(४९) जमीन व आकाशांमध्ये जितक्या प्रमाणात सजीव निर्मिती आहे आणि जितके दूत, सर्व अल्लाहच्यासमोर नतमस्तक होत आहेत, ते कदापि शिरजोरी करीत नाहीत,
(५०) आपल्या पालनकर्त्याशी जो त्यांच्यावर प्रभुत्व राखतो, भितात आणि जी काही आज्ञा दिली जाते त्याचप्रमाणे काम करतात.
(५१) अल्लाहचा फरमान आहे, ‘‘दोन ईश्वर बनवू नका,१२ ईश्वर तर केवळ एकच आहे म्हणून तुम्ही माझेच भय बाळगा.’’
(५२) त्याचेच आहे ते सर्व काही जे आकाशांमध्ये आहे व जे काही जमिनीत आहे आणि पूर्णत: त्याचेच आज्ञापालन (संपूर्ण सृष्टी) करत आहे.१३ मग काय अल्लाहला सोडून तुम्ही अन्य कोणाची भीती बाळगाल?
(५३) तुम्हाला जी काही देणगी प्राप्त आहे अल्लाहकडूनच आहे. मग जेव्हा एखादा बिकट प्रसंग तुमच्यावर ओढवतो तेव्हा तुम्ही लोक आपली गार्हाणी घेऊन स्वत: त्याच्याकडेच धाव घेता.
(५४) पण जेव्हा अल्लाह तो प्रसंग टाळतो तेव्हा अकस्मात तुमच्यापैकी एक गट आपल्या पालनकर्त्याबरोबर दुसर्यांना (या मेहरबानीप्रतीच्या कृतज्ञतेत) भागीदार बनवू लागतो
(५५) जेणेकरून अल्लाहच्या कृपेबद्दल कृतघ्न बनावे. बरे, मजा करा, लवकरच तुम्हाला कळेल.
(५६) हे लोक ज्यांची वास्तवता जाणत नाहीत त्यांचे हिस्से, आम्ही दिलेल्या अन्नात ठरवितात. अल्लाहची शपथ, जरूर तुम्हाला विचारले जाईल की ही असत्ये तुम्ही कशी रचली होती?
१२) दोन ईश्वर असण्याच्या नकारात दोनपेक्षा जास्त ईश्वरांचा इन्कार समाविष्ट असणे क्रमप्राप्तच आहे.
१३) दुसर्या शब्दांत, त्याच्या प्रभुत्व राखतो आज्ञाधारकतेवर या सर्व जैविक कार्यशालेची व्यवस्था टिकून आहे.
Post a Comment