स्वीडनमधील स्टाकहोम येथे अल्फ्रेड नोबेल याचा जन्म झाला. त्याचे वडील आर्किटेक्ट अभियंता होते. अल्फ्रेड नोबेल यास नवीन शोध लावण्याची फार आवड होती. १९८७ साली त्याने दोन-तीन प्रकारच्या स्फोटकांचे मिश्रण करुन एक शक्तिशाली स्फोटक तयार केले होते. त्याचे नाव आहे डायनामाइट. तो इथेच थांबला नाही तर त्याने याहूनही अधिक शक्तिशाली स्फोटके शोधून काढली आणि ती मानवाच्या हातात पडली. असे करून त्याने माणसाच्या हातात अत्यंत विध्वंसक शक्तीची स्फोटके दिली. पण हे सर्व शोधकाम करण्याचा त्याचा उद्देश नव्हता. पण त्याने अशी समज करून घेतली होती की अत्यंत विध्वंसक स्फोटके किंवा शस्त्रे निर्माण केली गेली तर राष्ट्र आणि संहारक शक्तीचा वापर युद्ध सुरू न करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करतील. तरीदेखील त्याच्या मनात अशी भीती होती की त्याने विकसित केलेल्या संहारक वस्तूंचा वापर जगातील युद्धज्वर नरसंहार करण्यासाठी करतील. त्याची ओळख लोक हत्यारा आणि मृत्यूचा व्यापारी म्हणून करतील. म्हणून त्याने आपल्या नावाने काही देण्याचे नियोजन केले. काही केले तरी आज जगात त्याला लोक हजारोंच्या संख्येने मानवांचा हत्यारा असेच म्हणत आहेत. यानंतर पुढे काही वर्षांनी अल्फ्रेड हिटलर नावाचा एक माथेफिरू धरतीवर आला. जर्मनीवर काबीज झाला. हुकूमशाह बनला. लाखो ज्यू धर्मियांची हत्या केली. नंतर जगावर राज्य गाजवण्याचा संकल्प करून एक सप्टेंबर १९३९ साली त्याने नाझी हत्यारांचा फौजफाटा घेऊन पोलंडवर हल्ला केला. त्याचे प्रत्युत्तर म्हणून ब्रिटन आणि फ्रान्स यांनी मिळून जर्मनीविरुद्ध वैश्विक युद्धाची घोषणा केली. पुढचा इतिहास भलामोठा आहे. या युद्धात ७५ दशलक्ष लोकांचे प्राण गेले. फक्त एका माथेफिरु हुकूमशाहच्या अट्टाहासामुळे अगोदर ६० लाख विविध धर्मियांना मारले गेले आणि नंतर जगभर विशेषतः युरोपमध्ये ७ कोटी ५० लाख लोक मारले गेले. आज पुन्हा एकदा एका माथेफिरुने जगाला त्याच उंबरठ्यावर आणून सोडले आहे. तो म्हणजे इस्रायलचा सत्ताधारी. त्याने गेल्या कित्येक वर्षांत सीरियामध्ये नाहक हत्याकांड, इराणच्या लोकांना, सैन्य अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते आणि असा त्याचा भ्रम निर्माण झाला होता की इराण माझे काहीच करणार नाही. पण जेव्हा काही आठवड्य़ांनी इस्रायलने पुन्हा सीरियामधील इराण दूतावासाला लक्ष्य करुन हल्ला केला ज्यात इराणचे सैन्य अधिकाऱ्यांसहित काही इतर लोक मारले गेले. तेव्हापासूनच इराणने बदला घेण्याची घोषण केली होती. कारण इस्रायलचा हा हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन होता. इराणने स्पष्ट शब्दांत जाहीर केले होते की इराण इस्रायल विरुद्ध कारवाई करणार आणि कोणत्याही देशाने यात आक्षेप घेऊ नये. कारण इस्रायलच्या हल्ल्यात आंतरराष्ट्रीय कायदे-नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. आणि घोषणा केल्याप्रमाणे त्याने इस्रायलवर हल्ला केला. बरीच नासधूस झाल्याचे सांगितले जाते. याचे प्रत्युत्तर इस्रायल देणारच आणि म्हणूनच आता हे युद्ध मध्यपूर्वेतच सीमित राहणार नाही तर जगभर पसरणार याची चिंता जगाला लागली आहे. म्हणजे अगदी हिटलरसारख्या एका व्यक्तीने या जगाला पुन्हा विध्वंसाच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून यूक्रेन-रशिया युद्ध चालू आहे. साऱ्या पाश्चात्य देशांनी मिळून सुद्धा हे युद्ध थांबवले नाही. इकडे पॅलेस्टाईनविरुद्ध इस्रायलने जे युद्ध छेडले आहे त्यात हजारोंची कत्तल केली, गाजाला नामशेष करून सोडले. तरीदेखील जगातले इतर देश हे युद्ध थांबवण्यात म्हणजेच नेत्यान्याहूंना आवर घालण्यात यशस्वी झालेले नाहीत. त्यात इराण-इस्रायल युद्धाची शक्यता, जगाला चिंता लागली वैश्विक युद्धाची आणि आज जसे नेते व सत्ताधारी जगभर आहेत, त्यांना पाहता जर युद्ध सुरु झालेच तर ते त्यास रोखू शकत नाहीत. ते इतके दुर्बल आहेत की केवळ त्यांच्या आवाक्याबाहेरच्या या गोष्टी आहेत. जर इस्रायलने इराणविरुद्ध कारवाई केली तर ब्रिटन, जॉर्डन आणि अमेरिका त्याच्या बाजूने उभे राहतील. अरब देश तटस्थ राहतील, कारण यापलीकडे ते काहीही करू शकत नाहीत. केवळ ऐशोआराम, खानपान. रशिया आणि चायना इराणची साथ देणार आहेत. तसे स्वतः इराण समर्थ राष्ट्र आहे. त्याच्याकडे शस्त्रास्त्रांचे मोठे भांडार आहे आणि ते साहसी लोक आहेत. म्हणजे युद्ध झालेच तर ते कुणी रोखणार नाही आणि इतर देशामध्ये याची ठिणगी पडली तर हे युद्ध जागतिक होणारच. अल्फ्रेड नोबेलने कल्पणा केली होती की महाविध्वंसक शस्त्रे, स्फोटके निर्माण केली गेली तर जगात लोकांवर धाक राहील. आणि ही अशी शस्त्रे, बॉम्ब वगैरे युद्धप्रतिबंधक भूमिका घेतील. त्या धर्तीवर आज पाश्चात्य देशांकडे जगाला विध्वंसकाकडे लोटून देणारा मोठा साठा आहे. त्या साठ्याचा दुरुपयोग झालाच तर सारे जग संपेल की काय अशी भीती आहे. नोबेल याने प्रतिबंधात्मक शक्तीची कल्पना केली होती ती फोल ठरतचे की काय, हा प्रश्न आहे. पण जर इराण-इस्रायल मधील युद्धाने जागतिक युद्धाकडे वाटचाल केलीच तर आज आहे ते जग उरणैर नाही. ही सभ्यता संपेल. विनाश अटळ आहे. आणि ते वैश्विक नैसर्गिक नियमानुसार होईल. सध्याच्या सभ्यता आणि पिढीकडे जगाला देण्यासारखे काही उरले नाही. केवळ नासधूस, विनाश हेच त्यांनी दिले आहे. ही पिढी संपेल. नव्या पिढीच्या समूहाचा उदय होईल. सर्वकाही नवीन. पवित्र कुरआनने सांगितल्याप्रमाणे, “तुमच्याजागी नवे समूह उभे करणार आणि तुम्ही त्याचे काहीही करू शकणार नाही.”
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment