Halloween Costume ideas 2015

आपल्या ग्राहकाला ओळखा

रिफा चेंबर्स ऑफ कॉमर्सची मुंबईत व्यापार कौशल्य विकास कार्यशाळा : परवेज अन्सारी

-    -  मुंबई (नाजीम खान)
19 डिसेंबर 2017 रोजी एनजीव्ही बँक्वेट हॉल दादर वेस्ट येथे रिफा चेंबर्स ऑफ कॉमर्स तर्फे व्यापार कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे शिर्षकआपल्या ग्राहकाला ओळखाहे होते. यावेळी बोलतांना परवेज अन्सारी (सिक्स सिग्मा मास्टर ब्लॅकबेल्ट आणि गॉडफ्री फिलिप्स इंडिया लि. चे डेप्युटी जनरल मॅनेजर) म्हणाले की, आपण व्यापार करीत असतांना ग्राहकांच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्यायला पाहिजे. ग्राहकांच्या सवयींवर लक्ष दिले गेले तर व्यापार आपोआप वाढतो. त्यांनी मोठमोठ्या सर्व्हे कंपन्या, बिझनेस स्कूल आणि मीडिया रिपोर्ट यांचे उदाहरण दिले. साधारणपणे व्यापार्यांचा असा समज असतो की, मार्केटमध्ये स्पर्धा जास्त असल्यामुळे व्यापारात वृद्धी होत नाहीये. मात्र जे निपुन व्यापारी असतात त्यांना माहिती असते की, ग्राहकांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या आवडी निवडी काय आहेत, त्याअनुसार ते आपल्या व्यापारामध्ये बदल करत असतात, त्यांच्या आवश्यकतेअनुरूप विविध सुविधा देत असतात. त्यामुळे त्यांचा व्यापार उत्तम पद्धतीने चालतो. चांगला व्यापारी बनण्यासाठी त्या वस्तू उत्पादिक करू नका ज्यांचे उत्पादन आपण आपल्या विचाराने केलेले आहे. उलट ग्राहकांच्या आवडी आणि विचाराप्रमाणे आपले उत्पादन सुरू ठेवा. वेळोवेळी त्याच्यात ग्राहकांच्या आवडीप्रमाणे बदल करीत चला. तेव्हा कुठे एक प्रथित यश उत्पादक तसेच व्यापारी म्हणून तुम्ही नावारूपाला येवू शकाल.

      कार्यक्रमात आलेले वेगवेगळे व्यापारी आणि उद्योजक यांनी आपल्या शंका रिफा चेंबरच्या पॅनलसमोर मांडल्या. पॅनलद्वारे त्यांचे शंकांचे निरसन करण्यात आले. पॅनलमध्ये परवेज अन्सारी यांच्यासह रिफा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासचिव मिर्झा अफजल बेग आणि जियाउद्दीन शेख (उपव्यवस्थापक, स्पलायर क्वालिटी ॅशुरन्स महिंन्द्रा अँड महिन्द्रा लि.) यांचा समावेश होता. सलाउद्दीन अहेमद (रिफाचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर) यांनी रिफा संबंधी उपस्थितांना माहिती दिली. आणि समाजाध्ये आर्थिक प्रगती किती महत्वाची आहे यावर आपले विचार व्यक्त केले
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget