मुंबई
जमात-ए-इस्लामी हिंद- महाराष्ट्रने, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात, JIH महाराष्ट्र - अध्यक्ष, मौलाना इलियास खान फलाही म्हणाले की "महाराष्ट्रात या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत, 8 महिन्यांत 1,809 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल वाचून आम्ही अत्यंत दुःखी व चिंतित आहोत. याचा अर्थ असा की दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांपैकी 50% विदर्भातील, 37% मराठवाड्यातील, आणि 11% उत्तर महाराष्ट्रातील आहेत.
ही देखील चिंतेची बाब आहे की यापैकी केवळ निम्म्याच आत्महत्या या सरकारी भरपाईस पात्र मानल्या गेल्या आहेत कारण फक्त कर्जबाजारीपणामुळे मरण पावलेल्यांनाच सरकार भरपाई देते.
मौलाना इलियास म्हणाले, "जमातला असे वाटते की शेतकरी आत्महत्या आणि कृषी संकटाचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि त्याकडे आवश्यक तितके लक्ष दिले गेलेले नाही. कर्जमाफी, मदत पॅकेज किंवा आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना भरपाई, यासारखे तदर्थ उपाय या आत्महत्या रोखण्यास पुरेशा नाहीत.
शेतकर्यांमध्ये कृषी, जमीनधारणा, अनुदान आणि कृषी-वित्त यासंबंधीच्या धोरणांचा आढावा घेण्याची नितांत गरज आहे. जमात-ए-इस्लामी हिंद- महाराष्ट्रने, राज्य सरकार कडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे.
जमातचा असा विश्वास आहे की व्याजावर आधारित कर्जे किंवा व्याजावर आधारित वित्त हा संकटाचा केंद्रबिंदू आहे. कर्ज सुविधांच्या कमतरतेमुळे शेतकरी सावकारांवर अवलंबून राहतात.
आमची मागणी आहे की सरकारने शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून द्यावे किंवा आधी सर्वात जास्त प्रभावित भागात व्याजमुक्त कर्ज देण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू करा. जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र आपल्या "राहत व्याजमुक्त" सूक्ष्म वित्त योजनेद्वारे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन सरकारला सहकार्य करण्यास तयार आहे.
Post a Comment