प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, “दररोज जेव्हा सूर्य उगवतो, माणसाच्या प्रत्येक अवयवावर दान देणे अनिवार्य आहे. दोन माणसांमधील कलह दूर करणे हेदेखील दान आहे. कुणास स्वारीसाठी मदत करणे, त्याच्याकडे असलेल्या सामानासाठी काही तरतूद करणे हेदेखील दान देण्यासारखे आहे. चांगले बोलणे दान आहे. नमाजसाठी जातानाचे प्रत्येक पाऊल दान आहे. रस्त्यात इजा पोहोचवणाऱ्या वस्तू दगड-काटे वगैरे बाजुला सारणेदेखील सदका आहे.” (ह. अबू हुरैरा (र.), बुखारी, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले “ज्या व्यक्तीच्या मनात तिळमात्र देखील अहंकार असेल तो स्वर्गात जाणार नाही.” त्यावर एका व्यक्तीने विचारले की चांगले कपडे परिधान करणे, नव्या पादत्राणांचा वापर करणे हेदेखील अहंकारासारखे आहे. प्रेषितांनी उत्तर दिले, “अल्लाह सुंदर आहे आणि त्याला सौंदर्य आवडते. अहंकार हा की सत्याला नाकारावे आणि इतर लोकांना तुच्छ समजणे.” (ह. इब्ने मसऊद, मुस्लिम)
ह. अबू हुरैरा (र.) म्हणतात की प्रेषितांचे विधान आहे, “ह. उमर (र.), तुम्हाला माहीत नाही, कुणाचा पिता आणि त्याचा चुलता एकाच मुळाच्या दोन शाखा आहेत.” (मुस्लिम) प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, “ज्ञान संपादन करा, ज्ञानासाठी मनशांती आणि आदरभाव संपादन करा आणि ज्या व्यक्तीकडून ज्ञान संपादन करता त्याचा आदर करा.” (ह. अबू हुरैरा (र.), तिबरानी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, “प्रत्येक मुस्लिमाचे दुसऱ्या मुस्लिमाबाबत सहा अधिकार आहेत. तो आजारी पडल्यास त्याची विचारपूस करावी. त्याला मृत्यू आल्यास त्याच्या अंत्यविधीत हजर राहावे. त्याने तुम्हास बोलावल्यास त्याच्याकडे जा. त्याची भेट झाल्यास त्याला सलाम करा. त्याला शिंक आल्यास त्याने अहलम्दुलिल्लाह चा उच्चार केल्यास तुम्ही त्याचे उत्तर यरहमकुल्लाह (अल्लाहची तुझ्यावर कृपा अ) म्हणत द्या. तो तुमच्या सान्निध्यात असेल नसेल दोन्ही वेळा त्याच्या भल्याचा विचार करा.” (ह. अबू हुरैरा (र.), निसाई)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, “विधवा आणि निराधाराच्या मदतीसाठी झटणारा अल्लाहच्या मार्गात संघर्ष करणाऱ्यासारखा आहे. रात्री अल्लाहची आराधना करणारा आणि दिवसा रोजा ठेवणारा सारखाच.” (ह. अबू हुरैरा (र.), बुखारी)
ह. असमा (र.) म्हणतात की जेव्हा कुरैश आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यात करार झाला होता, माझी आई माझ्या पित्यासह माझ्या घरी आली. मी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, “माझी आई आली आहे, पण ती मुस्लिम नाही.” प्रेषितांनी उत्तर दिले, “तुम्ही आपल्या आईशी कृपा आणि दयेचा व्यवहार करा.” (बुखारी)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment