राज्यस्तरीय परिषदेत शिक्षण, आरक्षण, संरक्षणावर चर्चा
लातूर (मोहसीन खान)
परभणी येथे मुस्लिम समाजाच्या सामाजिक व राजकीय समस्यांवर चर्चा करण्यासाठी ईडन पार्क येथे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय मुस्लिम शिक्षण आरक्षण संरक्षण परिषदेचे आयोजन प्रा. शेख महेमुद सेलु यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी मुस्लिम समुदायातील शिक्षणाचे प्रमाण कसे वाढविता येईल, आरक्षणाच्या मुद्द्यावर मागणीसाठी शासनावर कशाप्रकारे पाठपुरावा करावा, आरक्षणासाठी आंदोलनाची दिशा, संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू कसे ठेवायचे या व अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्यस्तरीय मुस्लिम सामाजिक संस्थाकडुन चर्चा करून दिशा ठरविण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील मुस्लिम वस्त्यांवर भ्याड हल्ले होत आहेत, झुंडबळीचे प्रकार वाढत असल्याने यावर चिंता व्यक्त करुन अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या धर्तीवर धार्मिक अल्पसंख्यांकांसाठी संरक्षण कायद्याची अत्यंत गरज असल्याचे मत या मुस्लिम कॉन्फरन्सच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले.
परिषदेत प्रा. जावेद पाशा कुरेशी (नागपूर) मोहसीन खान (लातूर) अब्दुल अज़ीज (नाशिक) अज़ीम तांबोळी अनिस कुरेशी (मुंबई) हाजी अन्वर अली (चंद्रपूर) मोहसिन अहमद सहाब (औरंगाबाद ) यासह अजिज खान साहब, अकीफ दफेदार, मोहसीन पहेलवान, अनवर अली, व राज्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, जालना, उस्मानाबाद, बीड, चंद्रपूर, मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे सह इ. जिल्ह्यांसह परभणी जिल्ह्यातील जलील पटेल, प्रा.रफिक शेख सर, अँड शोहेब सिद्दिकी, मो. गुलाम जान मिठु भाई, नितीन सावंत, अजहर भाई, सद्दाम भाई यांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी राज्यभरातून आलेले विविध सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी आपले शिक्षण आरक्षण संरक्षण संदर्भात विचार व्यक्त केले.1)मुस्लिम समाजाला आरक्षणाबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत केलेल्या समितींच्या आधारावर मुस्लिम आरक्षण मागणीसाठी शासनाशी सूसंवाद आंदोलन पवित्र घेणे. 2)मुस्लिम विद्यार्थ्यांना मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापनेची मागणी शासन दरबारी करणे. 3) मुस्लिमांवर हीनभावनेतून तुच्छ बोलणे-लेखणे, मॉबलिंचिंग अर्थात जीवे मारणे प्रकार वाढत चालले असल्याने मुस्लिम समाजाला ’सुरक्षा कवच’ म्हणून ’एट्रोसिटी कायदा’ शासनाने करावा या करिता शासनकडे मागणी करणे. 4) सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील दंगलीत ज्या मुलांची ( हत्या), मॉबलिंचिंग करण्यात आली त्याचा तीव्र निषेध करून, त्या मृतकांना 50 लाखाची मदत करून त्यांच्या घरातील व्यक्तीस शासकीय नोकरीत समाविष्ठ करण्यात यावे यासाठी शासनाकडे मागणी करणे.
5) मुस्लिम महिलांना राजकीय आरक्षण देण्याकरिता विविध पक्षांकडे पत्रव्यवहार करणे आणि याबाबत शासकीय ठराव राज्यशासनाने घ्यावा याकरिता पाठपुरावा करणे. 6)अल्पसंख्यांक सहकार संथा स्थापीत करण्यात यावी. 7) मुस्लिम कॉन्फरन्सची राज्यस्तरावर विभागीय,जिल्हा,तालुका,शहर निहाय समिती गठीत करणे. 8) राज्यातील वक्फ जमीनीवरील अतिक्रमणे काढून शासनाने त्या जमिनी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक,औद्योगिक व्यवसायासाठी उपलबध करून देणे. 9) मुस्लिम समाजासाठी ’माँ फातेमा’ घरकुल योजना सुरु करावी यासाठी शासनाकडे मागणी करणे. 10) राज्यातील मुस्लिम मराठी साहित्यीकांसाठी साहित्यभवन शासनाने उभे करावे या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरवठा करणे आदी ठराव परभणी येथील ’मुस्लिम कॉन्फ्रंस’मध्ये घेण्यात आले.
मुस्लिम शिक्षण आरक्षण संरक्षण परिषद आयोजक प्रा. शेख महमुद (सेलू) संयोजक वहीद पटेल, साजिद बेलदार, सय्यद रफिक पेडगावकर, अमजद पटेल, जाफर तरोडेकर, शेख सुलेमान, अकबर भाई, शे.इर्शाद पाशा, शेख यामीन पटेल, मुजमिल शेख, शेख जमीर आदींसह परभणीतील मुस्लिम युवकांनी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी सुत्र संचालन शेख निसार पेडगावकर यांनी केल तर राज्यभरातून आलेल्या मान्यवरांचे आयोजन कर्त्यांनी आभार मानले. यावेळी समाजबांधवाी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Post a Comment