Halloween Costume ideas 2015

युथविंगचा विक्रम; 5000 जणांचे रक्तदान

ब्लड डोनेशन इबादत भी जिंदगी भी


महाराष्ट्र युथविंग जमाअते इस्लामी हिंदच्या वतीने ईद ए मिलादुन्नबीचे औचित्य साधून राज्यभरात ठिकठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. ’ब्लड डोनेशन इबादत भी जिंदगी भी’ या शिर्षकाखाली घेतलेल्या शिबिरात समाजबांधवांनी उत्साहात सहभाग नोंदविला. या शिबितरात एसआयओ, जमियते उलेमा हिंद या संघटनांचाही काही ठिकाणी रक्तदानात सहभाग राहिला. राज्यभरात तब्बल 10 ऑ्नटोबरपर्यंत 5 हजार रक्तबॅगांचे संकलन करण्यात आले होते. राज्यभरात रक्ताचा तुडवडा जाणवत असून या शिबिरात झालेल्या रक्तदानामुळे काही दिवस तरी रक्तपुरवठा होणार आहे. प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी सांगितले की, ’’एका निष्पाप माणसाचा जीव वाचविणे म्हणजे समस्त माणवजातीचा जीव वाचविण्यासारखे आहे.’’ त्यामुळे प्रत्येक पात्रतधारक व्यक्तीने रक्तदानाचा निर्णय करून गरजेनुसार रक्तदान करावे, असे आवाहनही युथविंगचे अध्यक्ष मुहम्मद उमरखान यांनी केले. राज्यभरात ईद ए मिलादुनब्बीच्या निमित्ताने समाजातील विविध संघटनांनीही रक्तदान शिबीरांचे आयोजन केले होेते. उस्मानाबाद जिल्हत जवळपास 150 जणांनी रक्तदान केले.

‘प्रेषित (स.) यांनी सांगितले की सर्वश्रेष्ठ व सर्वाधिक प्रतापशाली अल्लाह कयामतच्या दिवशी विचारणा करेल, हे आदम पुत्र ! मी आजारी होतो. तेव्हा तू माझी विचारपूस केली नाहीस, तर तो म्हणेल, हे माझ्या पालनकर्त्या ! मी तुझी विचारपूस कशा प्रकारे केली असती तू तर सर्व विश्वांचा पालनहार आहेस ? तेव्हा अल्लाह सांगेल, काय तुला माहीत नाही की माझा अमुक एक दास आजारी पडला होता तर तू त्याची विचारपूस केली नाही. काय तू जाणत नव्हता की तू त्याची विचारपूस करण्यास गेला असता तर त्याच्या जवळ मी आढळलो असतो ? (मुस्लिम, अबु हुरैरा (र)). विचारपूस म्हणजे केवळ एखाद्या रुग्णाजवळ जाणे आणि त्याच्या प्रकृतिची चौकशी करणे नव्हे तर रूग्णाची खऱ्या अर्थाने विचारपूस ही की जर तो गरीब असेल तर त्याच्या औषध पाण्याची व्यवस्था करावी किंवा गरीब नसला तरी वेळेवर औषध आणणारा व पाजणारा नाही तर त्याची नीट काळजी घेतली जावी.मित्रानों, सदर हदीस वचनावरून आम्हाला कळते की गरजवंत रूग्णांच्या मदतीला जाणे किती गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी जर आम्ही आमच्या रक्ताचे दान देत असू तर ते किती पुण्याचे काम असेल आणि मानवतेची सेवा देखील. युथविंगचे अध्यक्ष उमरखान म्हणाले, काही ठिकाणी पुढील काही दिवस रक्तदान शिबीर होईल, त्यामुळे पूर्ण आकडे येणे आहेत. त्यामुळे पाच हजाराहून अधिक रक्तबॅगांचे संकलन होण्याची अपेक्षा आहे.

- बशीर शेख

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget