न्याय, समता, बंधुता, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, संवैधानिक मुल्यांशी एकनिष्ठता, मंत्रीपदाची नेमणूक होताना घेतलेल्या शपथेशी बांधिलकी ही मूल्य लोकशाहीला मजबूत करतात. मात्र आपण गत 10 वर्षांपासून पाहताहोत की वरील मुल्ये मजबूत होताहेत की कमकुवत.
देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शासकीय संस्थांचा गैरवापर, एक दोन कोटींचे नव्हे तर शेकडो, हजारों कोटींचे घोटाळे अन् त्यासंबंधित प्रकरणांना मिळणारी्निलनचिट हे लोकशाही कोणत्या दिशेने जात आहे याचा मार्ग दिसून येतो. शेतकरी, मध्यवर्गीय, सामान्य नागरिक, गरीबांचे हाल होताना दिसताहेत. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, मुलभूत अधिकरांची होत असलेली घुसमट, विरोधी पक्षांना संपवण्याचा आखला जात असलेला डाव लोकशाहीसाठी घातक आहे. सरकार नवीन स्थापन झाले की, ते काही ना काही प्रगतीचे काम करतच असते. असे नव्हे की ते सर्व लुटतेच. मात्र अशी कामे जी दुरगामी परिणाम करणारी असतात, त्याचा देशाच्या ओळखीवर मोठा परिणाम होतो. ’न खाऊंगा न खानेदूंगा’ म्हणणाऱ्यांनी घोटाळेबाजांना आपल्या गोटात ओढले यावरून त्यांच्या आचार, विचार आणि तत्वांचा लेखाजोगा समोर येतो.
लोकसभेची निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा सुरू असलेल्या उत्सवात सर्वांनी हिरहिरीने भाग घेत आपल्या अधिकाराचा वापर करून चांगले सरकार निवडून देणे ही प्रत्येक भारतीयाचे अनिवार्य कर्तव्य आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि सत्य हे प्रगतीचे तत्व आहे. ’सत्यमेव जयते’साठी आपले मत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
- बशीर शेख
Post a Comment