मागील दशकाच्या आरंभापासूनच मुस्लिमांमध्ये मुलींना शिक्षण देण्याचा विचार पुढे आला. मुलींसाठी खास शैक्षणिक संस्था कायम करण्यात आल्या. विद्यापीठांमध्येही मुलींना प्रवेश मिळू लागले. त्यामुळे मुलींच्या शैक्षणिक योग्यतेला ज्ञानाचे पंख मिळाले. वेगवेगळ्या विद्यापीठातील इस्लामिक स्टडीज या विभागामध्ये अनेक मुलींनी एम.ए., एम.फिल आणि पीएच.डी. चे प्रोजे्नट दाखल केले. हे प्रबंध कुरआन, हदीस, इस्लामी दंडशास्त्र, प्रेषितांचे चरित्र, इस्लामचा इतिहास आणि इस्लामच्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित होते. या प्रबंधामधून मुलींने जे संशोधनासाठी विषय निवडलेत आणि जे संशोधन केले त्यावरून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची महत्ता लक्षात आली. त्यांनी जुने आणि नवे कुरआनचे भाष्य यांचा तौलनिक अभ्यास केला व त्याला आपल्या शब्दांमध्ये विद्यापीठात प्रबंधाच्या रूपाने सादर केले. त्यांनी तुलनात्मक अभ्यास केला. सामाजिक, आर्थिक, राजकीय बाबींवर कुरआन आणि हदीसच्या प्रकाशात आपल्या अभ्यासाचा निष्कर्ष जगासमोर मांडला. प्रेषितांच्या चरित्राचे वेगवेगळ्या पैलूंवर संशोधन करून आपल्या अभ्यासाचा सार साहित्य क्षेत्रात आणून मोलाची कामगिरी बजावली. सामाजिक आणि कायदेशीर प्रश्नांचा इस्लामिक ज्युरिसपुडन्सच्या आधारे अभ्यास करून शरियतच्या तरतुदी त्यावर आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तर लोकांसमोर मांडली.
भौतिक शिक्षण देणाऱ्या अनेक विद्यापीठांची स्थापना अरब आणि इतर मुस्लिम देशांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. त्यात विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थीनींनाही प्रवेश मिळाला. काही विभाग विद्यार्थीनींसाठी राखीव सुद्धा आहेत. या विद्यापीठांमध्ये इस्लामच्या विविध पैलूंवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले.
एम.ए. पीएच.डी. प्रबंध सादर झाले. भारतीय उपखंडामध्येही मुलींच्या उच्चशिक्षणाकडे लक्ष देण्यात आले. भौतिक विषयांमध्येही विद्यार्थीनींनी एम.ए., एम.फिल, पी.एचडी प्राप्त केली आहे.
भारत आणि पाकिस्तान मधील अनेक विद्यापीठांमध्ये तंत्रशिक्षणाबरोबर इस्लामिक स्टडीजचे विभाग सुरू करण्यात आले. त्या अंतर्गत कुरआन, हदीस आणि इस्लामच्या इतर वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास आणि संशोधन सुरू झाले. मात्र दुर्दैवाने या संशोधनात्मक प्रबंधांमधील फार कमी प्रबंध प्रकाशित झाले. त्यामुळे महिलांद्वारे केलेल्या संशोधनाशी न्याय होऊ शकला नाही आणि त्याचा समाजाला फारसा उपयोगही झाला नाही.
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment