मुंबई (शोधन वृत्तसेवा)
भारतीय समाज बहुसांस्कृतिक समाज आहे. यामध्ये विविध धर्म, आणि विचारांचे लोक, विविध जाती समूहाची संबंधित व्यक्ती, विविध संप्रदाय व जमाती, विविध भाषा बोलणारे आणि विविध संस्कृतींना मानणारे लोक अनेक शतकांपासून शांततापूर्वक एकत्र राहत आले आहेत. धर्म संस्कृती, भाषा व परंपरेमध्ये परस्पर भिन्नता असताना सुद्धा आपसात मिळून मिसळून राहतात. पण सध्या आपला देश अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. सांप्रदायिक संघर्ष, हिंसा, असहिष्णुता, भडकावृत्ती, अविश्वास, गैरसमज आणि आरोप प्रत्यारोपामुळे शतकानुशतकांचे नाते अपमानित तसेच सामाजिक बंद प्रभावित होण्याची संशय निर्माण होत आहे. देशवासियांदरम्यान सध्या असलेले आपसातील प्रेम, बंधुभाव, शांती आणि मानवता यासारख्या मूल्यांचा ऱ्हास होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. असं वाटतं की नियोजनबद्द रीतीने लोकांची बुद्धी भ्रष्ट केली जात आहे आणि पूर्ण समाजाला एका विशिष्ट दिशेला वळविण्याचा प्रयत्न होत आहे.
ज्या रेशीम बंधानी शतकांपासून परस्परांना जोडून ठेवले होते, त्या सामाजिक ऐक्याला उखडून फेकणे हाच सांप्रदायिक शक्तीचा मूळ उद्देश आहे. या परिस्थितीत आनंदाची बाजू ही आहे की, देशात आज सुद्धा शांतताप्रिय व न्यायप्रिय व्यक्ती मोठ्या संख्येत आहेत. ते या परिस्थितीमुळे चिंतित झाले आहेत.
या परिस्थित सुधार करण्याच्या उद्देशाने 1 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र (दक्षिण)मध्ये "आपण कुठे जात आहोत"? या शीर्षकाखाली अभियान राबविणार आहे. एस. आय. ओ.कडून मुंबई मराठी पत्रकार संघ याठिकाणी नुकतेच या अभियाना अंतर्गत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेत एस. आय. वो दक्षिण महाराष्ट्र चे अध्यक्ष ऐतेसाम हामी खान उपस्थित होते. ते म्हणाले, देशातील जनतेला सांप्रदायिकतेच्या संकटापासून वेळीच सावध करण्याचे काम करण्यात आले पाहिजे. जे लोक समाजासमाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कृत करीत आहेत ते केवळ एका विशिष्ट समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे शत्रू आहेत. सांप्रदायिक सद्भाव प्रस्थापित करण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण गरज आहे ती म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि इतर सांस्कृतिक संघटनांच्या दरम्यान प्रत्येक स्तरावर सतत चर्चा घडवून आणण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. ही व्यवस्था इतकी परिपूर्ण असली पाहिजे की प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया, व्हाट्सअप, आणि चिताणीखोर भाषणांच्या माध्यमातून प्रसारित होणारी चुकीची माहिती व अफ़वाची ताबडतोब छाननी झाली पाहिजे ती प्रसारित होता कामा नये.
यानंतर इरफान इंजिनियर म्हणाले की, विध्यार्थी व युवक जेव्हा काही बदल घडवण्यासाठी पुढे येतात तेव्हा समाजात सकारात्मक बदल घडतो.त्यासाठी विध्यार्थी वर्गाने पुढे येऊन काम करावे.
यानंतर डॉ, विवेक कोरडे (सामाजिक कार्यकर्ते )म्हणाले की,समाजाला अत्यंत संवेदनहिन बनवण्याची तयारी सुरु आहे ही खूप चिंताजनक बाब आहे.
यानंतर डॉ. सलीम खान म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय पातळीवर खूप समस्या आहेत ज्या विध्यार्थीनी पुढे येऊन सोडवण्याची गरज आहे आणि आपल्या समाजाला दिशा देण्याचे काम विद्यार्थी चांगल्या प्रकारे करू शकतात.
या अभियानात मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये लेक्चर घेण्यात येणार आहेत, याचबरोबर, नांदेड, पुणे, सोलापूर, कोल्हापूर औरंगाबाद येथील विद्यापीठात सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. युवकांशी मोठ्या प्रमाणात भेटीगाठी, सोशल मीडिया कॅम्पेन, कॉर्नर मिटिंग, टी पार्टी याच्या माध्यमातून 50 लाख लोकांन पर्यंत हा संदेश पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
यावेळी एस. आय. ओ.चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment