Halloween Costume ideas 2015

लगाम..!


दिवशी उठल्यापासून त्याचा जीव कासावीस होत होता. सकाळी सहरी करून तो (महताब /मुन्ना) झोपला होता. 9 वाजता उठल्यावरसुद्धा त्याची मनःस्थिती बिथरल्यासारखीच होती. दुसरीकडे सुमय्या (सूमी) चीही अशीच काही अवस्था होती. सहरी करून नमाज कुरआन पठण करूनही तिचे मन लागेना. सारखा मोबाईलकडे हात जात होता व ती मागे घेत होती, शेवटी तिने झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मुन्ना हा फायनल एमबीबीएसचा विद्यार्थी होता तर सूमी ही थर्ड ईअरला होती. कॉलेजमध्ये खूप देखण्यामुली होत्या पण मुन्नाला आवडली ती सूमीच. कारण ती फक्त सुंदरच नसून खूप हुशार व सभ्यही होती, म्हणून मुन्ना तिला (दिल दे बैठा था). रमजान पूर्वी तो तिला दररोज मॅसेज करायचा, भेटायचा, बोलायचा पण आज रमजानचा पहिला रोजा होता. त्यामुळे तो न तिच्याशी बोलू शकत होता न भेटू शकत होता. सुमीने तर त्याला रमजानमध्ये मॅसेज ही करू नकोस असे सांगितले होते, जे त्याने सहज स्वीकारले होते पण एवढा त्रास सोसावं लागेल याची त्याला कल्पना नव्हती. सुमीने त्याला रोजाचे अर्थ फक्त खाने पिणेच सोडणे नव्हे तर अल्लाहने ठरवून दिलेल्या सीमांचे रक्षण करणे हे ही आहे, असे सांगितले होते. 

1. डोळ्यांचा रोजा, नामहरम (पर स्त्री किंवा पर पुरूष)ला न बघणे.

2. तोंडाा रोजा (वाईट न बोलणे). 3. हाताचा रोजा (हाताने वाईट काम न करणे), 4. पायांचा रोजा (वाईट कार्यासाठी बाहेर न पडणे) 5. कानांचा रोजा (वाईट न ऐकणे) असा असतो. 

6. रोजा व नमाज खऱ्या अर्थाने अदा केल्यास ते आपल्याला वाईट गोष्टींपासून रोखतात. मुन्ना आणि सूमी रोज्यांनी लावलेल्या नैतिक लगामचे पालन करत होते. 

7. आमीर एक कामूक व्यक्ति होता. रोजाच्या लगामाने त्याला सुद्धा दिवसा आपल्या पत्नीकडे जाण्यापासून रोखले होते. 

8. समीर अतिशय खादाड होता पण तरीही रोजामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात तो यशस्वी झाला होता. 

9. सानिया यंदा तिसऱ्यांदा नीटच्या परीक्षेत पाहिजे तेवढे गुण प्राप्त घेऊ शकली नव्हती. तिच्या मनात आत्महत्येचे विचार चालू होते पण रोजांमुळे तिला धैर्य प्राप्त झाले आणि ती नैराश्यातून बाहेर पडली.  

10. रोजा ठेऊन व्याजाचा व्यवसाय करणे परवीन भाभीला नको वाटत होते म्हणून त्यांनी जमाअते इस्लामी हिंद लातूर द्वारे संचलित युनिटी अर्बन को ऑपरेटीव्ह सोसायटीतून बिनव्याजी कर्ज (शुन्य टक्के दराने) घेतले व त्या बरोबर त्याचे ईएमआय नियमितपणे भरण्याचा निश्चय केला. 

11. दारूड्या बबलू ने ही रोजा ठेवण्यासाठी महिनाभर दारू सोडण्याचा ठाम निश्चय केला होता व मागच्या रमजानमध्ये त्याने पूर्ण रोजेही ठेवले होते व यावर्षी ही तो पूर्ण रोजे करणार असे खात्रीपूर्वक सांगत होता. 

12. वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका मुलीने आपले पापक्षालन करण्यासाठी हाच महिना निवडला होता. तिला ठाम विश्वास होता की रोजे तिचे पापक्षालनासाठी मदत करतील.

वरील नमूद केलेल्या सर्वांनी रमजानमध्ये वाईट कामांपासून लांब राहायचे खूप प्रयत्न केले व त्याच्यात ते यशस्वीही झाले. ईदचा दिवस आला मुन्ना ने सूमीला फोन लावला. मुन्नाचे नाव बघताच सूमीचे हात थरथरायला लागले. तिने फोन उचलला नाही. तिचे मनं म्हणत होते की, आता तर रमजान संपला, मुन्नाला फोन कर, त्याला बोल, ईद मुबारकचे मॅसेज कर, पण ती फोनला हातही लावू शकली नाही. हा होता ’तकवा’ (अल्लाहची भीती, ईशभय) जो तिला फोन करण्यापासून, मॅसेज करण्यापासून, फोन उचलण्यापासून रोखत होता. तिने मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवून दिला. रमजानच्या एका महिन्यात मिळालेल्या नैतिक प्रशिक्षणाचे हे परिणाम होते. जसे प्रत्येक क्षेत्रात तज्ञ बनण्यासाठी प्रशिक्षण हवे असते, रोजे नैतिकतेचे प्रशिक्षण देऊन माणसाला माणूस बनवतात. 

रोजच मोबाईल स्विच ऑफ येतो हे पाहून शेवटी मुन्नाला आठवले की सूमीने त्याला लग्नाचा प्रस्ताव दिला होता जो त्याने आपण कमावत नाही व मानसिक रूपाने लग्नासाठी तयार नाही म्हणून नाकारले होते. सूमीची आठवण मात्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने आपल्या आई-वडिलांशी चर्चा केली व त्यांनी सूमीच्या आईवडिलांशी चर्चा करून सुमीशी लग्न करायचे ठरविले. ही सगळी रमजानची बरकत व रोजाच्या लगाममुळे शक्य झाले. दोन प्रेम करणारे व्यक्ती हराम (अवैध) प्रेमात न पडता निकाह (विवाह)च्या वैध बंधनात बांधले गेले होते. 

पण प्रत्येकाचे नशीब मुन्ना आणि सूमी सारखे नसते. बहुतांश प्रेमी या जगात आपले प्रेम यशस्वी करू शकत नाहीत. मग त्यांनी काय करावे? या जगात आपलं प्रेम भेटले नाही म्हणून डिप्रेशनमध्ये जाणे, आत्महत्या करणे बरोबर नाही. निराश व हाताश होता कामा नये. रोजा आपल्याला सब्र (संयम) शिकवितो. आपण जर धीर धरला तर ह्या ऐहिक जीवनाच्या क्षणभंगूर प्रेमापेक्षा मरणोत्तर जीवनात मिळणाऱ्या दायमी (नेहमी राहणारे) प्रेम आपण पसंत कराल. फक्त प्रेमच नव्हे, मानवजात ह्या दुनियेत न प्राप्त होणाऱ्या वस्तूंसाठी दुःखी होत असते. प्रत्येकाला आपण कुठे न कुठे कमी पडलो असे वाटते. अमुक वस्तू आपल्याकडे नाही, तमूक वस्तू हवी आहे या विचारात (टेंशन)मध्ये जीवन जगत असते. तर कुरआनच्या सूरह अननहल आयत क्र. 30-31 मध्ये अल्लाहचा आदेश आहे की, दुसरीकडे जेव्हा ईशपरायण लोकांना विचारले जाते की, ही काय वस्तू आहे जी तुमच्या पालनकर्त्याकडून अवतरली आहे तर ते उत्तर देतात, ’’उत्तम वस्तू अवतरली आहे’’ अशा प्रकारच्या पुण्यकर्मी लोकांसाठी या जगातही कल्याण आहे आणि मृत्यूनंतर स्वर्गातही घर हमखास त्यांना मिळणार आहे. त्यांनी इच्छिलेल्या ज्या वस्तू त्यांना पृथ्वीवर मिळाल्या नाहीत त्या स्वर्गामध्ये त्यांना सहज उपलब्ध होतील.  

अल्लाह कुरआनमध्ये फरमावितो की, 1. ’’ईशपरायण लोकांचे चिरंतन निवासाचे स्वर्ग ज्याच्यात ते दाखल होतील, खालून कालवे वाहात असतील आणि सर्व काही तेथे अगदी इच्छेप्रमाणे असेल, असा मोबदला देतो, अल्लाह ईशपरायण लोकांना.’’ (सूरह हामीम सज्दा. 

2. सूरह फुस्सीलत आयत नं. 30-31 मध्ये अल्लाहचे फर्मान आहे, ’’ ज्या लोकांना सांगितले की, अल्लाह आमचा पालनकर्ता आहे आणि मग ते त्यावर दृढ राहिले, निश्चितच त्यांच्यावर दूत उतरत असतात आणि त्यांना म्हणतात की, ’’ भीऊही नका व दुःख देखील करू नका आणि खूश व्हा त्या स्वर्गाच्या खुशखबरीने जिचे वचन तुम्हाला दिले गेले आहे. आम्ही या जगाच्या जीवनातसुद्धा तुमचे सोबती आहोत आणि परलोकातसुद्धा. तेथे जी काही इच्छा कराल तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक गोष्ट जीची तुम्ही मनिषा बाळगाला, ती तुमची होईल. याशिवाय, सूरह अलअहकाफ मध्ये आयत नं. 13-15, सूरह काफ 31-32 मध्ये तसेच सूरह वाकीया 7-37 मध्ये वेगवेगळ्या रूपाने स्वर्गाचे वर्णन तेथे लाभणाऱ्या नेअमतींचा उल्लेख आहे. म्हणून संयम बाळगा, अल्लाहवर विश्वास ठेवा, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा, स्वर्गात पाहिजे ते मिळेल.रमजाननंतर आमीरला आपल्या वासनांवर व समीरला खाण्यावर नियंत्रण आले होते. सानियाही मन लावून अभ्यास करीत होती. पण बबलूने पुन्हा पिण्यास सुरूवात केली होती कारण रमजानमध्ये कैद झालेला सैतान आता मुक्त झाला होता. वेश्याव्यवसाय करणारी मुलगीही अयशस्वी झाली. रमजानच्या एका घेतलेल्या प्रशिक्षणाला ते विसरले आणि गेले सैतानाच्या पुन्हा बहकाव्यात आले. 

लगाम असलेल्या व लगाम नसलेल्या घोड्यात खूप फरक असतो. म्हणून अल्लाहकडे ही प्रार्थना आहे की, ’’रमजानमध्ये घेतलेले प्रशिक्षणाचे परिणाम दुसऱ्या रमजान महिन्यापर्यंत राहू दे व रोजाने लावलेल्या लगामवर चालण्याची सद्बुद्धी दे, आमीन.


डॉ. सिमीन शहापुरे


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget