ देऊनही विकली जात नाहीत.
    आधुनिक माहिती तंत्रज्ञान व प्रसारमाध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वाचक वाचनसाहित्यापासून दुरावत का चालला आहे? वाचन गौरवाचा व कौतुकास्पद काळ का लोप होतांना दिसत आहे? वाचन सवयीचा व वाचन संस्कृतीचा लोप होतांना का दिसत आहे? बालक-पालक वाचन साहित्य वाचत असतील तर काय वाचतात? बालक-पालक एकत्र बसून वाचन करतात का? तंत्रज्ञान युगात वाचनाची गरज खंरच राहिले आहे का? यावरील विविध प्रश्‍नांची चर्चा होतांना आधुनिक प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव तर परिणामकारक आहेच; पण याशिवाय आणखी काही कारणे आहेत. पूर्वी करमणुकीचे साधन म्हणजे कुस्ती, कबड्डी, क्रिकेट, हॉकी, ग्रंथ वाचन, ग्रंथलेखन, इतर खेळ खेळणे किंवा शेतीचे कामे इत्यादी साधनांनी करमणूक व्हायची. पूर्वी करमणूक साधनांचा अभाव असल्यामुळे लोक रिकाम्या वेळेत ग्रंथ वाचन, ग्रंथलेखन, ग्रंथ देवाण-घेवाण करतांना ग्रंथालयांमध्ये वेळ घालवायचे. मात्र आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात करमणुकीची साधणे झपाट्याने वाढत चालले आहे. टीव्ही. रेडीओवर वाढत्या चॅनल संख्येमुळे लहान मुलापासून तर प्रौढव्यक्ती पर्यंत घरबसल्या आपल्या आजूबाजुचीच नाही तर संपूर्ण जगाच्या कानाकोपर्‍यातील कोणत्याही विषयाची माहिती कुठेही व केव्हाही अत्यंत थोड्याच वेळात आणि उत्तम रीतीने माहिती मिळू लागली आहे. त्याचबरोबर गुगल व याहू सारख्या सर्च इंजिनद्वारे घरबसल्या कोणत्याही विषयावरची माहिती अगदी काही सेकंदातच मिळते.
    गुगलवर लाखो-करोडो ई-स्वरुपात वाचन साहित्य उपलब्ध आहे. वाचकवर्ग ई-स्वरूपातील साहित्य आज शैक्षणिक क्षेत्रात किंवा ईतर क्षेत्रात वापरतांना दिसत आहे. त्याच बरोबर गुगलवर असलेले युट्युब हे तर लहान मुलांना सांभाळणारा किंवा मुलांचे पालनपोषण/जडणघडण करणारा साधन ठरत आहे. मुलगा जेवायला जर टाळाटाळ करत असेलतर, पालकवर्ग इतर कामात व्यस्त असेलतर, मुलगा रडत असेलतर, मुलगा हट्ट करत असेलतर या सारख्या अनेक कारणासाठी आता घरात युट्युब वर मुलांना गाणे किंवा व्हिडिओ लावून दिल्या जात आहे. संपूर्ण जगच आता बघता-बघता सारा समाज गुगलमय होत चालला आहे.
    आज वेगवेगळ्या ठिकाणी इंटरनेट व संगणकाचा वापर होत आहे. यामध्ये सरकारी-खाजगी ऑफिस पासून तर बाजारपेठात सुध्दा इंटरनेट व संगणकाने शिरकाव केला आहे. शहरापासून तर खेड्यागावापर्यंत सगळेच माणसं गुगल व इंटरनेटचं वापर करतांना दिसत आहे. आज मोजकेच लोक असतील कि त्यांच्या जवळ  मोबाईल व  इंटरनेट नसतील. संपुर्ण जगातच प्रसारमाध्यम साधनांनी पुस्तकाची जागा घेतली आहे. तेव्हा प्रश्‍न एकच लोकांना समोर पडतो. जगाची माहिती अगदी सोप्या पद्धतीने इंटरनेटवर मिळत आहे तर ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची शोधाशोध करतीलच कशासाठी? हातातलं सोडून आरशातला घेण्याची समाजाची वृत्ती कधीच नसते. कमी वेळेत, कमी खर्चात, कमी श्रमात, कधीही- केव्हाही आणि कुठेही एखादी गोष्ट जर मिळत असेल तर आजच्या आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान जगात कोणालाच नको असते. या सर्व गोष्टीच्या परिणामामुळे वाचक वाचतांना कमी होत चालले आहे. समाजात फेसबूक, व्हाट्सअ‍ॅप, ट्विटर या सोशल मीडियावर लोकांचा जास्त वेळ जात असल्याने वाचकवर्ग कमी होत चालले आहे.
    वाचक, वाचन संस्कृती व वाचन सवयीचा लोप होतांना दिसत आहे. असे असताना लेखक, शिक्षक, प्रकाशकांचीही काही नैतिक जबाबदारी असतेच. वेळ व काळानुसार होत असलेला बदल काळाच्या व वेळेच्या बदलत्या प्रवाहा बरोबर पालक-शिक्षक व लेखक-प्रकाशकांनी बदलायला पाहिजे. वाचकांसाठी प्रोत्साहनपर पुस्तके, अवांतर वाचन साहित्य, बालक वाचन साहित्य, तरुण वाचन साहित्य लेखकांनी लिहायला पाहिजे. जेणे करून वाचक अजुन वाचनाकडे वळतील व वाचनाची सवय-आवड निर्माण होतील. आताची आधुनिक इंटरनेटसारख्या माध्यमाचा उत्तमप्रकारे वापर करून वाचकांमध्ये वाचनाची गरज, वाचनाची सवय अगदी साध्या पद्धतीने वाढवता येईल. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यमांची साधने व इंटरनेट आदि गोष्टीने वाचन संस्कृतीला आक्रमक व प्रभाव न मानता ती वाचन संस्कृतीला लाभलेली देणगी आहे. याविचाराने ई-स्वरूपातील वाचन साहित्य वाचकांनी वाचन करायला पाहिजे.
    आज गुगल वर ई-पुस्तके, ई-लेख, ई-शोधलेख, ई-प्रबंध, ई-वर्तमानपत्र, ई-मासिके इत्यादी ई-स्वरूपातील वाचन साहित्य वाचकांसाठी आज उपलब्ध आहे; याचं चांगल्याप्रकारे जर वापर करण्याची सवय लागली तर पुर्वी पेक्षाही आज जास्त वाचन साहित्य उपलब्ध आहे. पुर्वी ई-स्वरूपातील वाचन साहित्य खुप कमी प्रमाणात होते. या विचाराने व भावनेने यांचा वापर करून घेता येऊ शकेल. कारण या इंटरनेट व आधुनिक प्रसार माध्यमाद्वारे गद्य-पद्य ही ई-साहित्य, सी.डी, डी.व्ही.डी, चित्रे, ब्लॉग, व्हिडिओ ची प्रसिद्धी करता येईल. या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान व इंटरनेट उपयुक्त ठरतील. इंटरनेट व गुगलवर लाखो-करोडो ई-स्वरूपात वाचन साहित्य उपलब्ध आहेत. विनामूल्य किंवा अगदी थोड्याच वर्गणीद्वारे त्यांच्या संकेतस्थळावरून आपण डाऊनलोड करु शकतो. या ई-स्वरूपातील वाचन साहित्य आपण मोबाईल, संगणक किंवा ई-रीडरवर अगदी सोप्या पद्धतीने व आवडीने वाचू शकतो. लहान मुलं तर प्रसारमाध्यमांचा जास्तच वापर करत आहे. मुलांना शाळेतुन गुह्पाठ हे मोबाईल वर दिल्या जात आहे. बालक-पालकांकडून गृहपाठ हे मोबाईलवर करून व्हाट्सअपवर पाठवतांना दिसत आहे. लहानमुलांपासून तर वयोवृद्ध पर्यंतचे वाचन-अभ्यास स्वरूपातील सी.डी, डी.व्ही.डी, चित्रे, ब्लॉग, व्हिडिओ इत्यादी आज इंटरनेट वर उपलब्ध आहे. खास करून खाजगी वर्ग (कोचिंग क्लासेस) यांचे तर सगळेचे-सगळे वर्ग तासिका हे इंटरनेटवर उपलब्ध करून देतात. इथे वाचकाला ऑनलाइन अभ्यास करता येतो किंवा ऑनलाइन परीक्षा पण देता येते. इतकेच काय तर आपण पुस्तकाचं संग्रही करू शकतो.
    इंटरनेट व गुगल हे पुस्तक प्रकाशनापेक्षा स्वस्त, जलद आणि प्रभावी माध्यम आहे. इंटरनेटवर असलेले वाचन साहित्य हे जगभर कुठेही केव्हाही वाचू शकतात. इंटरनेटवर प्रसिद्ध केलेले वाचन साहित्य अगदी काही सेकंदातच जगभरच्या वाचकांना उपलब्ध होऊ शकते. यावर चर्चा, परिसंवाद, विचार, आढावा आणि फेरबदल करणे सहज शक्य होते. ई-मेल, व्हाट्सअप, फेसबुक सारख्या प्रसारमाध्यामाद्वारे आपण पीडीएफ स्वरूपातील ई-वाचन साहित्य सहज आदान-प्रधान करू शकतो. थोडक्यात काय तर सामाजिक प्रसार माध्यमांनी जर वाचनावर प्रभाव पाडला असेल तरी वाचकांसाठी ई-स्वरूपातील वाचन साहित्य आज माहिती प्रसार माध्यमा मार्फतच उपलब्ध झालेले आहेत. वाचक आज जलद गतीने वाचनकरून नवनवीन शोध लावत आहे; व माहितीची घेवाण-देवाण करत आहे. असे एका संशोधनातून दिसुन आले. 

- प्रा. राहुल भिमराव राठोड
9503203695
(लेखक : सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी येथे प्राध्यापक आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget