Halloween Costume ideas 2015

माननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष्ट्ये : प्रेषितवाणी (हदीस)

   
स्पष्टीकरण : ‘नसीहत’ हा शब्द अरबी भाषेत अफरातफर व बेईमानी, खोट व भेसळ करण्याच्या प्रयत्नासाठी वापरला जातो, त्याचा अनुवाद निर्भेळ प्रामाणिकपणा आणि निर्भेळ सदाचारपासून केला जातो. अल्लाहसाठी निर्भेळ प्रामाणिकपणाचा अर्थ अगदी स्पष्ट आहे आणि आम्ही त्याला अल्लाहवरील श्रद्धेबाबतच्या लेखात सांगितले आहे. त्याचप्रमाणे ग्रंथ आणि पैगंबरांशी निष्ठा व प्रामाणिकपणाचा अर्थदेखील कुरआन व पैगंबरांच्या बाबतीत सांगितला गेला आहे. ‘ईमानियात’ या प्रकरणात पाहा आणि सामान्य मुस्लिमांबरोबर सदाचार व सरळपणाचे विवरण ‘मुआशिरत’ या प्रकरणात मुस्लिमांच्या अधिकारांच्या वक्तव्यात देण्यात आले आहे. उरला प्रश्न मुस्लिमांच्या सामुदायिक व्यवस्थेच्या अधिकाऱ्यांशी निष्ठा व शुद्ध प्रामिणकपणाचा तर त्याचा अर्थ आहे की त्यांच्याशी वात्सल्याचा संबंध असेल, जर ते आदेश देतील तर प्रामामिक उपासना व्हायला हवी. आवाहन व संघटनेच्या कार्यात उत्साहाने त्यांना सहकार्य द्यायला हवे. ते मार्गभ्रष्ट झाले असतील तर प्रेमळ वर्तणुकीद्वारे त्यांना सूचना द्यायला हवी. जर कोणी वाईट प्रकारच्या सहिष्णुतेने वागत असेल, चूक पाहत आहे मात्र सूचित करीत नाही, तर असा मनुष्य आपल्या नेतृत्वाचा शुभेच्छू नाही. वाईट इच्छिणारा आहे, असे करणे जमाअतद्वारे अफरातफरीसमान आहे. परंतु हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा नेतेगण विशुद्ध टीका सहन करतील, फक्त सहनच करणार नाहीत तर लोकांमध्ये असा प्रभाव निर्माण करतील की त्यांचा नेता चूक निदर्शनास आणणे पसंत करतो आणि अशा लोकांवर प्रेम करतो आणि त्यांच्या या शुभेच्छेच्या उत्तरादाखल त्यांच्याकरिता भलाईची प्रार्थना करतो आणि जर एखाद्याने असभ्यपणाने सूचित करण्याचा प्रयत्न केला तर त्याला संयमाने सांगे की अशा पद्धतीने बोलू नका जे शिष्टाचाराच्या विरूद्ध आहे. माननीय उमर (रजि.) कोणी एखाद्या गोष्टीबाबत विचारले तेव्हा सभेतील एका व्यक्तीने मुस्लिमांचे नेत्याची प्रतिष्ठा व श्रेष्ठत्वाचा मान राखण्याच्या उद्देशाने प्रश्न विचारणाऱ्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माननीय उमर (रजि.) म्हणाले–
    ‘‘त्याला बोलू द्या. जर लोक आमच्याशी अशाप्रकारे बोलले नाहीत तर  त्यांच्यात कसलेही भलेपण नाही, आम्ही अशा प्रकारची शुभचिंतन मान्य केले नाही तर आमच्यात कसलाही सदाचार नाही.'' (किताबुल खिराज, इमाम अबू यूसुफ)
    अशा प्रकारचे अनेक नमुने आमच्या पूर्वजांनी मागे सोडलेले आहेत, ज्यात दोघांसाठी मार्गदर्शन व प्रकाश आहे, नेत्यांसाठीदेखील आणि सामान्यजनांसाठीदेखील. येथे आम्ही फक्त नमुना सादर करू. जेव्हा माननीय उमर (रजि.) यांच्यावर खिलाफतची जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हा अबू उबैदा (रजि.) आणि मुआज बिन जबल (रजि.) यांनी एकत्रितपणे एक पत्र लिहिले. त्या पत्राच्या शब्दाशब्दांतून सदाचार टपकत आहे. ते पत्र असे आहे–
    ‘‘हे पत्र अबू उबैदा बिन जर्राह आणि मुआज बिन जबल (रजि.) यांच्याकडून माननीय उमर बिन ़खत्ताब (रजि.) यांच्या नावे, तुम्हांवर शांती असो.
    आम्ही तुम्हाला या स्थिती पाहिले आहे की तुम्ही आपल्या वैयक्तिक विकासासाठी, प्रशिक्षण व निरीक्षणासाठी चिंताग्रस्त असायचे आणि आता तर तुमच्यावर या संपूर्ण जनसमुदायाच्या प्रशिक्षण व पालकत्वाची जबाबदारी आली आहे. मुस्लिमांचे सरदार, तुमच्या सभेमध्ये उच्च दर्जाचे लोकदेखील बसतील आणि खालच्या दर्जाचे लोकदेखील, शत्रूदेखील तुमच्याकडे येतील आणि मित्रदेखील. तसेच न्यायदानात प्रत्येकाचा वाटा आहे. तेव्हा या स्थिती काय करायला हवे, याचा तुम्हाला विचार करावा लागेल. आम्ही तुम्हाला त्या दिवसाचे भय दाखवीत आहोत ज्या दिवशी अल्लाहसमोर लोक मान खाली घालून उभे असतील, हृदये भीतीने कापत असतील आणि जबरदस्त व भयंकर रागीट अल्लाहच्या पुराव्यांसमोर सर्वांचे पुरावे निरस्त होतील. त्या दिवशी सर्व लोक त्याच्यासमोर नम्र व लाचार असतील. लोक त्याच्या दयेची अपेक्षा करीत असतील आणि त्याच्या कोपाने घाबरत असतील. आमच्याकडून ही हदीस सांगितली गेली की या जनसमुदायाचे लोक अंतिम युगात उघडपणे एकमेकांचे मित्र असतील आणि मानसिक स्वरूपात एकमेकांचे शत्रू असतील. आणि आम्ही यासाठी अल्लाहचा आश्रय मागतो की आमच्या या पत्राला तुम्ही ती प्रतिष्ठा देऊ नये जी त्याची खरी व अधिकृत प्रतिष्ठा आहे. आम्ही हे पत्र शुभेच्छा व प्रेमळ भावनेने तुम्हाला लिहिले आहे. अल्लाहची तुमच्यावर कृपा असो.’’
हे पत्र मुस्लिमांचे सरदार माननीय उमर (रजि.) यांच्याकडे पोहोचले आणि त्यांनी त्याचे उत्तर दिले. (क्रमश:)
माननीय तमीम दारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दीन निष्ठा व सदाचाराचे नाव आहे.’’ हेच वाक्य पैगंबरांनी तीन वेळा उच्चारले. आम्ही विचारले, ‘‘कोणासाठी निष्ठा व सदाचार?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहसाठी, त्याच्या पैगंबरासाठी, त्याच्या ग्रंथासाठी, मुस्लिमांच्या सामूहिक व्यवस्थेच्या नेतृत्वासाठी आणि सर्वसामान्य मुस्लिमांसाठी.’’ (हदीस : मुस्लिम)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget