Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)

(२५६) ...सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी, तागूत२८६ चा इन्कार करून अल्लाहवर श्रद्धा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.
(२५७) जे लोक ईमान धारण करतात त्यांचा समर्थक व सहाय्यक अल्लाह आहे आणि तो त्यांना अंधारातून प्रकाशात आणतो.२८७ आणि जे लोक द्रोहाचा मार्ग अवलंबितात त्यांचे समर्थक व सहायक तागूत२८८ आहेत. आणि ते त्यांना प्रकाशापासून ओढून अंधाराकडे घेऊन जातात. हे नरकाग्नीमध्ये जाणारे लोक आहेत जेथे हे सदैव राहतील.
(२५८) तुम्ही२८९ त्या माणसाच्या अवस्थेवर विचार केला नाही काय की ज्याने इब्राहीम (अ.) शी वाद घातला होता?

286) "तागूत' शब्दकोशीय अर्थाने त्या प्रत्येक व्यक्तीला म्हणतात जो आपल्या वैध सीमांच्या पलीकडे निघून गेला. कुरआनच्या परिभाषेत "तागूत' म्हणजे असा दास जो आज्ञापालनाच्या सीमेपलीकडे जाऊन स्वयं स्वामी आणि खुदा होण्याचा दावा ठोकत असेल आणि अल्लाहच्या दासांकडून आपली उपासना करून घेत असेल. अल्लाहच्या विरोधात एका दासाचा विद्रोह तीन स्वरुपाचा आहे.
1) प्रथम दर्जा, एक व्यक्ती सैद्धान्तिक रूपात अल्लाहचे आज्ञापालन सत्य मानतो परंतु व्यवहारात अल्लाहच्या आदेशांचे उल्लंघन करतो. याचे नाव "फिस्क' आहे.
2) दुसरा दर्जा, मनुष्य अल्लाहच्या आज्ञापालनापासून विमुख होऊन स्वतंत्र बनतो किंवा अल्लाहशिवाय दुसऱ्याची उपासना करू लागतो. हा प्रकार "कुफ्र' म्हणून संबोधला जातो.
3) तिसरा प्रकार, मनुष्य अल्लाहशी विद्रोह करून त्याच्या राज्यात व त्याच्या प्रजेत स्वत: आपला आदेश चालवतो. या शेवटच्या दर्जाला जो मनुष्य पोहचतो त्यालाच "तागुत' असे म्हणतात. कोणीही खऱ्या अर्थाने अल्लाहवर ईमान आणणारा बनूच शकत नाही जोपर्यंत तो या "तागुत'चा विद्रोही बनत नाही. (सच्‌च्या ईमानधारकास तागूतचा इन्कार करून त्याचा धिक्कार करणे आवश्यक आहे)
287) अंधाराशी अभिप्रेत अज्ञानांचा अंधार आहे ज्यात भटकून मनुष्य आपल्या सफलतेच्या मार्गापासून दूर अति दूर निघून जातो आणि वास्तविकतेच्या विरुद्ध चालून आपल्या प्रयत्नांना आणि सामथ्र्यांना चुकीच्या मार्गावर खर्च घालतो. "नूर' म्हणजे ते सत्यज्ञान ज्याच्या प्रकाशात मनुष्य आपली स्वत:ची आणि सृष्टीची वास्तविकता जाणून घेतो. आपल्या जीवन उद्देशाला या प्रकाशात पूर्ण जाणून घेतो व बुद्धीविवेकाच्या आधारावर व्यावहारिकतेच्या सरळमार्गावर मार्गक्रमण करू लागतो.
288) "तागुत'चे बहुवचन "तवागीयत' या अर्थाने येथे उपयोग झाला आहे. म्हणजे अल्लाहशी तोंड फिरवून मनुष्य एकाच तागुतच्या जाळ्यात अडकत नाही तर अनेक तागुत त्याच्या मानगुटीवर बसून जातात. एक तागुत शैतान आहे जो त्याच्यासमोर नेहमीच नवनवीन  प्रलोभनांचा "सदाबहार' बाग पेश करतो. दुसरा तागुत मनुष्याचे स्वत:चे मन आहे, जे मनुष्याला भावना व इच्छा आकाक्षांचा दास बनवते. अशा स्थितीत तर मनुष्य जीवनाचा सरळमार्ग सोडून वाकडा तिकडा मार्गाने चालण्यास विवश होतो. तसेच अनेक तागुत तर बाहेरच्या जगात फैलावलेले आहेत. मुलबाळं, सगेसोयरे, खानदान, मित्रपरिवार, ओळखीची माणसे, समाज, राष्ट­, लिडर, तथाकथित मार्गदर्शक (बुवाबाजी) व शासक असे अनेकानेक तागुत त्याच्या पुढे उभे ठाकलेले असतात. यातील प्रत्येकजण मनुष्याचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेतो. अशाप्रकारे अगणित स्वामींचा हा दास साऱ्या जीवनभर याच चक्रात फसून राहतो की कोण्या स्वामीला खूश करावे आणि कुणाच्या नाराजीपासून स्वत:ला वाचवावे.
289) वर दावा केला गेला आहे की, ईमानवाल्यांचा हिमायती आणि मदतगार अल्लाह आहे आणि अल्लाह अशा मनुष्याला अंधारातून उजेडात आणतो. परंतु विद्रोही व अनेकेश्वरवादींचे सहायक तर "तागुत' असतात आणि ते त्या मनुष्याला प्रकाशातून अंधाराकडे ओढून आणतात. यास अधिक स्पष्ट करण्यासाठी तीन घटनांचा येथे उल्लेख आला आहे. यापैकी पहिले उदाहरण एका अशा व्यक्तीचे आहे ज्याच्यासमोर स्पष्ट पुराव्यांसह सत्य उघड केले आहे आणि तो मनुष्य यामुळे निरुत्तर झाला परंतु त्याने तागुतच्या हातामध्ये आपला लगाम दिल्याने त्याच्यासमोर सत्य उघड होऊनसुद्धा तो प्रकाशाकडे येऊ शकला नाही आणि अंधारातच भटकत राहिला. नंतरची दोन उदाहरणे अशा दोन त्या व्यक्ती¨ची आहेत ज्यांनी अल्लाहचा सहारा तर घेतला होता. ज्यामुळे अल्लाहने त्यांना अंधारातून अशाप्रकारे प्रकाशाकडे आणले की परोक्षच्या पडद्याआड दडलेल्या तथ्यांना त्यांच्या डोळ्यांनी पाहून घेतले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget