१९) आणि जो परलोक जीवनाचा इच्छुक असेल व त्यासाठी प्रयत्न करील जसे त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि तो ईमानधारक असेल तर अशा प्रत्येक माणसाच्या प्रयत्नांची कदर केली जाईल.१०
(२०) यांनाही व त्यांनाही उभयपक्षांना आम्ही (जगात) जीवनसामग्री देत आहोत. ही तुझ्या पालनकर्त्याची देणगी आहे आणि तुझ्या पालनकर्त्याच्या देणगीला प्रतिबंध करणारा कोणीही नाही.
(२१) परंतु पाहा, जगातच आम्ही एका गटाला दुसर्यापेक्षा अधिक कृपा दिल्या आहेत.११ आणि परलोक जीवनामध्ये त्याचे दर्जे आणखी जास्त होतील आणि त्याची कृपा आणखी वरचढ असेल.
१०) म्हणजे त्याच्या कामाची कदर केली जाईल. जितके आणि जसे प्रयत्न त्याने परलोकातील यशासाठी केले असतील त्यांची फळे त्याला अवश्य मिळतील.
११) म्हणजे जगातच हा फरक ठळकपणे दिसून येतो की परलोकाचे इच्छुक, या जगाच्या प्रेमीपेक्षा श्रेष्ठ असतात. हे श्रेष्ठत्व या दृष्टीने नव्हे की यांचे अन्न व पोषाख आणि यांची घरे व स्वार्या व यांच्या संस्कृती व राहणीमानाची ऐट त्या लोकांपेक्षा वरचढ आहे तर या दृष्टीने की हे लोक (परलोकाचे इच्छुक) जे काही मिळवितात ते सचोटी, प्रामाणिकपणा व इमानदारीने मिळवीत आहेत आणि त्यांना (या जगाचे लोभी) जे काही प्राप्त होत आहे ते अन्यायाने, बेइमानी करून व नाना तर्हेच्या हरामखोर्या करून प्राप्त होत आहे. मग यांना जे काही मिळते, ते तारतम्य राखून खर्च होत असते. त्यातील हक्कदारांचे हक्क अदा होतात, त्यातून याचक आणि आचवलेल्यांचाही वाटा काढला जातो व त्यातून अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी इतर पुण्य कार्यासाठीदेखील द्रव्य खर्च केले जाते. याउलट या जगाच्या प्रेमींना जे काही मिळते ते जास्तीत जास्त चैनीत आणि कुकर्मात व तर्हेतर्हेच्या बिघाडाच्या व उपद्रवजनक कामात पाण्यासारखे खर्च केले जाते. अशा प्रकारे परलोक इच्छुकांचे जीवन या जगाच्या प्रेमींच्या जीवनापेक्षा सर्वस्वी उच्चतर असते.
Post a Comment